आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

 

लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही चॅलेंजबद्दल आपण आज बोलणार आहोत. इंस्टाग्राम ,टिकटोक व  व्हाटसअपचे  हे चॅलेंज सिने अभिनेत्यांमध्ये  देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत.

 

challenge day

new google

 

 

  1. Dalgona कॉफी चॅलेंज:   

फक्त तीन सामग्री वापरुन बनवलेली ही कॉफी घराघरात Quarantine मध्ये बनवली गेली आहे. कॉफी,साखर आणि गरम पानी एकत्र करून बनवलेली ही कॉफी  दिसायला खूप सुंदर आहे आणि ही इंस्टाग्राम ,टिकटोकवर पण खूप प्रसिद्ध झाली आहे. Dalgona कॉफी एवढ्या वेळा बनवली गेली आहे की #GoCorona च्या जागी #GoDalgona म्हणायची वेळ आली आहे! तुम्ही सुद्धा हे कॉफी चॅलेंज नक्आकी करू पहा.आणि आम्हाला इंस्टाग्रामवर शेअर करा.

 

 

 

2.Whatsapp ग्रुप फॅमिली चॅलेंज

घरातील सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक कुटुंबं दर रोज नवीन चॅलेंज Whatsapp ग्रुप वर शेअर करत आहेत. या चॅलेंज मध्ये, त्या दिवशी बनवलेल्या पदार्थांचा फोटो, चित्रपटाची नकल असे इतर काही चॅलेंज पाठवत राहतात. हे सगळे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या कुटुंबाला बक्षीसपण जाहीर करतात. अश्या अनेक स्पर्धेने  कुटुंबात या चॅलेंजचा उत्साह असतो आणि lockdown च्या वेळी काहीतरी वेगळा करण्याची प्रेरणा मिळत राहते.

 

 

3.Don’t Rush चॅलेंज

Don’t Rush चॅलेंज हे एक मेक-अप चॅलेंज आहे ज्या मध्ये मेक-अप आधीचा विडियो घेऊन ट्रांजिशन मेक-अप नंतर कशे दिसतात या बद्दल आहे. या चॅलेंज मध्ये मेक-अप ब्रश पुढच्या व्यक्तिला दिला जातो आणि घरी बसल्या बसल्या सर्वांनी एकत्र शूट केल्या सारखा वाटतं!  हे चॅलेंज सि अभिनेत्रींनमध्ये सर्वांत जास्त केले गेलं आहे.तुम्हाला पण जर  हे चॅलेंज स्वीकारायचे  असेल तर, आपल्या मैत्रिणीन सोबत  हे चॅलेंज करून सकता!

 

4.Instagram फिल्टर्स चॅलेंज:

 

Instagram फिल्टर्स मध्ये अनेक चॅलेंज आहेत. 

‘Guess the gibberish’: या इंस्टाग्राम  चॅलेंज मध्ये. एक वाक्य तोडून-मोडून देतात आणि त्या वाक्याला तुम्हाला 15 सेकंदामध्ये ओळखावे लागते. हा एक व्हिडीओ चॅलेंज आहे, आणि व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला बरोबर उत्तर स्क्रीनवर दाखवतात. हा चॅलेंज खूप प्रसिद्ध झाला आहे आणि Instagram मध्ये सगळे वेगवेगळे वाक्य ओळखण्याचा प्रयत्न करता करता Quarantineची मजा घेत आहे!

 

‘Name,Place,Animal,Thing’: या फिल्टर मध्ये, स्क्रीनवर तुम्हाला एक अक्षर देतात आणि तुम्हाला 15 सेकेंडात त्या अक्षरा वरुण सुरू होणारे नाव,जागा,प्राणी आणि वस्तु हे पटकन सांगावे लागते! हे चॅलेंज English मध्ये असल्यामुळे याचा उत्तरही English मध्ये द्यावा लागत.हे खूप सोप्पं चॅलेंज असल्या मुले,तुम्ही हे चॅलेंज छोट्या मुलांबरोबर सुद्धा खेळू शकता!

 

‘This or that’: या फिल्टर मध्ये. तुम्हाला दोन पर्याय दिले जातात आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार  एक पर्याय निवडावा लागतो. विडियो चॅलेंज मध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा पर्याय निवडून वेगवेगळे नवीन पर्याय मिळत जातात. या चॅलेंज मध्ये फिरकी हीच आहे कीं दोन्ही पर्याय मध्ये  एक पर्याय निवडणे अवघड असतं कारण दोन्ही पर्याय तुम्हाला खर्‍या आयुष्यात करायला  नक्कीच आवडणार नाही|

 

अशे अनेक चॅलेंज तुम्हाला Quarantine मध्ये बोर होण्या पासून वाचवतील, व तुम्ही या चॅलेंज मध्ये तुमच्या मित्र-मैत्रिणींना सहभागी (TAG)  करून त्यांना पण चॅलेंज करू शकता! तुम्हाला आमचा हा विषय आणि त्यावरची माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. आणि तुम्हाला सर्वात जास्त कुठला चॅलेंज आवडला ते ही नक्की कळवा!

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here