आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

नदीच्या मधोमध उभ्या असलेल्या हत्तीणीचा फोटो आज सोशल मिडियावर वायरल झाला.
एरवी माणुसकीच्या टिमक्या मिरवणाऱ्या लोकांनी मात्र या हत्तीनीसोबत जे काही केलंय ते वाचून खरंच आपण माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलोत का असाच प्रश्न पडायला हवा..

प्राणिमात्रांवर दया करा,प्राण्यांची काळजी घ्या असं नेहमी आपल्याला वारंवार सांगितलं जात. तरीसुद्धा अश्या काही घटना घडतात कि ज्या पाहून हे सर्व म्हणजे “पालथ्या घड्यावर पाणीच”असच वाटत .

या फोटोतील हत्तीणीला कोणीतरी फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातले .
अननसाचा स्फोट तिच्या तोंडात झाल्यामुळे तीच तोंड फुटले गेले आणि सर्व रक्तबंबाळ झाली.
तसल्याच अवस्थेत ती इतर कोणालाहीकाहीही इजा न करता शनतपणे पाण्याच्या शोधात जात होती.

आपल्या पोटात आपलं बाळ आहे, आपल्याला उपाशी राहून चालणार नाही असा विचार करत ती अन्नाच्या शोधात निघाली. भटकता भटकता जंगलाच्या बाहेर आली. बाहेर तिला एक मानवी वस्ती दिसली. त्या वस्तीच्या ठिकाणी आपल्याला हमखास काहीतरी खायला भेटेल या आशेने ती गावात आली.

गावातील लोकांनी तिला फिरताना बघितले. ते तिच्या जवळ गेले. तिच्यापुढे अननस धरले. ही माणसं किती दयाळू असतात असा विचार करुन तिनेही अननस सोंडेत घेतले. सोंडेतील अननस तोंडात टाकत असतानाच अचानक स्फोट झाला. तिची सोंड आणि तोंड रक्तबंबाळ झालं.

अचानक झालेल्या या स्फोटानं तिचं तोंड भाजले. तशा अवस्थेतही लोकांनी आपल्या बाळासाठी आपल्याला खायला दिले याची तिने जाण ठेवली.आपलंच काहीतरी चुकलं असणार असा विचार करुन कुणालाही कसलेही नुकसान न करता ती तिथून निघाली. आपल्याला खाल्लं पाहिजे, आपल्या पोटात बाळ आहे एवढंच तिला माहीत होतं. अन्नाचा शोध संपत नव्हता आणि वेदनांचा डोंब थांबत नव्हता.

Animal Abuse: Pregnant Elephant in Kerala Dies Eating Firecracker ...
source: the quint

फिरता फिरता ती वेल्लीयार नदीजवळ आली. स्फोटामुळे जळालेली सोंड आणि तोंड नदीच्या पाण्यात बुडवून ती उभी राहिली. थोडासा आराम मिळाला. बरं वाटलं जीवाला ! काही काळ भुकेचा विसर पडला.मनात बाळाचा विचार करत ती तशीच नदीत उभी होती. विचार करता करता तिच्या लक्षात आलं, आपण अननस तोंडात घेतल्यावरच हा स्फोट झाला. म्हणजे ज्यांनी आपल्याला अननस खायला दिले, त्यांनीच अननसातच काहीतरी घातले नव्हते ना ? मनात शंका दाटून आली. ज्यांना मी दयाळू समजत होते, तीच माणसं माझ्या बाळाच्या जीवावर उठली. ही माणसं आम्हाला सुखाने का जगू देत नाहीत ?

मनात प्रश्नांचे काहूर माजले असताना काही माणसं नदीजवळ आली. तिला नदीतून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करु लागली. पण माणसं दिसली की तिचा पारा चढला. मी उपाशी राहून मरेन, पण या माणसांना माझ्या बाळाजवळ येऊन देणार नाही हा निश्चयच तिने केलता. शेवटपर्यंत तिने कुणालाही जवळ सकाळ येऊन दिले नाही. शेवटी ती भुकेनेच मेली. तिच्यासोबत तिचे बाळही मेले.

“तिचा जबडा तुटलेला होता आणि तिला अननस चघळल्यानंतर ती खाण्यास असमर्थ होती आणि ती तिच्या तोंडात फुटली. तिला दूर करण्यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसची ऑफर देण्यात आली हे निश्चित आहे, ”असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन सुरेंद्रकुमार यांनी सांगितले.

व्हेलियार नदीच्या पाण्यातील हत्तीच्या मृत्यूचे वर्णन करून वनविभागाचे अधिकारी मोहन कृष्णन यांनी आपल्या फेसबुक पेजवर भावनिक चिठ्ठी पोस्ट केल्यानंतर  दुःखद मृत्यूचा मुद्दा समोर आला.

““जेव्हा आम्ही तिला पाहिले तेव्हा ती नदीत उभी होती, तिचे डोके पाण्यात बुडवले होते. तिचा अर्थ होता की ती मरणार आहे. तिने नदीत जलसमाधी घेतली आणि उभे राहिली , तिला परत किनाऱ्यावर आणण्यासाठी बरेच प्रयत्न श्री कृष्णन आणि त्यांच्या सहकार्यांनी केले”.

केरळच्या सायलेंट व्हॅली फॉरेस्टमधील गर्भवती वन्य हत्ती तिच्या तोंडावर चोपल्यामुळे तिच्या तोंडावर फोडल्या गेलेल्या शक्तिशाली फटाक्यांनी भरलेल्या अननसामुळे मानवी क्रौर्याच्या कृत्याचा बळी पडला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here