आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या 5 खतरनाक स्नायपर्सचे किलिंग रेकॉर्ड मोडणे कोणालाही शक्य नाहीये….


 

स्नायपर्स म्हणजे अतिशय कठीण ट्रैनिंग देऊन तयार केलेले सैनिक. आपल्या अतिशय अत्याधुनिक रायफलने दूरच्या ठिकाणी सटीक निशाणा धरून आपल्या दुष्मनाला ठार मारणे हे त्यांचे वैशिष्ठ.

new google

दुष्मनाच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्यात तर त्यांना खास ट्रैटिंग दिलेली असते व ते हे काम करताना अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत इतिहासातील अत्यंत खतरनाक अशा ५ स्नायपर्सबद्दल ज्यांचे ” किलिंग्स “चे रेकॉर्ड मोडणे म्हणजे शक्यच नाही असे वाटते ,(जर पबजीचा एवढा अपवाद वगळला तर).

 ०१.  सिमो हायहा (simo hayha )  ५०५ किल्स

A Five-Foot Finnish Farmer The Deadliest Sniper In History
source- war history

आजपर्यंत अनेक महान स्नायपर्स  झाले परंतु त्यांच्या पैकी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जो आहे त्यांचे नाव आहे सिमो हायहा . १७ डिसेंबर १९०५ ला फिनलँड येथे एका शेतकरी घरात जन्मलेले सिमो हायहा हे त्यांच्या वडिलांसोबत लहानपणी शिकारीला जात असत त्याचा फायदा त्यांना पुढे चालून झाला. सिमो हायहा हे रेड अर्मीचे फिनिश स्नायपर्स होते. त्यांनी १९३९-१९४० च्या शीत युद्धात आपल्या यम २८ या अत्याधुनिक रायफलने ५०५ कन्फर्म किलिंगचा विश्वविक्रम कायम केला. सिमो हायहा हे नेहमी पांढरे कपडे वापरत असत बर्फात ते स्वतःला असे लपवत जसे “पाण्यामध्ये मीठ” त्यामुळेच त्यांच्या शत्रूला काही कळण्याच्या अगोदरच तो यमसदनी पोहचलेला असे.

त्यामुळेच त्यांना “द व्हाईट डेथ” या नावाने पन ओळखल्या जायचे. सिमो हायहा यांनी ५०५ किल्सचे रेकॉर्ड अवघ्या १०० दिवसाच्या युद्धादरम्यान कायम करून या लिस्टमध्ये अव्वल क्रमांक पटकावला त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना क्रॉस ऑफ लिबर्टी व मेडल ऑफ लिबर्टी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेवटी एका युद्धात त्यांच्या जबड्यावर एक गोळी लागून ते बेहोष झाले.जेव्हा त्यांना जाग आली  तेंव्हा  ७ दिवसानंतर दोन्ही राष्ट्रात शांती प्रस्ताव कायम झाला होता. परंतु त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना second licutenant प्रमोशन मिळाले नंतर ते काही दिवसांनी सेवानिवृत्त झाले व सन २००२ मध्ये फिनलँड च्या एका नर्सिंग होम मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

 ०२ . आयवन सिदोरेनको (ivan sidorenko ) ५०० किल्स

Ivan Sidorenko: The Soviet Union's Deadliest World War II Sniper

आयवन सिदोरेनको हे या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत ,ते रेड आर्मी व सोव्हिएत युनियन चे एक महत्वाचे स्नायपर  होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ५०० किल्स करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असे मानल्या जाते कि आयवन सिदोरेनको हे आपल्या कामामध्ये एवढे निपुण होते कि, त्यांनी कित्तेक वेळा आपल्या रायफलच्या मदतीने दुश्मनांची टॅंक व ट्रॅक्टर निकामी केले होते व सोविएत युनियन च्या सर्व  स्नायपर्स मध्ये आपले नाव पहिल्या क्रमांकावर स्थापित केले.
१२ सप्टेंबर १९१९ ला सोविएत रशिया येथे आयवन सिदोरेनको जन्मलेल्या यांनी ११२२ रायफल रेजिमेंट (बॅलेस्टिक फ्रंट) मध्ये १९३९-१९४५ एवढी सेवा दिली.

