आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. अक्षय्य तृतीया नंतर प्रामुख्याने बाजारात आंबे यायला सुरुवात होते. आंब्याच्या अनेक जाती बाजारात उपलब्ध असतात. तोतापुरी, कर्नाटकी वगैरे.. पण या सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो म्हणजे अस्सल कोकणी हापूस आंबा!

फळांचा राज म्हणजे आंबा आणि आंब्यांचा राजा म्हणजे हापूस! आज कोणत्याही बाजारपेठेत गेल्यावर हापूसचा दर काय चाललाय? हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. मग त्यानंतर नंबर येतो तो दुसऱ्या आंब्यांचा. सर्व आंब्यांमध्ये हापूसचा भाव तसा अधिकच वधारलेला असतो. पण हापूसशिवाय इतर प्रजातीचे आंबे देखील मिळतात. पण हे आंबे नक्की ओळखायचे कसे?

बाजारात आंबा विक्रेते रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कोणताही आंबा गिऱ्हाईकांच्या माथी मारतात.

गिर्हाईकांना पटवून देऊन त्यांची लूट केली जात आहे.त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. अस्सल रत्नागिरी हापूस ओळण्यासाठी पुढील गोष्टीचा पडताळा करा आणि कोकणी हापूसच्या नावाखाली आणि हापूसच्या भावात इतर आंबे घेण्यापासून होणाऱ्या फसवेगिरीला बळी पडू नका.

 हापूस आंबा
हापूस आंबा

अतिशय मधुर आणि तेवढाच महाग म्हणून ख्याती असलेल्या या आंब्याचं शास्त्रीय नाव अल्फान्सो आहे. अल्फान्सो दि आल्बुकर्क या अधिकाऱ्यानं पोर्तुगीजांच्या राजवटीत आंब्याच्या जातीच्या एका झाडाचे दुसऱ्या झाडात कलम करून हापूस या आंब्याची नवीन जात तयार केली. पण कालांतरानं अल्फान्सो या शब्दाचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषेमध्ये त्याला हापूस हे नाव मिळालं.

या आंब्यांमध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस असे दोन प्रकार आहेत.

रत्नागिरी हापूसला एक वेगळाच सुगंध असतो,आंब्याच्या जवळ जाताच त्याचा सूगंध दरवळू लागतो. आंब्याच्या देठाचा वास घेऊन पाहिल्यास मस्त वास येतो तर दुसऱ्या आंब्याच्या देठाचा वास येत नाही हे आंबा ओळखण्याचे महत्वपुर्ण वैशिट्य म्हणावे लागेल. तसेच बाजारातील इतर आंब्याच्या तुलनेत रत्नागिरी हापुसला वैशिष्टपूर्ण आकार असतो, खालच्या बाजूस देखील या आंब्याचा आकार गोलाकार जाणवेल,इतर आंब्याला खाली टोक आल्यासारखे जाणवेल.

रत्नागिरी आंबा कापल्यावर आतील बाजूस केशरी रंगाचा दिसतो ,तर इतर आंबा पिवळसर रंगाचा असतो. तुम्हाला दोन्हीच्या चवीतही फरक जाणवेल. आणखी एक ओळखण्याची पद्धत म्हणजे आंब्याची साल, रत्नागिरी हापूसच्या साली पातळ असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आंबे खरेदी करताना नक्की पडताळून पाहा.

आंबे लवकर पिकावे यासाठी व्यापारी केमिकलचा वापर करतात. या केमिकलयुक्त फळापासूनही तुम्ही वाचू शकता.

फक्त आंबे खरेदी करताना पुढील पडताळणी करा. नैसर्गिकरित्या पिकणारे आंबे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात, तर नुसते पिवळे दिसणारे आंबे हे केमिकलचा वापराने पिकवली जातात. त्यामुळे ती आतील बाजूस केशरी न दिसता पिवळसरच दिसतात.तसेच चमकदार फळे कधीही घेऊ नका ती केमिकलच्या वापराने चकाकू लागतात आणि आपण नेमके त्यालाच भुरळून जातो.

इतकेच नव्हे तर रस्त्यावर मिळणाऱ्या आंब्याच्या रसातही पावडरचा वापर केलाजातो. जवळपास १०० रुपयांना किलोभर आंबे मिळतात मग २५० ग्रॅम आंब्याचा रस फक्त १० रुपयांना मिळणे हे अशक्य.

रस्त्यावर जूस प्यायचा असेल तर तो उसाच्या रसाचा प्यावा. कारण उसाच्या रसात कोणत्याही प्रकारची भेसळ करता येत नाही शिवाय शरीराला तो खूप लाभदायक असतो.

हापूस आंबा हा एक आंबा प्रजातील राजा आहे, हापूस आंबा तो पण देवगड परिसरातील असेल तर सोन्याहून पिवळं अस म्हणू शकतो. पण आज काल देवगड हापूसच्या नावावर कुठला पण आंबा खपवून देतात.

 हापूस आंबा
हापूस आंबा

 

तसा कोकणातला कुठला पण आंबा हा चवीला छान असतो. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात असणाऱ्या सगळ्या हापूसच्या जाती ह्या सुरेख चवीच्या पण आधी सागितलं तस हापूस तो देवगडचा, जस गायनात किती आशा भोसले यांच्या आवाजात जे माधुर्य आहे ते इतर कुठल्याही गायिकेत मिळणार नाही तस.

नैसर्गिक रित्या पिकवलेल्या ( जो गवताच्या अढी मध्ये घालून ) आंब्याचा घमघमाट हा तुम्हाला 10 फुटवरून पण येतो, पण व्यापारी जे कृत्रिम रित्या पिकवतात त्याचा सुगंध नाका जवळ नेऊन सुद्धा येत नाही, साल अतिशय नाजूक असते पिवळसर आणि चकचकीत.

खरा हापूस किती पण पिकला तरी तो लवकर खराब होत नाही, फक्त त्याची सालीवर सुरकुत्या येतात. कर्नाटकी हापूस आंबा हा शेंड्याकडे थोडा लालसर असतो,

शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर त्या मध्ये कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्या वरून सुद्धा तो कुठल्या भागातून आला आहे हे कळते ( त्या साठी लाकडी पेटीतील आंबा पहावा लागेल) कारण आता १-२ डझनाच्या पेट्या येतात. शेवटी अनुभव कामी येतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे हि वाचा.. अस्सल-केशर-ओळखावं-तरी-कसं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here