आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लॉकडाऊन मध्ये हे 3 थ्रिलर सिनेमे नक्की पहाच…

मागील बऱ्याच दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे बरेच जण घरातल्या घरात बसून बोर होत आहेत. काही जण आपला वेळ सोशल मीडियाचा वापर करून घालवत आहेत , तर काहीजण सिनेमा, सिरीज पाहण्यात घालवत आहेत. सिनेमामध्ये सुद्धा काही जणांना लव्हस्टोरी,काही जणांना ऍक्शन, तर काही जणांना ड्रामा,
अशे सिनेमे आवडतात.प्रत्येकाची आवडतं, पसंद वेगवेगळी असू शकते.

बॉलीवूड आणि साऊथ सिनेमा इंडस्ट्रीच्या सिनेमांमध्ये  नेहमीच “काटेकी टक्कर” चालत आलेली आहे.साऊथचे सिनेमे हे मुळात जास्त तर ऍक्शन सिनेमे म्हणून पहिले जातात.त्याबरोबरच साऊथ इंडस्ट्री मध्ये असे काही निर्माते आहेत,ज्यांनी साऊथ सिनेमांना ऍक्शनसह सस्पेन्सआणि थ्रिलनी भरून काही ब्लॉकबास्टर, रेकॉर्डब्रेकिंग,सिनमा बनवले आहेत.

आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडस्ट्रीच्या ३  सिनेमांबद्दल सांगणार आहोत,जे सिनेमे सस्पेन्स आणि थ्रिलरनी पुरेपूर भरलेले आहेत. ज्यांना सस्पेन्सनी भरलेले सिनेमा पाहायला जास्त आवडते अश्यानी तर हे सिनेमे नक्कीच पहायलाहवेत. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे सिनेमे.

ratsasan

१)रतसासण (ratsanan)

रतसासण साऊथ इंडस्ट्री मधील आतापर्यंतचा बेस्ट थ्रिलर सिनेमा आहे.सिनेमाची स्टोरी
सिरिअल किलर वर असून, तो एका पाठोपाठ एक शाळेतील मुलींचा मर्डर करत असतो.
सिनेमातील थ्रिल, आणि सस्पेन्सचा अनुभव अंगावरती काटा आणणारा आहे.
एखाद्याचा सारखा केलेला अपमान त्याला एवढा मोठा सिरीयल किलर बनवायला पुरेसा असतो हेच या सिनेमातुन दाखवून दिल आहे. हा सिनेमा पहिल्या नंतर तुम्ही साऊथच्या थ्रिलर सिनेमाच्या प्रेमात नक्की पडाल याची ग्यारंटी आमची. जबरदस्त ऍक्शन,
सिनेमात येणारे वेगवेगळे मोड, यामुळे सिनेमा अजूनच जास्त भारी बनला आहे. शेवटपर्यंत थ्रिल असणारा हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहायला हवा..

 

uturn-review-12918m

2) यु-टर्न (U turn)

यू-टर्न सस्पेन्स आणि थ्रीलच अनुभव देणारा दुसरा  जबरदस्त सिनेमा आहे.ट्राफिक नियम तोडून
वाहन चालवणाऱ्या लोकांमुळे तिचा व तिच्या मुलीचा जीव गेलेल्या एका आईच्या बदला घेण्याचा प्रवास असलेला हा सिनेमा ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांनी एकदा अवश्य पहायला हवा एक पत्रकारआणि पोलीसवाला मिळून एका मागे एक होणाऱ्या खुनाचा शोध लावण्याच  काम करतात.यू-टर्न यूट्यूबवरती हिंदी डबमधे पाहायला मिळेल.हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही ट्राफिक नियम तोडण्याअगोदर एकदा नक्की विचार कराल 😃😃

 

mayavan-stills-photos-pictures-25

3) मायावन (maayavan)

2019 मध्ये रिलीज झालेली मायावन एक साऊथ थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमाची स्टोरी एका साइनटिस्ट वर असून
एका शरीरातून दुससऱ्या शरिरात ब्रेन ट्रान्सफर करून
तो हजारो वर्ष जगण्याचं त्याच स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे असतो. यामध्येच तो 4/5 जणांचे मर्डर करतो.
कमी ऍक्शन असलेला पण चांगली कथा असलेला हा सिनेमा साऊथ इंडस्ट्रीमधील 2019 चा एक बेस्ट सिनेमा म्हणून नावाजला आहे.
आधुनिक युगात वैज्ञानिक,आणि ते लावू शकणारे शोध याचा चांगला अनुभव तुम्हाला या सिनेमामधून मिळेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here