आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

नेटफ्लिक्स प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन दाखवण्याच्या प्रयत्नात असते.पण अश्या प्रयत्नात कधी कधी जास्तच होत असच म्हणावं लागेल. असच झालय नव्याने रिलीज झालेल्या “बेताल” सिरीजचे.

“घोस्ट स्टोरीज” नंतर नेटफ्लिक्सवर नवीन हॉरर सिरीज बेताल रिलीज करण्यात आली.एक 3 तासाचा सिनेमा बनवण्याऐवजी 4 एपिसोड लगभग तीन तासाची सिरीज बनवली. शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेली बेताल सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत विनीत कुमार आणि अहाना कुमार आहेत.

सिरीजची कास्टजरी चांगली असली तरीसुद्धा सीरिजच्या नावाप्रमाणेच ताल सोडून जाताना दिसतेय.सिरींजची कथा एका आदिवासी गावात आहे.एका हायवे बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला हे गावकरी विरोध करतात.काहीच दिवसात मुख्यमंत्री त्याच गावात पूजा करण्यासाठी येणार असतात.

अश्यातच “बाज स्कॉड” नावाच्या स्पेशल फोर्सला ते गाव खाली करण्याचे आदेश दिले जातात.या फोर्सची हेड असते त्यागी. आणि टीम ला लीड करतोय विक्रम सिरोही. गाव खाली केल्यांनतर विक्रम आणि टीम गुहेकडे जातात. जिथे काही आदिवासी त्यांना चेतावणी देतातकी गुहेत शैतानी आत्मा आहे.आत जाऊ नका. परंतु बाज स्कॉड गुहा तोडून आत प्रवेश करते आणि तेथूनच सुरवात होते बाज स्कॉडवर शैतान हल्ला करण्याची..

महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच कुठल्यातरी सिरीज मध्ये झोंबीज बंदुका आणि बॉम्बचा वापर करताना दिसत आहेत. परंतु जास्त तरी ते लोकांना चावून मारताना दिसत आहेत. आणि इंग्रजांच्या काळातले झोबीज सुद्धा याच सिरीजमध्ये पहायला मिळताहेत.पण हॉरर सिरीजमधील भीतीदायक सिन तेवढे जास्त दाखवता नही आलेत.त्यामुळे कोणीही ही सिरीज न घाबरता पाहून शकतो.

 

 

betaal series review

थोडक्यात सांगायचं  तर परत एकदा हॉरर सीरिजच्या माध्यमातून नेटफ्लिक्स लोकांना
घाबरवण्यात स्पेशल अपयशी ठरल्याचं दिसत आहे.सिरीजमध्ये 1/2 सीन असेल आहेत ज्यात तुम्ही थोडक्यात घाबराल.
माहिती नही डायरेक्टला नेमक काय दाखवायचं होत पण सिरीज पाहता तरी असं दिसतंय की “बेताल ” प्रेक्षकांच्या पसंतीस येण्यासाठी आजून बऱ्याच गोष्टीची आवश्यकता होती.सिरीज पाहता एक गोष्टी नक्की जाणवली की एक रोड बनवणारा कॉन्ट्रॅक्टर स्पेशल फोर्सला आदेश देतो आणि फोर्स लीडर ते फॉलो करतात हे जरा जास्तच झालंय असच वाटतंय.

आता बोलूया सीरिजच्या ऍक्टिंग विषयी !

ऍक्टिंग सुद्धा थोडीफार अपयशी झाल्याचेच दिसतंय. सिरीज जरी हॉरर असली तरी विनीत कुमार संपूर्ण सिरीजमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती दिसत नाहीये. 18+ कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्याच प्रकारच्या शिव्या ( ज्या सिरीज म्हटलं की आल्याच पाहिजे असं समजून चालणारे ) आणि नाईट शूट असल्यामुळे शूटिंग मात्र कमालची केली आहे.शूटिंग सोबतच पात्रांनी जर चेहऱ्यावरील हावभाव सीन नुसार दाखवले असते तरी सिरीज अजून चांगली बनली असती.

स्कॉडफोर्स ला एक आदिवासी महिला मदत करते जिचं नांव पुनिया असते.
आदिवासी पुनिया चा रोल मनर्जी करते आणि एकीकडे संपूर्ण गाव वेगळ्याच भाषेत बोलत असताना पुनिया मात्र भोजपूरी भाषा बोलत असते.आता हे नक्की काय दाखवायचं होत ते त्यांनाच माहिती. हॉरर सिरीज म्हटल्यावर भीती वाटायलाच हवी असही काही नाही पण थोडीफार तरी हॉरर असल्याच दिसायला हवं.बेताल मध्ये तुम्हाला भीती सोडून बाकी सर्व पहायला मिळेल.
म्हणजे अर्धवट कहाणी,साधारण ऍक्टिंग, गरज नसताना टाकलेले सीन हे सर्व तुम्हाला पूर्ण सिरीज मध्ये बोर करणारे ठरू शकते. सिरीजमध्ये गोळ्या तरी फार चालवल्यात, पण एखादी अशीही नाही जी डायरेक्ट प्रेक्षकांच्या काळजात घुसेल.

एकंदरीत हॉरर सिरीज म्हणून “बेताल ” बऱ्यापैकी फेल झाल्याचे दिसून येत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here