आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आज जागतिक कामगार दिन

मे महिन्याचा पहिला दिवस हा जगभरातील बऱ्याच देशांमध्ये ” राष्ट्रीय कामगार दिन, बहुतेक ठिकाणी “आंतरराष्ट्रीय कामगार दिन “म्हणून साजरा करत असतात.

4 मे 1886 रोजी शिकागो येथे झालेल्या हायमार्केट प्रकरणाच्या स्मरणार्थ काही राजकीय पक्षांच्या ( समाजवादी आणि कम्युनिस्ट) पॅन – नॅशनल संघटनेने ही तारीख निवडली होती.परंतु महाराष्ट्रासाठी हा दिवस विशेष आहे कारण, याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो.

जागतिक कामगार दिन

एका मोठ्या संघर्षांनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नावाप्रमाणेच ‘महा’न राज्य होण्यासाठी त्याची वाटचाल कशी असायला हवी याचा सखोल विचार त्याकाळीच झाला होता.

महाराष्ट्राच्या या वाटचालीत कामगार, मजूर, आणि काबाडकष्टदारांचा एक मोठा वाटा आहे “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकाराव नाही, तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे.” या अण्णाभाऊ साठे यांच्या वाक्यावरून जर कामगार नसले तर इथली अर्थव्यवस्था सक्षमपणे चालूच शकली नसती याची प्रचिती येते. प्रगत देशांच्या प्रगतीत कामगार वर्गाचे योगदान महत्वपूर्ण असून,संपूर्ण व्यवस्था ही कामगारांच्या श्रमावर चालू आहे.

काय आहेत कामगारांना हक्क?

  • कामावरील कामगारांच्या सुरक्षेविषयी ते भोगवटदाराकडून माहिती मिळवू शकतात.
  • वेळ पडेल तेव्हा कारखान्यात किंवा मुख्य निरीक्षकांची मान्यता मिळालेल्या प्रशिक्षण केंद्रातून ते कामगारांच्या सुरक्षा विषयीचे प्रशिक्षणभोगवटदाराच्या प्रायोजकतत्वाने घेऊ शकतात.
  • कामावरील कामगारांच्या आरोग्यविषयी कामगार भोगवटादाराकडून माहिती मागवू शकतात.
  • कामगारांच्या आरोग्य किंवा सुरक्षेसाठी देऊ केलेल्या सोई -सुविधा अपुऱ्या असल्यास कामगार त्याच्याविरुद्धात निरीक्षकांकडे थेट तक्रार करू शकतात.

सध्या कोरोना विषाणूमुळे राज्याची व देशाची आर्थिक व्यवस्था संकटात सापडलेली असताना,सर्व उद्योग बंद आहेत,उत्पादन बंद आहे, आणि सर्वच कामगार उद्याच्या भीतीने चिंतातुर झालेले आहेत.अश्या परिस्थितीत राज्यातील व देशातील सर्व कामगार सुशिक्षित बेकार आणि सर्व क्षेत्रातील कष्टकरी- कामगार यांच्या रोजगाराची व्यवस्था करून, त्यांना आधार देण्याची नितांत गरज आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here