आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारताने देशभरातील  लॉकडाउन आणखी एका पंधरवड्यापर्यंत वाढविला, परंतु सरकार ने असे जाहीर केले आहे की,घरकाम करणा-या मोलकरीणी,घरगडी व मदतनीस कामावर येऊ शकतात. या निर्णयामुळे कोट्यवधी मध्यमवर्गीयांना हा प्रश्नपडला आहे कि मोलकरणीना कामावर बोलवायचे की नाही?
जर गृहणीला तिचा नवरा आणि तिची कामवाली या दोघात निवड करायची असेल तर ती
आपल्या कामवालीची निवड करेल, असे विनोदाने म्हंटले जाते. परंतु भारतीय गृहणी त्यांच्या
कामवालीवर किती अवलंबून आहेत हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अधिकृत माहिती नुसारनिण
मध्यमवर्गीय आणि श्रीमंत भारतीयांच्या घरात कोट्यावधी स्त्री व पुरुष , मोलकरीण व घरगडी
म्हणून काम करतात .अनधिकृतरित्या अंदाजे ही संख्या तब्बल पाच कोटी इतकी आहे. या
कामगारांपैकी दोन तृतीयांश कामगार या महिला आहेत.

घरकाम करणारे नोकर व मालकीण/मालक हे परस्परावर आवलंबून असतात. हे सर्व कामगार ग्रामीण भागातून आलेले अत्यंत गरीब व अकुशल कामगार असल्यामुळे ते कमी पगारावर काम करतात.कमी वेतनामुळे हे कामगार
घरकामासाठी ठेवणे हे मध्यमवर्गीयांना परवडते त्यामुळे घरकाम करून ते आपल्या संसारिक गरजा पूर्ण करतात.

परंतु गेल्या सहा आठवड्यांपासून कोरोनाव्हायरसची लागण रोकण्यासाठी
भारत सरकारने कडक संचारबंदी लागू केल्यामुळे कोट्यवधी मध्यमवर्गीय लोक आपली कामे
स्वयंपाक,भांडी घासणे,घर साफ ठेवणे इत्यादी नोकराशिवाय करावी लागत आहेत.
बहुतेक लोकांनी ही कामे काय फक्त तीन आठवड्यासाठी आहेत म्हणून आनंदानी स्वीकारली
आहेत .एवढेच नव्हे तर बॉलिवूडच्या काही स्टार्सनी स्वतःचे स्वयंपाक, साफसफाई आणि डिशेसचे
साफ करतानाचे इंस्टाग्राम व्हिडिओ पोस्ट केले आहेत व करत आहेत. परंतु हा उत्साह काही फार
काळ टिकेल असे वाटत नाही कारण लॉकडाऊन दोनदा वाढविण्यात आल्याने व आता आजून
किती वाढविला जाईल याची कल्पना नसल्याने नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे घरची कामे
करणे जड जात असल्याने मध्यमवर्गीय भारतीयाना आपल्या नोकरांची गरज जाणवायला लागली आहे.

तसेच एकटे रहाणारे व आजारी असणारे वृद्ध लोकांना दैनंदिन कामे सांभाळणे जड जाऊ
लागलेय यावर आता चर्चाही होऊ लागलीय तसेच कामे नसल्यामुळे घरकाम करणा-या लोकंची
उपासमारही होत आहे. Helper4U online पोर्टलच्या मीनाक्षी गुप्ता यांच्या सांगण्यानुसार
बऱ्याच कामगारांनी नोकरी गमावलीय तर काही जणांना लॉकडाऊन कालावधीतील पगार दिला नाही.
पुढे त्या म्हणाल्या की गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या कोविड हेल्पलाईन व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर
दररोज सरासरी १० ते १५ मेसेज ड्रायव्हर , स्वयंपाकी व इतर नोकरदाराकडून मदतीच्या अपेक्षेने
येत आहेत.

 

the maid
श्रीमती गुप्ता जैन पुढे म्हणाल्या  की त्यांच्याकडील पैसे संपले आहेत.
आम्ही काय करावे? आम्ही आमच्या मुलांना कसे जेवायला देऊ? मग आम्ही त्यांना त्यांच्या
परिसरातील स्थानिक सेवाभावी संस्थांशी संपर्क करण्यासाठी मार्गदर्शन करतो, ज्या संस्था त्यांना
विनामूल्य रेशन व स्वयंपाक गॅस मिळवून देण्यास मदत करू शकतात.

सोमवारी पुन्हा काम सुरू करणार्‍या दिल्लीत घर कामगार असलेल्या सोनिका वर्मा म्हणाल्या
की, तिच्या मालकांनी लॉकडाऊन कालावधीतही पगार दिल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजते.
लॉकडाऊन कालावधीमध्ये मी खूपच चिंताग्रस्त होते. माझा नवरा ऑटो रिक्षा चालवतो, पण तो
घरी बसून आहे कारण ऑटोला लॉकडाऊन कालावधीमध्ये चालण्यास परवानगी नाही. लॉकडाऊन
कालावधीमध्ये मी सुद्धा कामावर जाऊ शकले नाही व मला खूपच भीती वाटत होती की माझीही
नोकरी गेली तर आपण जगणार कसे.
तिची बहिण म्हणाली कि तिला लॉकडाऊन कालावधीमध्ये पगार मिळाला नाही ज्या घरी ती
काम कर त्यां मालकांनी मार्च मध्ये जेवढे काम केले तेवढ्या दिवसांचेच पैसे दिले तर एप्रील
महिन्याचे काहीच पगार दिला नाही .एवढेच नव्हे तर आजून कामावर बोलविलेसुध्दा नाही. असे
ती म्हणाली. तिच्या बहिणींना अद्याप कामावर परत न बोलावण्यामागील कारण म्हणजे अनेक
निवासी संस्था मध्ये घरगुती कामगारांना घरात येऊ देणे शहाणपणाचे आहे की नाही याबद्दल
वाद सुरू आहेत.

