आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | इंस्टाग्राम
===

कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हयात परत एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.  या विषाणूने मागील काही महिन्यांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोणाबद्दल काही लोकांनी अचंबित करणाऱ्या अफवा पसरवल्या आहेत. या अफवांपैकी काही तर अतिशय हास्यास्पद आहेत. चला तर जाणून घेऊयात अशाच काही अफवांबद्दल…

 

गेल्या सुमारे तीन चार महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे जग थांबल्यासारखे झाले आहे.

 

इंटरनेट, सोशल मीडियाचा बेसुमार वापर करण्याचा या काळात आणखी एका संसर्गाने जगाची झोप उडवली आहे. तो संसर्ग म्हणजे खोट्या बातम्यांचा, अफवांचा… मोठ्या प्रमाणावर माहितीचे आदान प्रदान होत असताना अविवेकी बुद्धीने पुढे पाठवलेल्या बातम्यांमुळे अनेक अफवा पसरल्या आहेत.

 

यातल्या काही अफवा तर अत्यंत हास्यास्पद आहेत. अशाच काही अफवा आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

new google

१. लसूण खाल्ल्याने कोरोना होत नाही.

 

garlic yuvakatta
garlic yuvakatta

 

लसणाचे औषधी गुणधर्म अनेक असले तरी लसूण खाल्ल्याने कोरोना व्हायरसची बाधा होत नाही याला कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. आधुनिक वैद्यकशास्त्राने याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे भरपूर लसूण खाल्ल्याने कोरोनाची बाधा टाळता येते ही अफवा आहे.

 

२. चीनमधून वस्तू मागवल्याने त्यातून कोरोनाची बाधा होऊ शकते.

 

chinese-product_yuvakatta
chinese-product_yuvakatta

 

चीनमधून आपण एखादी वस्तू मागवतो तेव्हा ते भारतात यायला अनेक आठवडे लागतात. तसेच पुठ्ठ्याचे आवरण घालून पॅक केलेल्या बॉक्सवर कोरोनाचा विषाणू फार काळ टिकत नाही. त्यामुळे चीनमधून उत्पादने मागावल्याने कोरोना होत नाही.

 

३. व्हिटॅमिन C कोरोना व्हायरसला प्रतिबंध करते

 

vitamin-c-yuva katta
vitamin-c-yuva katta

 

व्हिटॅमिन C असलेले पदार्थ खाणे काही वाईट नाही, जोपर्यंत ते आपण प्रमाणात खातो. पण प्रमाणाबाहेर हे पदार्थ खाल्ल्याने माणसाच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण व्हिटॅमिन C च्या सेवनाने कोरोना व्हायरस होत नाही या गोष्टीला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नका.

 

४. त्वचेवर क्लोरीन किंवा अल्कोहोल शिंपडल्याने कोरोना विषाणू मरतो.

 

Alochol-chlorine yuva katta
Alochol-chlorine yuva katta

 

हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हँड सॅनिटायजरमध्ये काही प्रमाणात अल्कोहोलचा वापर केला जात असल्याने जी अफवा पसरली असावी. पण क्लोरीन किंवा अल्कोहोल हे पदार्थ थेट त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला इजा होऊ शकते. हे लिक्विड इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जाऊ शकतात पण त्वचेवर त्यांचा वापर करणे हानिकारक आहे. क्लोरीन किंवा अल्कोहोल त्वचेवर शिंपडल्याने कोरोना व्हायरस मरत नाही.

 

५. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो.

 

chicken yuva katta
chicken yuva katta

 

या एका अफवेमुळे तर महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांचे गेल्या काही दिवसात अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरस हा कोंबडीमार्फत पसरत नाही. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची बाधा होत नाही. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नका. मनसोक्त मांसाहार करा. अंडी, चिकन हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत.

 

६. निरम्याच्या पाण्याने चूळ भरली की कोरोनापासून बचाव होतो. 

 

0_WASHING-POWDER-530532
0_WASHING-POWDER-530532

कपडे धुण्याची पावडर पाण्यात घालून त्याने चूळ भरल्याने कोरोनाची बाधा होत नाही ही आणखी एक अफवा. वॉशिंग पावडर कपडे धुण्यासाठी बनवली गेलेली असते. माणसाने चूळ भरण्यासाठी नव्हे. वॉशिंग पावडरने चूळ भरल्याने कोरोना व्हायरस मरतो ही अफवा आहे. असे काहीही करू नका.

 

७. भारतात चायनीज पदार्थ खाल्ल्याने कोरोना होतो.

 

chinese-food

 

भारतात चायनीज बनवणाऱ्या, विकणाऱ्या लोकांचा आणि चीनचा काहीही संबंध नाही. चायनीज शॉप चालवणारे बहुतांश लोक भारताच्या पूर्वांचल भागातून आणि नेपाळमधून आलेले आहेत. चायनीज बनवताना वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू भारतात बनवल्या किंवा पिकवल्या जातात.

 

त्यामुळे अशा पदार्थातून कोरोनाची बाधा होण्याची दूर दुरुनही शक्यता नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, तुमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ नेहमी खा!

 

या होत्या कोरोना व्हायरस संबंधी पसरलेल्या काही अफवा. काही घातक तर काही हास्यास्पद. या अफवांपासून सुटका मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक एक गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे. ती म्हणजे, आपल्याकडे कोणत्याही माध्यमातून एखादी माहिती येते तेव्हा ती कुठून आली, तिचा स्रोत काय, तो विश्वासार्ह आहे का हे तपासून मगच त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याशिवाय ती माहिती पुढे पाठवणे थांबवले पाहिजे. तरच आपण या अफवांपासून दूर राहू शकू.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here