आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===


ह्या सवयी तुम्हाला लॉकडाऊन काळात आरोग्यदायी राहण्यास मदत करतील !


 

आता परत एकदा लॉकडाऊन होणार कि काय?  असा विचार सर्वांच्याच मनात येत आहे. आपन सध्या प्रशासन ज्या नियमावली जाहीर करत आहे त्यांचे पालन करणे जरुरी आहे.

 

new google

आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत ज्या  तुम्हाला लॉककडाऊनमध्ये फिट राहण्यात मदत करतील! या टिप्स खूप सोप्या असून तुम्हाला हे तुमचं काम सोडून किवा मोकळा वेळ काढून करण्याची गरज नाही आहे.तुम्ही घरी बसल्या बसल्या या टिप्स वापरू शकता, आणि लॉकडाउनचा पूर्ण वापर करून तुमच्या तबेतीची काळजी घेऊ शकता.

 

१. मिनिटचा ब्रेक 

 

लॉकडाऊनमध्ये  वर्क फ्रॉम होम मुळे सगळे लॅपटॉप, बेडवर घेऊन बसतात आणि त्यामुळे पाठ आणि अंग दुखी सुरू होते. आशया वेळी तुम्ही टेबल-खुर्ची वर बसा आणि काम सुरू करण्याच्या अगोदर २५ मिनिटाचा अलार्म लाउन ठेवा. २५ मिनिटानंतर अलार्म वाजला की तुम्ही उठून 5 मिनिट उठून घरातल्या घरात चालून या, या मुळे तुमचं जे ‘sitting-fat’ कमी होते आणि संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीराला चालना मिळते.

 

या टेक्निकमुळे तुम्ही नियमितपेन काम पण करू शकता आणि तुम्हाला व्यायामासाठी सुधा वेळ मिळतो. सुरवातीला तुम्हाला सवय लागायला थोडा वेळ लागेल पण एकदा सवय झाली की तुम्ही स्वतः अलार्म न लावता चालने किंवा दुसर्‍या प्रकारचे व्यायाम कराल.

२. चिट्टया

 

 बरेच लोकं लॉकडाऊन मुले सकाळी लवकर उठत नाहीत. अश्या लोकांसाठी हि आयडिया मस्त आहे.लॉकडाऊनमध्ये उठून व्यायाम करायला खूप कंटाळा येतो आणि दर रोज तोच व्यायाम केला तर शरीर सुद्धा वजनामध्ये फरक दाखवणं बंद करत. अश्यावेळी  तुम्ही तुमच्या आवडीचे व्यायामाचे प्रकार एका कागदावरती लिहून,रोज सकाळी एक चिट्टी वाचून ते व्यायाम करू शकता.

 

यामुळे दर रोज तुम्हाला नवीन नवीन व्यायामकरण्याचा उत्साह पण राहील व उद्या काय व्यायाम करावा हा प्रश्न देखील पडणार नाही. चिट्टयामध्ये तुम्ही योगा, एरोबीक्स,झुमबा, वेट लिफ्टिंग अशे अनेक प्रकारचे व्यायाम लिहू शकता ज्यामुळे तुमच्या सर्व शरीराचा व्यायाम होऊ शकतो.

3.घरातील कामे 

 

लॉकडाऊनमध्ये सगळे घरीच असल्यामुळे घरातील कामे पण वाढले आहेत आणि अश्यावेळी आपल्याला मदतीच्या हाताची गरज आहे. घरातील काम जसे फारशी पुसणे किंवा झाडू मारणे हे पूर्ण शरीरसाठी अत्यंत सोप्पे आणि प्रभावी मार्ग आहेत. एक दिवस आड जर तुम्ही व्यायाम व घरातले काम असा वेळापत्रक बनवला तर तुमचं शरीर आणि घर दोन्हीचे फायदे आहेत. घरातील काम कारचा अजून एक फायदा हा आहे की तुम्हाला कठीण व्यायाम करायला जमात नसेल त्यांच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे. रोज अर्धा ते एक तास जरी घरातली कामे केली तरी तुमच्या पूर्ण शरीरा साठी उत्तम आहे.

लॉकडाऊन
लॉकडाऊन

4. वेळापत्रक

 

लोकडाउनमध्ये दिवस संपून रात्र कधी निघून जाते हे कळतच नाही कारण आपण पूर्ण दिवसाचा वेळापत्रक बनवत नाही आणि व्यायामासाठी आपल्याकडे वेळ उरत नाही. वेळापत्रक बनवण्याचे फायदे खूप आहेत, ज्यामुळे तुम्ही व्यायामासाठी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढून बाकीचा वेळ ईतर कामानसाठी देऊ शकता.

 

वेळापत्रकमध्ये कमीतकमी दररोज 45 मिनिट व्यायामासाठी देने गरजेचे आहे. वेळापत्रक बनवण्याने तुम्ही पूर्वा दिवसाचा वेळ वेग-वेगळ्या छंदानसाठी पण देऊ शकता आणि एक रात्री अगोदर योजना केली तर तुम्हाला तुमचं पुढचा दिवस अजून उत्पादकतेने घालवता येईल. तुमच्या वेळापत्रक मध्ये दर आठवड्याला एक दिवस आरामासाठी पण ठेवा ज्यानेकरून तुमच्या शरीराला आराम मिळेल व तुम्ही शरीराला

 

बरे होण्याची पण संधी देऊ शकता. वेळापत्रक 21 दिवस नियमाने पाळल्याने याची तुम्हाला कायमची सवय होऊन तुम्हाला स्वतः तुमच्या शरीरा मध्ये होणारे चांगले बदल दिसतील.

5. मानसिक आरोग्य

 

शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आरोग्य देखील तेवढाच गरजेचे आहे. लोकडाउनमध्ये रोज आपल्याला बातम्या ऐकून तनाव आणि भितीचं वातावरण आहे आणि आशया परिस्थितिमध्ये मानसिक आरोग्य जपणे अत्यंत गरजेचं झाला आहे. प्राणायाम आणि योगा हे दोन गोष्टी मानसिक आरोग्य जपण्यासाठी मदत करतात.

 

ध्यान करून पण तुम्ही मानसिक बल वाढवून तुमच्या मनाला शांत करू शकता व आता असलेल्या संकटाला शांत राहून सामोरी जाऊ शकता. ध्यान करण्यासाठी तुम्ही सरी सरी रवी शंकर यांच्या Instagram वर https://www.instagram.com/srisriravishankar/ दर रोज 12 वाजता दुपारी आणि 7 वाजता संध्याकाळी   ध्यान करू शकता आणि हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप लाभदायी ठरेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here