आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मैदानावरील एका छोट्याश्या खिळ्यामुळे या खेळाडूला आपला जीव गमवावा लागला होता… !


 

  क्रिकेट जगतात अनेक अश्या घटना घडल्या आहेत ज्या कळल्यानंतर  वाईट वाटते. कधी डोक्यावर बॉल लागून तर,कधी फिल्डिंग करतेवेळी खेळाडू गंभीर जखमी होण्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्यात. अशीच एक घटना एका क्रिकेटपटू सोबत घडली होती, दुर्देवाची बाब म्हणजे या छोट्याश्या घटनेतून क्रिकेटपटू सावरू शकला नाही ,तर त्याला स्वतःचा जीवही गमवावा लागला होता.

मैदानावरील गवतात असलेल्या खिळ्यामुळे एका क्रिकेटरला आपला जीव गमवावा लागला होता. होय तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. नवीन सुविधा असल्यामुळे सध्या आपल्याला टीव्हीवरती मैदानातील गवत साफ दिसते. परंतु पूर्वकाळात अश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आणि मैदान सुद्धा आताच्या मैदानापेक्षा बरच नादुरुस्त असायचे. कधीकधी तर मैदानावरील गवतात साप सुद्धा आढळून यायचे.

new google

 

 

एक उत्कृष्ट बॉलर असलेले “डॉनल्ड एलिगन” यांचा अश्याच एका अपघातात जीव गेला होता.

१९३३-३४चा सामना या खेळाडूचा शेवटचा सामना ठरला. महत्वाचं म्हणजे यांनी याच सामन्यात ६३ धावा देऊन सात महत्वाचे असे विकेट घेतले होते.

१९०९ मध्ये जन्मलेले डॉनल्ड एलिगन यांनी लहानपणापासून क्रिकेटची गोडी जोपासत क्रिकेट विश्वात उतरण्याचे स्वप्न पाहिलॆ होते . हेच स्वप्न त्यांनी १९३४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करून पूर्ण करून दाखवले.या एलिगन नि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त ४ आंतरराष्ट्रीय सामने खेळे होते. एलिगन उत्कृष्ट स्पेस बॉलर होते. पण
तेव्हा सामने फार कमी घेतले जात असत त्यामुळे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसी संधी मिळाली नाही.

१९३३-३४ या वर्ष्यात त्यांनी फक्त २ सामने खेळले आणि त्यात ९ विकेट घेतले होते. यातीलच एक सामना त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्यांनी ६३ धावा देऊन ७ महत्वाचे विकेट घेतले होते. क्षेत्ररक्षण करत असतानाच त्यांच्या पायातील बूट चिरून एक खिळा त्यांच्या पायात आर–पार घुसला होता.ज्यामुळे त्यांना रक्त विषबाधा झाली. आणि वेळेवर आवश्यक तो उपचार न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्या वेळेस त्यांचे वय अवघे २८ वर्ष एवढे होते.

आपल्या छोट्याश्या पण साजेश्या कारकिर्दीत त्यांनी ४ सामने खेळून १८ विकेट मिळवले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here