काहींनी असे मत आहे की निर्बंध दूर होऊ शकतात, परंतु कोरोनाव्हायरस नष्ट झाला नाही?
आणि जर का बाहेरून येणाऱ्या लोकांनी प्राणघातक कोविड -१ virus विषाणू आणला तर? त्यामुळे
काही निवासी संस्थातील गट घर कामगारांना परत बोलाविण्यासाठी विरोध करत आहेत.

परंतु,काही निवासी गट म्हणतात की वयोवृद्ध व आजारी लोकांना स्वताची कामे स्वत करणे खूप
कठीण जाते, तसेच त्यांच्याकडे डिशवॉशर्स आणि वॉशिंग मशीन सारख्या गॅझे नाहीत व असले
तरी त्यांना वापरता येणे शक्य नाही तेव्हा अशा लोकांच्या गरजा दुर्लक्षित केल्या जाऊ शकत
नाहीत.त्यामुळे घरकाम करणाऱ्या कामगारांना कामावर बोलवायला हरकत असू नये.
ATS Greens building society चे प्रेसिडेंट अनिल तिवारी म्हणाले की आम्ही घरकाम कामगारांना
सोसायटीमध्ये काम करू देण्यास सकारात्मक विचार करत आहोत. आमच्या सोसायटीमध्ये ७३५
अपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी बऱ्याच अपार्टमेंट्स मध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच रहात आहेत
त्यापैकी बहुतेक जणांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना
विचारात घ्यावेच लागेल. त्यापैकी ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) कुलदीपसिंग चोककर आहेत. त्यांची
परिस्थिती एकदमच चिंताजनक आहे. त्यांचे वय ८० वर्षे आहे, ते स्वता कर्करोगातून वाचले
आहेत व पेसमेकर ही बसवलेले आहे. ते त्यांची पत्नी ज्यांचे वय ७५ असून त्यांनाही शारीरिक
व्याधी आहेत. आम्ही तरुण असतो तर स्वताची कामे स्वता उत्तम रीतीने केली असती पण
वाढत्या वयामुळे आम्हाला खूपच त्रास होत आहे असे त्यांनी फोनवर बोलताना सांगितले.

लॉकडाऊनपूर्वी त्यांच्याकडे अर्धवेळ मोलकरीण ,कार स्वच्छ करणारा मुलगा व माळी येत
असे.मी जेव्हा त्यांना विचारले तुम्हाला ते परत यावे असे वाटते का? तर ते म्हणाले नक्कीच
त्यामुळे आमचे जगणे सोपे होऊन जाईल. माझ्या शेजारच्या रिटायर्ड शालेय शिक्षिका पिंकी
भाटीया मात्र आजूनही नोकरांना बोलवावे की नाही याबद्दल द्विधा मनस्थितीमध्ये
आहेत.त्यांचीही प्रकृती खूप नाजूक आहे त्यामुळे कुणाच्यातरी मदतीशिवाय घरची कामे करणे
केवळ अशक्य आहे असे त्या म्हणाल्या. परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे
स्वयंपाक, , भांडी झाडू आणि कपडे धुणे हे सर्व स्वताच करत आहे. श्रीमती भाटिया यांचे वय 60
च्या वर आहे व त्यांचे पती ७० वर्षाचे आहेत त्यांना उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा त्रास
आहे.तसेच सरकारने आदेश दिला आहे कि ज्यंचे वय ६० किवा ६० पेक्षा जास्त असेल तर त्यांनी
घराच्या बाहेर पडता कामा नये.

त्यामुळे दोघांनी गेले सहा आठवडे घराच्या बाहेर पाय ठेवला नाही. शेजारांचा ड्रायव्हर आम्हाला जीवनावश्यक साहित्य आणून देत आहे असे श्रीमती भाटीया म्हणाल्या. माझी मुले मुंबई आणि स्वित्झर्लंडमध्ये राहतात. मी त्यांना विचारले, आम्ही काय करायचे? ते म्हणाले, अजून एका आठवड्याची वाट पाहूया आणि काय होते त्यावरून आपण ठरवू
काय करायचे ते .श्रीमती गुप्ता जैन म्हणाल्या की जर तुम्ही भाजीवाले व दुधवाले याना येऊ देता मग आमच्या कामवाल्यांनाच का शिक्षा ? त्यानाही परवानगी द्यावी. वाटले तर खबरदारी
म्हणून त्यांना मास्क , कपडे व सॅनिटायझर्स ध्या पण आता त्यांनी कामवर यायला हवे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here