आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तीबद्दल वाचतो, बघतो व ऐकतो ज्यांचे जीवन आपल्याला एकदम प्रभावित करते . आज आपण या लेखातून अशाच एका व्यक्तिबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांचे नाव आहे सुधा मूर्ती (कुलकर्णी).

सुधा मूर्ती यांना पसंद करणारे अनेक लोक आहेत त्यामध्ये डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पासून ते महानायक अमिताभ बच्चन पर्यंत. एकवेळ सुधा मूर्ती के.बी.सी. च्या ११ व्या सिजनमध्ये आल्या होत्या तेव्हा बच्चन यांनी अक्षरशः त्यांचे पाय धरून त्यांचा सन्मान केला होता. जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दल थोडीफार माहिती जी आपणास नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
सुधा मूर्ती भारतीय अभियांत्रिकी शिक्षक तसेच कन्नड व इंग्रजी विषयाच्या प्रसिध्द लेखिका आहेत. त्या सामाजिक कार्यकर्त्या पान आहेत इन्फोसिस फौंडेशन च्या अध्यक्षा ही त्यांची खरी ओळख. सुधा मूर्ती इंफोसेस चे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.

बालपण व शिक्षण:

सुधा मूर्ती यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शिगगाव येथे एका ब्राह्मण भारत झाला.त्यांचे वडील आर एच कुलकर्णी हे पेशाने डॉक्टर होते,त्यांच्या मातेचे नाव विमला कुलकर्णी होते. लहान पणी त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजी –आजोबांनी केले. सुधा मूर्ती यांनी B.ENG इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग बी.व्ही.बी. इंजिनीरिंग आणि टेक्नोलॉजी या कॉलेजमधून पूर्ण केले. याच कॉलेजला आता के.एल.इ. टेक्नोलॉजी युनिवर्सिटी म्हनून ओळखल्या जाते. येथे शिकत असताना वर्गात प्रथम आल्यामुळे त्यांना सुवर्ण पदक पन मिळाले होते.

कारकीर्द:

7 Must-Read Books by Sudha Murty that Will Rejuvenate Your Soul ...
सुधा मूर्ती -युवाकट्टा

सुधा मूर्ती यांनी जेव्हा पदवी पूर्ण केली तेव्हा टेल्को येथे नवीन भरती चालू होती ,परंतु त्यावेळी टेल्को च्या आवेदन पत्रात फक्त पुरुषांनिच आवेदन करावे असे लिहिले होते. सुधा मूर्तीयांनी सरळ जे.आर.डी टाटा यांना एक पोस्टकार्ड लिहिले ,त्यामध्ये त्यांनी टेल्को मध्ये ‘स्त्री-पुरुष’ लिंग भेद असल्याचा उल्लेख केला याचा परिणाम म्हणून त्यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आणि तातडीने कामावर घेण्यात आले.

सुधा मूर्ती भारताच्या प्रथम महिला अभियंता आहेत ,ज्यांना भारतातील सर्वांत मोठी ऑटो निर्माण कंपनी टाटा इंजीनियरिंग आणि लोकोमोटीवकं (टेल्को) तर्फे नियुक्त करण्यात आले होते. सुधा मूर्ती पुण्यात विकास अभियंता म्हणून रुजू झाल्या.त्यांनी पुणे सोबत मुंबई आणि जमशेदपूर येथे काही काळ काम केले. काही दिवसानंतर त्यांनी पुण्यातील ख्यातनाम कंपनी वालचंद्र ग्रुप मध्ये पण एका उच्च पदावर काम केले. सुधा मूर्ती यांनी १९९६ रोजी इन्फोसिस फौंडेशन ची सुरुवात केली.त्यांनी आज पर्यंत बंगळूरु विध्यापिठाच्या पीजी सेंटर येथे विजिटिंग प्रोफेसर काम केले आहे. मूर्ती ख्रिस्ता विद्यापीठ येथे शिकवण्याचे काम करतात ,त्यांनी अनेक कादंबऱ्या ,पुस्तके लिहिले आहेत.

त्यांच्या इन्फोसिस फौंडेशनने अनेक शिक्षण देणाऱ्या संस्था उघडल्या आहेत एच.आर.कदीम दिवान बिल्डींग असो किंवा आय.आय.टी कानपूर येथील संघनक विज्ञान व अभियांत्रीकी विभाग (सी.एस.इ) तसेच नारायणराव मेलगीती स्मारक राष्ट्रीय कायदा ग्रंथालय यांचा समावेश आहे .

