आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

केशर खरेदी करतांना या गोष्टीची पडताळणी नक्की करा, नाहीतर फसवले जाल…


केशराचा वापर करण्याची परंपरा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. केवळ खाद्यपदार्थांमध्ये नाही, तर औषधी म्हणून, सौंदर्य प्रसाधानांमध्येही केशराचा वापर केला जात असतो.

केशराची शेती जम्मू काश्मीर राज्यातील पुलवामा प्रांतामध्ये सर्वाधिक होत असते. केशराच्या फुलांची लागवड साधारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या सुमारास केली जाते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत या झाडांवर फुले येऊन त्यांची तोडणी होत असते.

केवळ भारतामध्येच नाही, तर परदेशांमध्येही केशराला मोठी मागणी आहे. तसेच केशर अतिशय महाग असल्याने याची लागवड करणे प्रत्येकाला परवडणारे नाही.

आजकाल बाजारामध्ये जे केशर मिळते ते अनकेदा नकली असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे केशर खरेदी करताना ते अस्सल आहे किंवा नाही याची पारख करता येणे अगत्याचे झाले आहे. केशर अस्सल आहे किंवा नाही हे कसे ओळखावे या संबंधी काही टिप्स…

केशर
केशर

“केशर ” हा पदार्थाला रंग आणि चव देणारा मसाल्यातील एक घटक मानला जातो. भारतात काश्मीरी केशर प्रचलित आहे तर इराणी केशर हे सर्वात उच्च प्रतीचे केशर मानले जाते.

गरोदर महिलांना दुधातून केशर खायला दिल्यास बाळाची त्वचा उजळते. तसेच ज्यांना खोकला झाला आहे अशानाही केशर फायदेशीर ठरते. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात.

याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात कागदाचे बारीक तुकडे, गवत, मक्याच्या कणसाचे केस, प्राजक्ताच्या फुलांची देठे. इत्यादी पदार्थाची भेसळ होते.

जवळपास ४०,००० फुलांपासून अर्धा किलो केशर मिळते आणि याचमुळे बाजारात केशरची किंमत जास्त मोजावी लागते. या हव्यासापोटी काही व्यापारी केशरच्या नावाखाली प्राजक्ताच्या फुलांच्या सुकलेल्या देठांची विक्री करतात. यासोबतच मक्याचे केस देखील केशर म्हणून खपवली जाताना दिसतात.

म्हणूनच या नकली केशरच्या कचाट्यात सामान्य माणूस नेहमीच भरडला जात असतो. हे होऊ नये यासाठी केशर ओळखण्याची सोपी पद्धत संगीतली जाते ती आपण पाहूयात…

केशराचे तंतू एका टोकाला निमुळते तर दुसऱ्या टोकाला थोडे रुंद असते. त्यामुळे ते सहज ओळखले जाते.

मक्याचे केस हे साधारण आकाराने एकसारखे असतात त्यामुळे ते लगेचच ओळखले जाऊ शकतात. तसेच केशर हातावर चोळल्याने रंग अजिबात लागत नाही. नकली केशरचा रंग चोळल्यावर लगेचच हाताला लागतो.

केशर ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत सांगितली जाते, पाण्यात किंवा दुधात केशर टाकल्यावर हळूहळू रंग सोडते आणि काही वेळाने ते पूर्णपणे विरघळते . लगेचच रंग सोडणे किंवा लगेचच विरघळणे हे बनावट केशर असू शकते. केशरमध्ये प्रत ठरवली जाते.

केशर
केशर – युवाकट्टा

पाण्यात केशर टाकल्यास लगेचच ते तळाशी जाऊन बसते. असे केशर चांगल्या प्रतीचे समजले जाते. तर हलक्या प्रतीचे केशर पाण्यात तरंगते.

केशरात ए जीवनसत्व, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मँगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम आणि इतरही काही पोषक घटक मिळतात. त्याशिवाय केशरात लाईकोपिन, अल्फा कॅटरीन, बीटा कॅरोटीन हे घटकही असतात.

हे घटक काही आजारांपासून शरीराचा बचाव करतात. केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण सौंदर्यासाठीही त्याचा फायदा होतो. केशराचा वापर बहुतेकदा पक्‍वान्‍न तयार करताना केला जातो.

त्याचा रंग आणि स्वाद पदार्थाची लज्जत वाढवतो. केशर प्रकृतीने उष्ण असते. त्यामुळेच केशराचे सेवन हिवाळ्यात करणे लाभदायक असते.

केशराचा केवळ रंगच नाही, तर सुगंधही खास असतो. त्यामुळे अस्सल केशराला विशिष्ट गोडसर सुगंध येतो. या वासावरून केशर ओळखता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी केशराची एक काडी तोंडात टाकून दातांनी हलकेच चाववी. अस्सल केशर चवीला काहीसे कडवट लागते.

आपण खाऊन पाहिलेली काडी जर कडवट न लागता गोडसर लागली, तर केशर नकली असल्याचे ओळखावे. केशराचा सुगंध गोडसर आणि चव कडवट, ही अस्सल केशराची खूण आहे. केशर अस्सल आहे किंवा नाही हे ओळखण्याची आणखी एक पद्धत म्हणजे, केशराच्या दोन काड्या थोड्या पाण्यामध्ये टाकाव्यात.

या काड्यांचा रंग त्वरित पाण्यामध्ये उतरू लागल्यास केशर नकली असल्याचे समजावे. अस्सल केशराचा रंग पाण्यामध्ये त्वरित उतरत नाही. तसेच हे पाणी जितके उकळले जाईल तितका अस्सल केशराचा रंग पाण्यामध्ये हळूहळू उतरतो.

ज्या व्यक्‍तींना नैराश्य येते त्यांच्यासाठी केशर खूप उपयुक्‍त ठरते. केशरामध्ये सेरोटिनन आणि इतर रसायने असतात. त्यामुळे केसर माणसाला आपल्याला अौदासिन्य येऊ देत नाही. रोज केशराचे दूध प्यायल्यास रंग उजळतोच परंतु नैराश्याची समस्याही दूर होते. केशरामध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने व्यक्‍तीचे वय वाढू देत नाही. कच्च्या पपईत चिमूटभर केशर टाकून ते मिसळून चेहर्‍यावर लावल्यास स्वच्छ, निरोगी आणि मुलायम करण्यात मदत होते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here