१९४१ मध्ये मॉस्कोच्या युद्धात असताना स्वतः स्नायपिंगची ट्रैनिंग घेतली होती. त्यानंतर त्यांनी असिस्टंट कमांडरची प्रमोशन पण मिळवली ,१९४४ मध्ये कित्तेक वेळा ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे ते युद्ध संपेपर्यंत हॉस्पिटल मध्ये होते, जेंव्हा हॉस्पिटल मधून बरे होऊन आले तेंव्हा त्यांना “हिरो ऑफ सोविएत यूनियन ” हा अतिशय मानाचा पुरस्कार दिला गेला. पुढे चालून डॉक्टरांनी युद्धात न जाण्याचा सल्ला दिला. तरी आयवन सिदोरेनको यांनी २०० पेक्षा अधिक सैनिकांना स्नायपिंगची ट्रैनिंग दिली. त्यांनी हमेशा रशियन नगात हि रायफल टेलिस्कोपसोबत वापरली. शेवटी त्यांनी रेड आर्मी सोडून दिली आणि दगडी कोळस्याच्या खदाणीमध्ये फोरमन म्हणून काम केले.आणि १९ फेब्रुवारी १९९४ ला डेजस्थान येथे त्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांची जागा आजपर्यत कोणीच नाही घेऊ शकले.

०३. फेडर ओखलोपकॉव (fyodor okhlopkov ) ४२९ किल्स

Fyodor Matveyevich Okhlopkov (Фёдор Матве́евич Охло́пков) Soviet ...

या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतात सोविएत यूनियन च्या रेड आर्मी चे फेडर ओखलोपकॉव. त्यांनी दुसरी महायुद्धात ४२९  कन्फर्म  किल्स केल्या  होत्या.  २ मार्च १९०८ ला रशियातील एका खेडेगावात (krest khaldzhay) जन्मलेल्या फेडर ओखलोपकॉव यांनी त्यांच्या भावासोबत रेड आर्मी ज्वाईन केली नंतर एका लढाई मध्ये त्याच्या भावाला आपला जीव गमवावा लागला, भावाचा बदल घेण्यासाठी फेडर ओखलोपकॉव यांनी स्नायपिंगची ट्रैनिंग घेतली आणि ४२९ किल्सचा विक्रम आपल्या नावे  केला. ते मशीन गण चालवण्यात पण तेवढेत पारंगत होते. आपल्या कारकीर्दीत त्यांना बारा अतिशय गंभीर अशा जखमा झाल्या होत्या.

बारावी जखम त्यांना जून १९४४ छातीत गोळी लागून झाली तेंव्हा त्यांना जबरदस्ती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, आणि मग युद्ध संपर्पर्यंत ते हॉस्पिटल मधेच राहिले . त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले परंतु ते यकुती असल्यामुळे त्यांना हिरो ऑफ सोविएत यूनियन हा पुरस्कार दिला नाही, परंतु त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन हा मानाचा पुरस्कार दिला होता. शेवटी २८ मे १९६८ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आठवण म्हणून एका मालवाहू जहाजाचे नाव त्यांच्या नावावर ठेवल्या गेले आहे. म्हणूनच हा खतरनाकस्नायपर आमच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

०४.  फ्रान्सिस पॅगाँह्मगाबोव (francis pagahmagabow ) ३७८ किल्स 

La Escalera de Iakob: Francotiradores (VII): Francis Pegahmagabow

या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत फ्रान्सिस पॅगाँह्मगाबोव. ९ मार्च १८९१ ला ऑंटेरियो येथे जन्मलेल्या फ्रान्सिस यांनी पहिल्या महायुद्धात ३७८ जर्मनीचा खात्मा केला होता. म्हणूनच त्यांना वन मॅन आर्मी सुद्धा म्हणत. फ्रान्सिस यांनी ३७८ किल्स सोबत  ३०० पेक्षा अधिक दुश्मनांना जिवंत कैद करण्याचा विक्रम पण आपल्या नावावर केला आहे.