सुधा मूर्ती यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत,त्यामध्ये अभियान्त्रीकीच्या सर्व शाखांमध्ये अव्वल आल्या बद्दल सुवर्ण पदक त्याकाळचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री देवराज यांच्यातर्फे प्रदान करण्यात आले. कर्नाटकच्या सर्व अभियांत्रिकी विद्यापीठांच्या एस.एस.एल.सी. मध्ये सर्वाधिक गुण संपादन केल्यामुळे रोख पुरस्कार ,कर्नाटकच्या विद्यापीठ परीक्षेत प्रथम क्रमांकासाठी सी.ए. देसाई पुरस्कार कर्नाटकातील सरोत्तम अभियांत्रिकी झाल्या बद्दल राज्याच्या युवा सेवा विभागाचे पारितोषिक, १९९५ मध्ये रोटरी क्लब बंगळूरु तर्फे सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार ,२००० सालचा राजोत्सव पुरस्कार ,ओजास्विनी पुरस्कार,मिलेनियम महिला शिरोमणी पुरस्कार ,राजलक्ष्मी पुरस्कार,आर.के.नारायण सहीत्य पुरस्कार,
२०१५ सालचा दूरदर्शन चा “हेम्मया कन्नडिगा”पुरस्कार, आय.आय.टी.कानपूरचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त. सुधा मूर्ती यांना भारताचा चौथा सर्वोच्य नागरी पुरस्कार “पद्मश्री”हा पुरस्कार पण प्राप्त झाला आहे.

खाजगी जीवन:

सुधा मूर्ती यांनी पुण्यामध्ये काम करत असताना एन.आर.नारायण मूर्ती यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना दोन अपत्य झाले आहेत. त्यांची मुलगी अक्षदा हिने तिच्या युके च्या मित्रासोबत (रिशी सुनाक )लग्न केले आहे जो आता युकेचा अर्थमंत्री आहे. सुधा मूर्ती यांना चित्रपट बघण्याची पण खूप आवड त्याच्या जवळ ५०० डी वी डी आहेत असे त्यांनी एका मुलाखती मध्ये सांगितले होते.

समाजसेवा:

 

सुधा मूर्ती यांनी आपल्यापतीच्या कंपनीत मदत करण्यासाठी स्वताची नोकरी पण सोडली.तेंवा त्यांना टाटा यांनी एक महत्वाचा सल्ला दिला होता तो म्हणजे ,”कोणीही पैस्याचे मालक नाही आपण केवळ पैस्याचे विस्वस्थ आहोत ,जेव्हा आपण यासास्वी होतो तेंव्हा समाजाला काही तरी परत फेड करावी .त्यांनी आजपर्यंत याच विचाराने समाज सेवा करत आहेत .

१९९६ मध्ये स्टेपन झालेली इन्फोसिस ही चारीटेबल सार्वजनिक संस्था आहे.त्यांनी या संस्थेमार्फत पूरग्रस्त भागात २३०० घर बांधून दिले आहेत.त्यांच्या सामाजिक कार्यात आरोग्य शिक्षण,महिला सक्षमीकरण,सार्वजनिक स्वचाता,दारिद्र्य निर्मुलन,इत्यादी प्रमुख मुद्दे आहेत.शाळांसाठी त्यांनी ७०००० ग्रंथालये स्थापन केले आहेत तसेच त्यांनी १६००० सार्वजनिक सौचालये पण बांधून दिले आहेत.महापूर,वादळअसो किंवा भूकंप प्रत्येक वेळी त्यांनी भरभरून मदत केली आहे.

पुस्तक प्रेम:

सुधा मूर्ती यांच्या सामाजिक कार्यासारखेच त्यांनि लेखनावर पण खूप भर दिला आहे .त्यांनी पेंग्विन या प्रकाशनामार्फत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.त्यांनी अनेक पुस्तक लिहिली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हे काही पुस्तके आहेत
कन्नड (Dollar sose,Runa,Kaveri indu,Mekaangige,Hakkiljeradalli,Athirikthe guttondu heluve….etc)
इंग्रजी (the mother I naver know,three thousand atitches,the man from eggs,here there anyehere, magic of the lost temple …etc)
सुधा मूर्ती यांचा पूर्ण जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा आहे परंतु आजच्या पिढीला प्रेरित करणारा आहे .त्यांनी आपल्या मेहनतीने व जिद्दीने आपल्या नावाचा झेंडा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फडकवला आहे .

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here