आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लॉकडाउनच्या काळात बऱ्याच सिरीज रिलीज झाल्या. पण सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे सुदीप शर्मा लिखित,आणि अनुष्का शर्मा निर्मित “पाताल लोकची”.

अभिनेत्री अनुष्का शर्मानी निर्मिती केलेल्या “पाताल लोक ” सिरीजची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.उत्कृष्ट कंटेन्ट आणि उत्तम प्रोडक्शनमुळे पाताल लोक सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे. अनुष्का शर्माच्या चाहत्यासह सिनेमा समीक्षकही पाताल लोकच्या प्रेमात पडले आहेत. ज्यांनी ही  सीरिज पहिली ते सिरीजच तोंड भरून कौतुक करत आहेत.

क्लीनस्लेट फिल्मज सोबत अनुष्का शर्मा वर तिचा भाऊ कर्णेष यांनी मिळून पाताल लोक ची निर्मिती केली आहे.
अनुष्का शर्माच्या म्हणण्यानुसार पाताल लोकच्या यशाचं कारण हे त्याचा कंटेन्ट मध्ये असल्याच समजते. सध्याच्या काळात उत्तम प्रकारचं कथानकच महत्वाचं असते.एक कलाकार आणि निर्मात्यांनी कायमच काहीतरी अनोख आणि हटके करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यातूनच पाताल लोक सारखी सिरीज उभी राहू शकते.

anushka-sharma-paatal-lok-release-date

अनुष्का शर्माचं प्रोडक्शन हाऊस नवीन आहे. तरी सुद्धा एवढी छान सिरीज तयार करणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
अभिनेता जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बॅनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, ईश्वाक,आसिफ बसरा या कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका पार पडल्या आहेत.

कसलीही कसर न सोडता कलाकारांनी मन लावून काम केल असल्याच दिसतंय एकंदरीत या सर्वांचा फायदा सिरीज हिट होण्यासाठी झाला आहे. अनुष्का शर्माने या यशाचे संपूर्ण श्रेय टीमच्या मेहनतीला दिल आहे.सीरिजच्या दोन्ही दिग्दर्शक अरुण डावरे आणि प्रोसीत रॉय यांचं सुद्धा कौतुक करायला अनुष्का विसरली नाहीये.

अतिशय उत्तमरीत्या कथानक स्क्रिनवर सादर करून लेखक सुदीप शर्मा यांनी त्यांच्या हटके आणि अनोख्या दृष्टिकोनातून ही हटके सिरीज बनली आहे.

 

हाथिराम चौधरी या पोलीस अधिकाऱ्याची कथा या सिरीज मध्ये दाखवण्यात आली आहे. याच्यावर एका टॉपच्या पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असतो.या प्रकरनातून तो स्वतःला कस सिद्ध करतो? तो यात यशश्वी होतो का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही ही सिरीज नक्की पाहा….

एकंदरीत “पाताल लोक” प्रेक्षकांना चांगलीच भावली असून जो तो या उत्कृष्ट सिरीजचा चाहता बनला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here