असे म्हणल्या जाते कि १९१८ ला एका युद्धात त्याच्या बटालियन चा दारुगोळा संपत आला अशा परिस्थितीत फ्रान्सिसयांनी युद्धाच्या मैदानात जाऊन मरण पावलेल्या सैनिकाजवळचा दारुगोळा जमा करून बटालियनला आणून दिला आणि दुष्रमनांवर अंतिम हल्ला चढवला त्यामुळे त्यांना सेर्गेन्ट मेजर हि पदवी देण्यात आली. पुढे जाऊन ते आपल्या मायदेशी परतले व तेथे सुप्रीम चीफ ऑफ थे नेटिव्ह इंडिपेंडेंटचे गव्हर्नमेंट झाले.

शेवटी वयाच्या ६१ व्या वर्षी म्हणजे १९५२ ला पेरी इसलँड येथे फ्रान्सिस काळाच्या पडद्याआड झाले.  फ्रान्सिस यांना   मेडल, व्हिक्टरी मेडल, ब्रिटिश वॉर मेडल हे पुरस्कार पण मिळाले होते. आपल्या आयुष्यात एक सैनिक, स्नायपर आणि राजनीतिक विश्लेषक अशा अनेक ख्याती मिळवलेले फ्रान्सिस हे या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.

०५ . ल्यूडमीला पाउलींचेन्को (lyudmila paulichenko ) ३०९किल्स

Lyudmila Pavlichenko--Soviet sniper of the Red Army with 309 ...

 

लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर जे नाव आहे ते खूपच खास आहे कारण आपण आजपर्यंत स्नायपिंग म्हणजे फक्त पुरुष मंडळींचे काम असे समजत होतो पण ल्यूडमीला पाउलींचेन्को यांनी हा गैरसमज मोडून काढला. त्यांनी दाखवून दिले कि महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. १२जुलै १९१६ ला आजच्या युक्रेन मध्ये जन्मलेल्या ल्यूडमीला पाउलींचेन्को दुसऱ्या महायुद्धात युक्रेनियन सोविएत आर्मीची स्नायपर  होती. त्यांच्या नावे ३०९ कन्फर्म किल्सचा विक्रम आहे, त्यामध्ये ३६ जर्मन पण सामील आहेत. ल्यूडमीला पाउलींचेन्को यांना इतिहासातील सर्वोत्तम महिला स्नायपर मानले जाते. त्यांना लेडी डेथ या टोपण नावाने पण ओळखल्या जायचे.

 

एकदा त्यांना तोफेच्या गोळ्यामुळे जखम झाली तेंव्हा त्यांना मॉस्को येथे नेण्यात आले, जेंव्हा त्या यातून बऱ्या होऊन आल्या तेंव्हा त्यांना रेड आर्मीची प्रवक्ता म्हणून नेमण्यात आले. ल्यूडमीला पाउलींचेन्को यांनी कित्तेक स्नायपर्सला ट्रैनिंग दिली,  पण जेंव्हा युद्ध संपले तेंव्हा त्यांनी सिनिअर रिसर्चर फॉर सोविएत नेव्ही या पदावरून राजीनामा दिला. अशा या खतरनाक,दबंग महिला स्नायपरचे  शेवटी १० ऑक्टोबर १९७४ ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तेंव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. हिरो ऑफ सोविएत यूनियन हा पुरस्कार प्राप्त झालेल्या ल्यूडमीला पाउलींचेन्को ह्या एकमेव महिला या लिस्टमध्ये सामाविस्ट आहेत….

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here