आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपॉर्टेन्ट है तो वो है “खुद की जिंदगी” !


2020 मध्ये  इरफान खान, ऋषी कपूर यांच्या जाण्याच्या दुःखातून बॉलीवूड आजून सावरला नव्हता तोच स्टार अभिनेता “सुशांत सिंह राजपूत ” याच्या निधनाची बातमी आली आणि मन पुन्हा एकदा हेलावून गेले.

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करून अभिनेता सुशांत आपल्या करियरच्या चढत्या मार्गांवर होता. त्याच्या नकळत असं जाण्याने त्याच्या चाहत्यांसह बॉलीवूड सुद्धा चक्रावून गेले.

आज सुशांतच्या जाण्याला एक वर्ष झाले तरीही हे एक वाईट स्वप्न पहिल्यासारखच वाटत आहे.

new google

काय पो चे, शुद्ध देशी रोमान्स, पिके, महेंद्रसिंग धोनी, द अन टोल्ड स्टोरी यासारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्याने उत्कृष्ट काम केले. त्याच्या याच कामाची पावती म्हणून तो त्याच्या चाहत्याच्या गळ्यातला ताईत बनला होता.

Sushant Singh Rajput is a bandh mutthi,says Byomkesh Bakshi ...

सुशांत सिंह राजपूत हे नांव आपल्याला नवीन नाहीये. सुशांत असा अभिनेता होता ज्याने आपल्या अभिनयाच्या जीवावर अनेक लोकांच्या मनात घर केले. सुशांत मध्ये ऍक्टिंग , डान्सिंग हे गुण ठासून भरले होते. त्याचा सिनेमापर्यंतचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे.

दि. 21 जानेवारी 1986 ला बिहारच्या पटना येथे जन्मलेल्या सुशांतचे वडील एक सरकारी अधिकारी होते. 2002 मध्ये त्यांचा देहांत झाला.  लहानपानापासून सुशांतवर अभिनयाचं भूत चांगलंच होते. त्याने आपलं सुरवातीला शिक्षण पटना व नंतर दिल्ली येथील हंसराज मॉडेल स्कूल येथे पूर्ण केले. पुढे जाऊन दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअर ची डिग्री मिळवली.

सुशांत सिंह राजपूत याचे निजी जीवन खूपच संघर्षमय राहिलेले होते. प्रतेकाप्रमाणे त्याच्याही आयुष्यात चढ़ -उतार होतेच.
कॉलेज मध्ये असतानाच त्याची डान्स मधील रुची वाढून लागली. म्हणून त्याने डान्स शिकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाशी त्याच्या परिवारातील कोणीही सहमत नव्हते. तरी सुद्धा त्याने हार न मानता शामक दावर यांचा डान्स ग्रुप जॉईन केला. त्यांनतर त्याच्या मेहनतीवर खुश होऊन दावर यांनी त्याला मुंबई मध्ये एक कार्यक्रम करण्याची अनुमती दिली.

suhant sinh rajput dead - yuvakatta

सुशांत नी अभिनयाची सुरवात नाटकातून केली. आपली कला आणखी चमकावी म्हणून त्याने फेमस ऍक्शन डायरेक्टर अल्लत अमीन यांच्याकडून मार्शल आर्ट पन शिकून घेतले.त्यानंतर त्याने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमध्ये
केलेले काम सर्वांच्याच पसंतीस उतरले. आणि तिथूनच त्याच्या अभिनय करिअरची खरी सुरवात झाली. त्यानंतर त्याने बरेच डान्स शो सुद्धा केले. जरा नचके दिखा 2, झलक दिख लाजा 4 हे काही मुख्य शो ज्यात त्याने “पॉप्युलर परफॉर्मन्स ” हा पुरस्कार पण मिळवला होता.

सुशांत सिंह चे फिल्मी बॅकग्राऊंड नसल्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास कुठलीही अभिनेत्री तयार नव्हती. सुशांतने 2014 साली ” काय पो चे ” या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. परंतु तो चित्रपट तेवढ नांव कमवू शकला नव्हता. अश्या वेळी शुद्ध देशी रोमान्स मध्ये परिणीती चोपडा सोबत मुख्य भूमिका साकारली. येथून पुढे मात्र त्याला खूप चित्रपटांची ऑफर यायला लागल्या. त्याने भूमिका साकारलेला एम. एस. धोनी हा 2016 मधील सर्वांत हिट चित्रपट होता.

छोट्या पड द्यावरील “पवित्र रिश्ता ” या मालिकेतून घराघरात पोहचलेला सुशांत सिंह एक उत्कृष्ट अभिनेता होता.आपल्या अभिनयाने त्याने हिंदी भाषिकच नव्हे तर मराठी भाषिक चाहते सुद्धा निर्माण केले. कुठलीही अभिनायाची पार्शवभूमी नसतानासुद्धा सुशांत एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान बनवण्यात यशस्वी झाला ते फक्त त्याच्यात असलेल्या जिद्द व चिकाटीमुळेच..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here