आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

आंतराष्ट्रीय खेळामध्ये पाकिस्तानला गोल्ड मेडलसाठी बरीच वर्ष मेहनत घ्यावी लागली होती. पाकिस्तान ला पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय मॅचमध्ये गोल्ड मिळवून दिले ते म्हणजे दिन मोहमद यांनी.

 

दिन मोहमद लाहोर शहराजवळ “अत्तोके अवाण” या गावातले आहेत. मोहमद यांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचा सन्मान प्राप्त करून दिला होता. दिन मोहमदनी 1954 मध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत कुस्तीमध्ये मॅच जिंकली आणि पाकिस्तानला पाहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. महत्वाचं म्हणजे पाकिस्तान पहिल्यांदाच या खेळात सामील झाला होता.त्यात पाकिस्ताननी ऐकून 5 गोल्ड मेडल जिंकले होते त्यापैकी 4 हे अब्दुल खालिक,मिर्झा खान, शरीफ बट,आणि मोहम्मद नवाज यांनी जिंकले होते.

 

याच्याच आठवणीत मोहम्मद म्हणाला होता,मी भारत आणि जापानच्या पहेलवानांसोबत मुकाबला जिंकले होते. अंतिम खेळात माझा मुकाबला जपानच्या पहेलवानासोबत होता. त्याला हरवून मी गोल्ड मेडल जिंकले होते. माझ्यासाठी यापेक्षा गर्वाची बाब त्यावेळेस दुसरी कुठलीच नव्हती.
कारण माझ्या देशाचा झेंडा पहिल्यांदा कुठल्यातरी स्पर्धेत फडकत होता.

 

new google

तस पाहिलं तरी आता ते गोल्ड मेडल मोहम्म्द यांच्याकडे नाहीये. मोहम्मदच्या सांगण्यानुसार मनालीवरून परतत असताना एका व्यक्तीने त्यांना ते गोल्ड मेडल घरात ठेवण्यासाठी नाही तर आठवणीसाठी म्युझियममध्ये ठेवा. ते व्यक्ती सरकारी अधिकारी असावा अस समजून मोहम्मद यांनी मेडल त्यांना देऊ केल.

 

त्यानंतर ते व्यक्ती आणि मेडल दोन्हीही कुठे गेले त्यांना सुद्धा माहिती नाही. परंतु असही नाही की मोहम्मद यांच्याकडे आता एकही मेडल सुरक्षित नाहीये 1954 मध्ये राष्ट्रमंडळ खेळात मिळालेलं ब्राँझ मेडल आज सुद्धा त्यांच्याजवळ आहे.

 

जेव्हा पाकिस्तानकडून मोहम्मद यांनी पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकले तेव्हा पाकिस्तानचा आनंद गगनात मावेनासा झाला. मोहम्मदयांची शहरभर हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती.

 

मोहम्मद यांनी पहेलवानी कशी सुरु केली?

 

मोहम्म्दनी पहेलवानीची सुरवात आपल्या गावातच केली होती.पण जेव्हा ते बाटा मध्ये नोकरीं करत होते तेव्हा त्यांची आवड आजून जास्त वाढत गेली. एका दिवशी त्यांनी काही अधिकाऱ्यांसमोर मोठ्या पहिलवानाला हरवलं तेव्हा अधिकाऱ्यांनी तुझी जागा बाटामध्ये नाही तर पहेलवानी मध्ये आहे असं सांगितले होते. त्यांना पहेलवानीमुळेच रेल्वे मध्ये नोकरी मिळाली होती, परंतु कमी पगार असल्यामुळे त्यांनी चालून ती नोकरीं सोडून दिली. शफी पहेलवाननी त्यांना रेल्वे मध्ये नोकरीं लावून दिली होती, त्यावेळेस त्यांना पगार 20 रुपये मिळायचा एवढ्याश्या पगारात घर चालवणे अवघड होत होते.

 

din mohhmad

 

तरीसुद्धा मोहम्मद यांनी हार न मानता आपला लढा सुरूच ठेवला.आणि एका दिवशी अत्यंत बिकट परिस्थितीतुन वर येऊन त्यांनी देशासाठी पहिले गोल्ड मेडल पटकावले. गोल्ड मेडल मिळवून दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तानी सरकार नी त्यांच्या कामाकडे जास्त लक्ष दिले नाही.त्यांच्या गावकर्यांनी त्यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढली परंतु आंतरराष्ट्रीय खेळाडूना जसं सहकार्य सरकारकडून अपेक्षित असते तस कसलंही सहकार्य अथवा मदत त्यावेळेस मोहम्मद यांना पाकिस्तान सरकारकडून मिळाली नाही.

 

जर त्यावेळेस सरकारनी त्यांना मदतीचा हात दिला असता तरी त्यांची आर्थिक अडचण नक्कीच कमी झाली असती. बऱ्याच वेळेस चमकदार कामगिरी करून सुद्धा सरकार आपल्याला काहीच मदद करत नाही हे पाहून मोहम्मद यांनी शेवटी सर्वकाही सोडून देण्याचा निर्णय घेतला. ढाका येथे झालेल्या सामन्यानंतर जेव्हा ते गावी वापस आले तेव्हा ते आतून एवढे तुटले होते की, त्यांनी परत लाहोर ला जायचं नाही असं मनाशी पक्के ठरवलं.

 

दिन मोहम्मद यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला परंतु सर्वाना जास्त कोणी नाराज झाले असेल तरी ती म्हणजे दिन यांची बायको.

 

कारण जेव्हा त्यांचं लग्न झाले तेव्हापासून दिन यांच्या बायकोची इच्छा होती , कधीतरी आंतरराष्ट्रीय सामन्यात ती मोहम्मद यांच्यासोबत जाऊन तिकडे फिरायला, त्यांच्या मॅच बघायला तीला जायचं होत. परंतु मोहम्मद यांच्या सर्वकाही सोडून देण्याच्या निर्णयाने तिच्या हा स्वप्नांवर पाणी फिरले.

 

एकंदरीत कुठल्याही खेळाडूला जर वेळेवरती मदत मिळाली तरी नक्कीच तो देशासाठी चांगले कार्य करून देशाचे नांव रोशन करेल यात शंका नाही…

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here