आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

६ दिवस कोमात राहिल्यानंतर तो फुटबॉलपटू बोलू लागला फ्रेंच!


रॉरी कोर्टस नावाचा एका फुटबॉलपटूचा २०१४ साली एक अत्यंत भयानक अपघात झाला होता, ज्यामुळे हा फुटबॉलपटू तब्बल ६ दिवस कोमात होता. कोमातून बाहेर आल्यावर तो अचानक फ्रेंच बोलायला लागला, इतकंच नाही त्याच्या आयुष्यातील बारा वर्षे विस्मृतीत गेले होते.

इंग्लंडमध्ये हे एक अत्यंत विचित्र प्रकरण जगासमोर आलं असून याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या रॉरी कोर्टस यांचा परिवार १८ व्या शतकात फ्रान्सच्या नॉरमेडी या भागात वास्तव्यास होते, पण तिथून इंग्लंडला आल्यानंतर पिढ्यान पिढया कोणालाच फ्रेंच भाषा अवगत नव्हती. अगदी त्यांना देखील फ्रेंच भाषेचा गंध देखील नव्हता. पण कोमातून बाहेर आल्यावर ते अचानक फ्रेंच बोलू लागले हे बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शाळेत असताना अगदी तोडकी फ्रेंच त्यांना येत होती पण जेव्हा ते कोमातून बाहेर आले तेव्हा मात्र अत्यंत अस्सल फ्रेंच भाषा बोलत होते.

हा नक्की पुनर्जन्म वगैरेचा प्रकार असावा अशी धारणा लोकांची यामुळे झाली होती.

Rory Curtis: Amateur footballer who woke from a coma speaking ...
resource-bbc


बीबीसी ह्या वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट नुसार अपघातानंतर अत्यंत अस्खलित फ्रेंच बोलणारे रॉरी, उपचारानंतर मात्र फ्रेंच पूर्णपणे विसरले. रॉरी कॉर्टिस यांचा २०१६ साली एक अत्यंत भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना त्यांचा गाडीतून बाहेर काढण्यास तब्बल ४० मिनिटे वेळ गेला होता. त्यांना तत्काळ हवाई रुग्णवाहिकेने बर्मिंगहम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे ६ दिवस कोमात ते राहिले.

कोमातून उठल्यावर ते फक्त फ्रेंच बोलत नव्हते तर त्यांचा आयुष्यातील महत्वपूर्ण १२ वर्षांच्या काळाचा त्यांना विसर पडला होता. कोमातून बाहेर आल्यावर ते १२ वर्षाच्या मुलासारखा व्यवहार करू लागले आणि बालपणी त्यांच्या जवळ जो कुत्रा होता, त्याला बोलवण्याची मागणी करू लागले होते. ह्या कुत्र्याचे निधन होऊन बराच काळ लोटला होता. कॉर्टिस यांनी बीबीसीला सांगितले की आता ते आधीपेक्षा उत्तम असून त्यांना आता फक्त काही निवडक प्रसंग आठवतात. रॉरी कॉर्टिस हे मँचेस्टर युनायटेड ह्या प्रसिद्धी संघाच्या वॉलसाल अकॅडेमीमध्ये खेळत होते. परंतु ह्या अपघातानंतर त्यांचे आयुष्य पालटले ते कायमचे!.

आज रॉरी कॉर्टिस अजूनही उपचार घेत असून त्यांच्या स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर त्यांची गोष्ट प्रसिद्ध झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

===

new google

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here