आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात  जागतिक महामारी कोरोनाचा पहिला पेशंट सापडला आणि हा आकडा पाहता पाहता वाढतच गेला. शेवटी खबरदारीचा उपाय म्हणून आधी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. अवघ्या 2/3 दिवसातच संपूर्ण भारतभर लॉकडाऊन लागू झाला.  सर्व व्यवहार ठप्प झाले. देशभरात आपल्या घरापासून देऊ अडकून पडलेल्या लोकांना गोरगरीबाणा काही सामाजिक व राजकीय संस्थांनी आपापल्या परीने मदत करायला सुरवात केली. याच काळात कोपरगावच्या भक्ती सामाजिक संस्थेने माणुसकीचे दर्शन घडवत मोठ्या प्रमाणात अडकलेल्या लोकांची मदत केली आहे.

भक्ती सामाजिक संस्था :

कुर्डुवाडी ता. माढा जी. सोलापूर येथे कार्यरत असलेली भक्ती सामाजिक संस्था ही गेल्या 3 वर्षापसून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.  कुठलाही राजकीय हेतू, किंवा स्वहित न पाहता ही संस्था आजपर्यंत काम करत आली आहे.
एकीकडे कोरोना महामारीत सर्वजण आपल्या घरात असले तरी भक्ती सामाजिकचे कार्यकर्ते आपापल्या परीने अडकलेल्या लोकांची मदत करण्यास घराबाहेर पडत होते.सोशल डिस्टंशिंग, मास्क व हवी ती खबरदारी घेऊन त्यांनी गोरगरिबांसाठी केलेली मदत नक्कीच प्रशंसा करण्याजोगी आहे.

कोरोना मुळे कर्फ्यु असल्याने सर्व सामान्य माणूस घराबाहेर पडत नव्हता. शिवाय हॉटेलं, फळ हातगाडी, इतर खाद्य दुकानं 100% बंद आहेत.त्यामुळे भिक्षा मागणारी,निराधार मंडळी यांची उपासमार होत होती. ही गोष्टी जेव्हा भक्ती सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी या लोकांना पाडव्यानिमित्त केलेल्या पोळ्या , ताजे जेवण दिले.
“तहान लागलेल्याला पाणी, आणि भुकेल्याला अन्न “याप्रमाणे त्यांनी परिसरातील सर्व गरजूना मदत करण्यास सुरवात केली.

लॉकडाऊन सुरु होऊन कर्फ्यू लागला असं असलं तरी भक्ती सामाजिकच कार्य चालूच होते. त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यास सुरवात केले. भक्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरीश भराटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण लॉकडाऊन काळात लोकांना धीर देत काळजी घेण्याचे आव्हान करत राहिले.

कोरोना महामारीवर आजपर्यंत कुठलीही लस न मिळाल्यामुळे लोकांची प्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे होते. ही गोष्ट लक्षात घेऊन भक्ती सामाजिकनी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या निर्देशनानुसार “आर्सेनिक अल्बम 30” या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमीओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचे ठरवले. गोळ्याची उपलब्धता कमी असल्यामुळे सुरवातीलाच त्यांनी कुर्डुवाडी शहरातील यशवंत नगर आणि परिसरात घरोघरी जाऊन गोळ्यांचे वाटप करण्यास सुरवात केली. जश्या जश्या गोळ्या उपब्ध होत गेल्या, तसा त्यानी त्या वाटपाचे प्रमाण पण वाढवले. एवढेच नाही तर डॉ. मोहसीन मकनू यांनी नागरिकांना माहिती दिली. यावेळी यशवंत नगर मित्र मंडळ ,पल्लू भाऊ ढेकळे ,राहुल भराटे, मनोज नवगिरे, आदित्य साळुंखे, बालाजी कदम ,राजेंद्र वाघमारे, रूक्षभ मोरे नितीन कन्हेरे संस्थेचे अध्यक्ष हरीश भराटे उपस्थित होते..

सलग 2 महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे  लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली होती. ही गोष्ट लक्षात घेऊन भक्ती सामाजिकचे अध्यक्ष श्री. हरीश भराटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व गोरगरिबांचे 3 महिन्याचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली.

यासारख्या बऱ्याच उपक्रमाद्वारे भक्ती सामाजिक संस्थेने आपला मदतीचा ओघ सुरूच ठेवला. संपूर्ण लॉकडाऊन काळात त्यांनी सामाजिक भान जपत गोरगरिबांसाठी केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here