आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मधुबाला आणि दिलीप कुमार यांची रुपेरी पडद्यामागची प्रेम कहाणी…
आज हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले गेल्या महिन्यापासून त्यांना श्वसनाच्या समस्येचा त्रास होता. ज्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच 98 वर्षीय दिलीप कुमारने सुटकेचा नि: श्वास टाकला.
त्यांच्या जाण्याने चाहते भावूक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.
बॉलीवूड मध्ये नव्वदच्या दशकात किंवा त्याआधी अशा काही जोड्या होत्या ज्यांनी कित्येक काळ रसिकांच्या मनावर ती अधिराज्य गाजवलं. आजही या अजरामर जोड्या आपल्याला गाण्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. आपल्याकडे आजही असा एक गट आहे यांची गाणी प्रचंड आवडतात. याच गाण्यांनी अनेक कलाकारांना रसिकांच्या मनात नेहमी साठी जागा दिलेली आहे.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या पडद्यामागची न फुललेली प्रेम कहाणी विषयी!
खरं बघायला गेलं तर या अभिनेत्रीचे नाव प्रत्येकाला परिचित आहेच, आपल्या अभिनयासोबतच आपल्या अदाकारीने देखील प्रेक्षकांच्या हृदयात जागा तयार करणारी ही अभिनेत्री म्हणजे मधुबाला होय. मधुबाला यांच्या आयुष्यात प्रेमामुळे घडलेल्या घटनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. असं म्हटलं जातं की मधुबाला पहिल्यांदा प्रेमनाथ यांच्या प्रेमात पडल्या, सहा महिने त्यांनी एकमेकांना वेळ देखील दिला परंतु पुढे धर्मा मध्ये आला आणि त्यांना आपल्या प्रेमाला मुकावं लागलं. कारण प्रेम नाथ यांनी त्यांना धर्म बदलण्यासाठी विचारलं होतं आणि मधुबाला यांनी त्याला ठाम नकार दिला. पुढे मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यात प्रेम संबंध जुळले त्यांची पहिली भेट ‘तराना’ या चित्रपटाच्या सेटवरती झाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम देखील केलं. हे चित्रपट अजरामर ठरले.
संगदिल, अमर, मुगल ए आजम हे चित्रपट तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती उचलून धरले. परंतु पुढे एका चित्रपटाच्या शूटिंगचा लोकेशन वरून प्रोड्युसर आणि मधुबाला यांच्यात वाद झाले. मधुबाला चे वडील देखील मधुबाला यांना पाठिंबा देत होते परंतु दिलीप कुमार यांनी producer ला पाठिंबा दिला आणि या एका गोष्टीमुळे त्यांच्यात वाद झाले. असं म्हटलं जातं की याच एका लहानशा गोष्टीमुळे त्यांच्या प्रेम संबंधांमध्ये ठिणगी पडली.

मधुबाला उर्दू आणि पश्तो खूप छान बोलत असत, त्यांनी पुढे इंग्रजी देखील शिकली. त्यांना स्ट्रीट फुडची फार आवड होती. पुढे त्यांनी किशोर कुमार यांच्या सोबत लग्न देखील केल आणि वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांना हृदय विकार असल्याचं लक्षात आलं.
मधुबाला देवाला मानत असत परंतु देवाला घाबरत नसत. जेव्हा किशोर कुमार यांच्यासोबत मधुबाला यांचं प्रेम प्रकरण चालू होतं तेव्हा किशोर कुमार यांनी रुमा देवी यांना घटस्फोट दिला होता. चलती का नाम गाडी आणि हाफ तिकीट यासारखे चित्रपट देखील त्यांनी सोबत केले, पुढे 1960 मध्ये त्यांनी लग्न केले.
इंग्लंडला चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मधुबाला यांच्याकडे फक्त दोन वर्ष असल्याचं सांगितलं. मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यात देखील काही कारणामुळे वाद झाले. या वादामुळेच किशोर कुमार आणि मधुबाला वेगळे राहू लागले, परंतु किशोर कुमार मधुबाला यांना भेटायला नेहमी येत असत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असत. काही कालावधीने मधुबाला यांचा निधन झालं.
मधुबाला यांच्याशी वाद झाल्यानंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी विवाह केला. मधुबाला यांना ही बातमी कळल्यानंतर त्या व्यथित झाल्या होत्या त्यांचं दिलीपकुमार यांच्यावरती प्रचंड प्रेम होतं.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.