आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जेंव्हा एकटा भारतीय सैनिक ३०० चिनी सैनिकांवर भारी पडतो…

 

एक भारतीय सैनिक ज्याला मरणोत्तर पण भारतीय सैना सर्व सुविधा देते ते मग चहा, नाश्ता, जेवण असो का चक्क प्रमोशन असो. होय हे खरं आहे, कोण आहे हा वीर सैनिक व एवढा मान सन्मान का दिला जातो या सैनिकाला.
चला तर मग जाणून घेऊया या खास लेखातून…

 

new google

भारतीय सैनेच्या इतिहासात आपले नांव सुवर्ण अक्षरात लिहणारा हा अमर जवान आहे “जसवंत सिंह रावत ” ज्यांनी 1962च्या भारत -चीन युद्धात 72 तासात 300 पेक्षा अधिक चिनी सैनिकांना आपल्या पराक्रमाने सळो की पळो करून सोडले होते.

 

सैनिक

 

जसवंत सिंह यांचा जन्म 19 ऑगस्ट 1941ला भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यातील गढवाल जिल्ह्यात झाला. त्याचे वडील गुमान सिंह रावत हे होते. आपल्या जीवनाच्या अंतिम कालावधीत जसवंत सिंह रावत रायफलमैन म्हणून गढवाल रायफलच्या चौथ्या बटालियनचमध्ये होते.

 

त्यांना खरी ओळख व ख्याती मिळाली ती 1962च्या चीन -भारत युद्धादरम्यान अरुणाचल प्रदेशच्या तवांग मधील तुरारंगच्या अविस्मरणीय युध्दामुळे.

 

1962 भारत-चीन युद्ध..

 

1962चे युद्ध अंतिम टप्प्यात पोहचले होते. आणि युद्धाची युद्धभूमी बनली होती ती म्हणजे 14000 फूट उंचावर व जवळपास 10, 000 कि.मी क्षेत्रात पसरलेली भारत -चीन सीमा. हा प्रदेश अतिशय दुर्गम असून येथे कडाक्याची थंडी व ओबडधोबड रस्ते असल्यामुळे येथे कोणाचीही जाण्याची हिम्मत होत नाही. परंतु याच भागात भारतीय सैनिक चिनी सैनिकांसमोर दंड थोपाटून उभे होते.

 

चिनी सैनिक ज्यावेळेस जसवंत सिंह यांच्या गढवाल बटालियनसोबत लढत होते. तेव्हा रसद व दारुगोळा यांच्या कमतरतेमुळे गढवाल बटालियनला वापस येण्याचे आदेश देण्यात आले.सर्व सैनिक माघारी फिरले परंतु अंगात सळसळते रक्त, व भारत मातेवर आक्रमन करणाऱ्याला अद्दल घडवण्याची जबरदात इच्छाशक्ती असणारे जसवंत सिंह माघारी परतले नाही.

 

त्यांनी तेथेच राहून तेथील दोन स्थानिक मुलींच्या मदतीने ( नूरा व शेला ) फायरिंग  ग्राउंड बनवले व तीन ते चार ठिकाणी मशिनगन व अन्य हत्यारे ठेवली. बारीबारीने ते या सर्व ठिकाणावरून  गोळीबार करत राहिले. त्यामुळे चिनी सैनिकांना कळलेच नाही कि ते संपूर्ण बटालियनशी नाही तरी एकट्या सिंह सोबत लढत होते.

 

प्रत्यक्षात मात्र जसवंत सिंह चिनी सैनिकांचे बळ कमी करण्यात यशश्वी झाले होते. अश्या प्रकारे 72 तास म्हणजे 3 दिवस त्यानी चिनी सैनिकांना मूर्ख बनवले. परंतु अतिशय दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांना “राशन” पुरवणारा जवान चिनी सैनिकांच्या हाती लागला. व त्याने सर्व हकीकत चिनी सैनिकांसमोर सांगितली.

 

आता मात्र चिनी सैनिकांचा पारा चांगलाच चढला होता. एकटा भारतीय सैनिक त्यांना 3 दिवसापासून पराभूत होत नव्हता हे समजल्यावर त्यांनी चवताळून चारी बाजूनी आक्रमण सुरु केले.

 

व जसवंत सिंह यांना घेराव घालण्यास सुरवात केली. याची चाहूल लागताच जसवंत सिंह यांनी आपण पकडले जाऊन युद्धकैदी बनू शकतो. असं समजून स्वतःच गोळी मारून घेतली. तरी काही लोकांच्या मते त्यांना चिनी सैनिकांनी पकडून नंतर फाशी दिली.

 

असं पन म्हटले जाते कि, चिनी सैनिक त्यांचे मुंडके कापून सोबत घेऊन गेले होते. जसवंत सिंह यांच्या पराक्रमाने दुष्मन देशाची सैना सुद्धा प्रभावित झाली होती. म्हणूनच त्यांनी जसवंत सिंह यांची पितळेची एक प्रतिमा भेटस्वरूप भारतीय सैन्याला दिली.

 

सन्मान

 

ज्या भारतीय चौकीवर जसवंत सिंह यांनी आपले अंतिम युद्ध लढले होते,त्या चौकिचे नांव आता “जसवंत गढ” असे ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर तिथे त्यांचे एक मंदिर बांधण्यात आले आहे आणि त्या मंदिरात त्यांचे वैयक्तिक हत्यार व सामान आजही सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

 

त्यांचा सन्मान म्हणून त्यांची वर्दी आजही रोज इस्त्री करून त्यांच्या प्रतिमेसमोर ठेवली जाते. त्यांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण आणि रजापण दिली जाते. मरणोत्तर पण त्यांना प्रमोशन दिले जाते. आज ते रायफलमैन या पदावरून जनरल मेजर झाले आहेत. (A SOLDIER IS NEVER OFF DUTY ) याप्रमाणे जसवंत सिंह यांची आत्मा आजपण भारतीय सीमेची राखण करते असा सर्वांचा समज आहे. त्यामुळेच त्यांच्या नावासमोर शहीद लावल्या जात नाही.

 

अश्या  धुरंधर भारत मातेच्या वीर पुत्राच्या जीवनावर आधारित एक चित्रपट पण काढण्यात आला आहे. भारतीय सैनेने त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांचा महावीरचक्र देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे त्यांच्या गढवाल बटालियनचा पण मान-सन्मान अधिक वाढला आहे. वीरता व देशप्रेमाचे एक जितेजागते उदाहरण त्यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here