आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जर्मन शाषक हिटलर आपल्या क्रूर स्वभावामुळे सर्वत्र प्रसिद्ध होता.

तो “नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (एनएसडीएपी) चा  नेता होता.. हा पक्ष बर्‍याचदा “नाझी पार्टी” म्हणून ओळखला जातो.  दुसर्‍या महायुद्धासाठी हिटलरला सर्वात जबाबदार मानले जाते. त्याच्या आज्ञेनुसार नॅटसी सैन्याने पोलंडवर आक्रमण केले तेव्हा दुसरे महायुद्ध झाले. फ्रान्स आणि ब्रिटनने पोलंडला सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते आणि वचन दिल्याप्रमाणे त्या दोघांनीही नाझी जर्मनीविरूद्ध युद्ध घोषित केले.

 

25 एप्रिल रोजी त्यांनी आपला वैयक्तिक अंगरक्षक हेन्झ लिंगेला फोन केला आणि “मी स्वतःला गोळी मारताच तू माझा मृतदेह चान्सरी बागेत नेऊन ठेव.  माझ्या मृत्यूनंतर मला कोणी पाहिले नाही पाहिजे. तुम्हाला ओळखता आले नाही पाहिजे. त्यानंतर तू माझ्या खोलीत परत जा आणि माझा गणवेश, कागद आणि मी वापरलेले सर्व गोळा करुन बाहेर जा आणि ते पुरावे नष्ट करून  टाक अस सांगितल होते.

 

हिटलर

 

हिटलरमुळे बरेच लोक मरण पावले. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या मनुष्याने आपल्या नावाची भीती बाळगणारी माणसे आणि जगावर क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडली ती व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी होती. एवढेच नव्हे तर त्यांनी प्राणी क्रौर्याविरूद्ध कायदा देखील बनविला होता.

 

मग हिटलर नी खरोखरच आत्महत्या केली होती का? का तसा बनाव केला होता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

जगातील सर्वांत क्रूर समजला जाणारा हिटलर याच्या मृत्यूविषयी बरेच तर्कवितर्क लावले जातात. सर्वांनाच माहिती आहे की हिटलरनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती, पण ते कितपत खरं आहे? का यात काही तथ्य आहे? यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

 

कारण simoni rene guerreiro dies या लेखिकेने “हिटलर इन ब्राझील ” या आपल्या पुस्तकामध्ये काही असेल दावे केले आहेत. ज्यावरून खरंच हिटलरचा मृत्यू आत्महत्या करून झाला का यावर शाशंकता व्यक्त होत आहे.तिच्या म्हणण्यानुसार हिटलर ने संपूर्ण जगाला चांगलाच चकवा दिला आहे.

 

हिटलर

 

लेखिकेच्या म्हणण्यानुसार हिटलरनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली नाही. तर तिथून तो थेट ब्राझील ला आपल्या गर्लफ्रेंड सोबत गेला. आणि तिथे वयाच्या 95 व्या वर्षापर्यंत नाव बदलून राहिला. तेथील लोकांना हिटलर बद्दल फक्त एवढंच माहिती होत की तो एक जर्मनीचा रहिवासी आहे.

 

हिटलरच शव ज्या खोलीत मिळालं ते शव त्याच नसून तो हिटलरनी रचलेला एक डाव होता.हिटलरनी एका दुसऱ्यांच व्यक्तीचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या केल्याचं भासवलं होत असा दावा लेखिकेने आपल्या पुस्तकात केला आहे.

 

लेखिकेने केलेल्या या दाव्यामुळं अनेकजण तिच्यावर राग तरी काहीजण तिच्या दाखवलेल्या पुराव्यावर विश्वास ठेवत आहेत.
त्यामुळं एकंदरीत हिटलरनी खरंच आत्महत्या केली होती का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

 

कोणत्याही लेखिकेने या इतिहासकारणे हिटलरच्या बाबतीत असा दावा करणं ही काही पहिली वेळ नाही या आधीही काही पत्रकार व इतिहासकार यांनी देखील ,अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा शोध घेत होते.असं म्हटलं आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here