आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 

इरफान खान यांचे खरे नाव साहबजादे इरफान अली खान होते. त्याचा जन्म जयपूरमधील एका राजघराण्यातील कुटुंबात झाला होता परंतु खूप वाईट वेळ त्याने पाहिली. इरफानला तारुण्याच्या काळात क्रिकेटपटू व्हायचे होते. यामध्ये त्याच्या पालकांनी त्याचे समर्थन केले नाही. मग एनएसडीकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी अभिनयात जाण्याचा निर्णय घेतला.

 

new google

बॉलीवूडमध्ये अनॆक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवून, रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात.अश्याच दिग्गज अभिनेत्यापैकी एक असणाऱ्या इरफान खान यांचा आज जन्मदिवस आहे. इरफान खान यांचं गेल्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या 54व्या वर्षी कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्यांचं निधन झाले.

 

इरफान

 

इरफान खान यांनी बऱ्यांच हिट अश्या सिनेमात काम केले होते, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांचे विशेष आहे चाहता वर्ग तय्यार झालेला आहे.इरफान खान यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये आपलं अभिनय कलेचं शिक्षण पूर्ण केले होते.
नंतर टीव्ही सिरिअल पासून अभिनयास सुरवात केली.

 

त्यांचा अभिनय हा नैसर्गिक होता, म्हणूनच त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अक्षय्य कुमार यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये “नैसर्गिक अभिनय करताना बऱ्याच कलाकारांना अडचणी येतात, पन इरफान मात्र त्याला अपवाद आहे, तो नैसर्गिक अभिनय सहज करून जातो. ” असं म्हटलं होत.

 

इरफान खान याने कारकिर्दीत अगदी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. चित्रपटाचा जीव ओतून अभिनय करणं हे इरफानच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ‘सलाम बाॅम्बे’ चित्रपटातून इरफानच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात झाली होती.

 

बाॅलिवूडच नाही तर इरफानने बाॅलिवूडचा पडदाही बरेच वर्ष गाजवला होता. ‘हिंदी मिडयम’ हा इरफानच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. पान सिंग तोमर’साठी इरफानला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

 

इरफान

 

‘ मदारी ‘ चित्रपताट त्याने केलेली भूमिका पाहण्याजोगी आहे.मागच्या आठवड्यातच इरफानच्या आईचा मृत्यू झाला
लोकडाऊन मुळे आपल्या आईचं अंतिम दर्शन पण इरफानला व्हिडिओ कॉल वरती कराव लागलं होत. आणि अवघ्या काही दिवसांनीच इरफाननी सुद्धा बॉलीवूडसह जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने एक कधीही न भरून निघणारी पोकळी बॉलीवूडमध्ये निर्माण झाली आहे.

 

  • प्यार अंधा होता है और प्यार में पड़ने वाले उससे बड़े अंधे होते हैं।
  • शैतान की सबसे बड़ी चाल ये है कि वो सामने नहीं आता।
  • सिर्फ इंसान गलत नहीं होते, वक्त भी गलत हो सकता है।
  • गलतियां भी रिश्तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती है।
  • अक्सर हर देश बड़ी समस्याएं सुलझाने के चक्कर में ये भूल जाता है कि उसकी कितनी बड़ी कीमत उसके अपने लोगों को चुकानी पड़ती है।
  • डेथ और शिट किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है।
  • बीहड़ में तो बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में
  • किसी भी बेगुनाह को सजा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें
  • कुल तीन बार इश्क किया, और तीनों बार ऐसा इश्क मतलब जानलेवा इश्क किया.

 

यांसारख्या असंख्य डायलॉगला एक वेगळी ओळख देणारा इरफान खान आज आपल्यात नाहीयेत,हे बॉलीवूडसह त्याच्या सर्व चाहत्यांना पचवायला अवघड जात आहे.इरफान खान म्हणजे उत्कृष्ट अभिनेता व तेवढाच दिलदार माणूस, एवढ्या लवकर त्यांनी जगाचा निरोप घेतला , हे जाण्याचे वय नक्कीच नाही.

 

 

त्यांच्या अनेक सिनेमांनी रसिकांवर जादू केली त्यातील लंच बॉक्स, हिंदी मिडीयम, इंग्लिश मिडीयम, पिकू ही काही नमूद करावी अशी नावे. देशाचे नाव जगात उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या इरफान खान यांना युवाकट्टा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here