भारताकडून संधी मिळेना म्हणून या 2 युवा गोलंदाजांनी घेतला मोठा निर्णय, आता भारत नाही तर या संघाकडून खेळणार क्रिकेट..
सध्या भारतीय संघात स्थान मिळवणे खूप कठीण काम आहे. त्यामुळे अनेक भारतीय क्रिकेटपटू इतर संघांसाकडून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचे दोन वेगवान गोलंदाज चेतन साकारिया आणि मुकेश चौधरी पुढील महिन्यात येथे सुरू होणाऱ्या T20 मॅक्स स्पर्धेच्या सुरुवातीच्या हंगामात खेळतील.
चेतन साकारिया आणि मोहित चौधरी दोघेही इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या हंगामात अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळले. एमआरएफ पेस फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक्सचेंज प्रोग्रामचा भाग म्हणून हे दोन्ही खेळाडू आता ब्रिस्बेनमध्ये खेळणार आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘एमआरएफ पेस फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण जवळपास 20 वर्षांपासून सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे गेल्या काही वर्षांत हे थांबले होते, परंतु या दोन भारतीय खेळाडूंसह पुन्हा सुरू होत आहे.
साकारियाने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण केले होते, तर चौधरीने यंदाच्या आयपीएलमध्ये 13 सामन्यांत 16 विकेट घेतल्या होत्या. साकारिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेत सनशाइन कोस्टकडून खेळणार आहे, तर २६ वर्षीय चौधरी विनम-मॅनलेचे प्रतिनिधित्व करेल.
स्पर्धेत सहभागी होण्याव्यतिरिक्त, दोन्ही भारतीय गोलंदाज ‘बुपा नॅशनल क्रिकेट सेंटर’ येथे प्रशिक्षण घेतील आणि ‘क्वीन्सलँड बुल्स’च्या पूर्व-हंगामाच्या तयारीतही सहभागी होतील. 18 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत टी-20 मॅक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा अंतिम सामना अॅलन बॉर्डर मैदानावर खेळवला जाईल.
या स्पर्धेत आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजकठरणार आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..