आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
जगभरात करोनाचं थैमान माजलेलं असताना भारताने या वायरस सोबत लढण्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार केलं त्याचं नाव आरोग्य सेतू ॲप. चिनी व्हायरसचा सगळीकडे प्रसार होत असताना भारत सरकारने तातडीने उचललेली पावलं आपल्याला आजही सुरक्षित करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना विनंती केली की हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा,या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक आरोग्य सोयी सुविधा केंद्र सरकार उपलब्ध करून देत आहे. परंतु 6 मे रोजी सरकारला जाहीर करावं लागलं की हे ॲप्लिकेशन सर्व प्रकारे सुरक्षित आहे आणि त्याचा सर्वांनी वापर करावा. परंतु प्रश्न असा प्रश्न निर्माण होतो केंद्र सरकारला अशा प्रकारची घोषणा का करावी लागली, तर मित्रांनो एक ट्विटर युजर आहे त्याच नाव आहे एलियट एल्डरसन. या व्यक्तीने आरोग्य सेतूच्या प्रायव्हसी वरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आणि त्याच्या एका ट्विटमुळे सरकारला अशा प्रकारची माहिती जाहीर करावी लागली, याआधी देखील त्याने आधार’च्या डेटाबेस बद्दल अशाच प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून एलियट बद्दल जाणून घेणार आहोत…..
मित्रांनो एलियट हे त्या व्यक्तीचे खरं नाव नसून ते सायबर सेक्युरिटी मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचं टोपण नाव असल्याचं समोर आलं आहे. त्याचा पहिला इंटरव्यू 2017 नोव्हेंबर मध्ये numerama या मॅक्झिनने घेतला होता, त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की हा 28 वर्षांचा एक फ्रेंच मुलगा आहे.
“स्क्रोल” ने जेव्हा त्याच्याकडे त्याची माहिती मागितली तेव्हा त्यांने एवढंच सांगितलं की त्याचं आडनाव राॅबर्ट आहे. त्याने सांगितलं की त्याचं शिक्षण नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग पर्यंत झालेलं आहे.
तो सध्या एक फ्रीलान्स अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून काम करतो, त्याने हे देखील सांगितलं की त्याला त्याचं संपूर्ण करिअर अँड्रॉइड सेक्टर मध्ये करायचंं आहे.
त्याला जेव्हा विचारण्यात आलं की तू तुझं टोपण नाव इलियट असं का ठेवलं त्यावर तो म्हणाला की हे नाव एका टीव्ही सिरीज मधील पात्र आहे. त्याने सुरुवातीला CNRS या रिसर्च संस्थेला आणि फ्रेंच कंपनी विको ला प्रायव्हसी वर टार्गेट केलं. त्याचं म्हणणं आहे की त्याला सिक्युरिटी आणि प्रायव्हसी या दोन सेक्टरमध्ये काम करायला प्रचंड रुची आहे. एडवर्ड स्नोडेन कडून देखील तो प्रचंड प्रभावित झाला आहे.
तुम्ही जर त्याच्या ट्विटर अकाऊंट ला भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल की अशा कितीतरी कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या ग्राहकांची परवानगी नसताना देखील त्यांच्या माहितीचा दुरुपयोग करतात, त्यांची माहिती चोरून ती आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकी विरुद्ध आवाज उचलनं त्याचं काम असल्याचं तो सांगतो. आधार च्या बाबतीत त्याचं असं म्हणणं होतं की आधार मधील माहिती कोणीही सहज रित्या हाताळू शकतो भारतीय सरकारने या माहितीच्या सेक्युरिटी च्या दृष्टीने जास्त प्रमाणात प्रयत्न करायला हवेत. केंद्र सरकारने देखिल त्याला उत्तर देण्याऐवजी आधारच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यानंतर उचलल्याचं समोर येतं.
त्यावर त्याने सरकारचे कौतुक करत जाहीर केला की तो आधारच्या विरुद्ध नाही तर आधारला तो पाठिंबा देतो फक्त, आधारला सुरक्षित करणे गरजेच आहे.
तर मित्रांनो हि होती माहिती एल्डरसन बद्दल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.