आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

प्राण्यांप्रमाणेच काही वनस्पती देखील स्वताचा बचाव करण्यासाठी भौतिक आणि रासायनिक संरक्षण यंत्रणा बनवतात .त्या स्वतामध्ये अनेक प्रकारचे रसायन तयार करतात जगामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांना आपण विषारी म्हणतो,त्यामधील काही वनस्पती तर एवढ्या धोकादायक व विषारी आहेत कि त्यांच्यासमोर एखादा विषारी साप कमी वाटेल. आपणास हे वाचून आश्चर्य वाटेल कि यामधील काही वनस्पती तर आपल्या सभोवतालीच असतात चला तर जाणून घेऊया जगातील ५ अशा विषारी वनस्पती बद्दल…

Rosary pea (गुंज)

Rosary Pea (Abrus precatorius) - Uses, Benefits, Dosage and Properties

रोसेरी पी म्हणजेच गुंज या वनस्पतीला तिच्या सुंदर अशा बियांमुळे ओळखले जाते. लाल आणि काळ्या रंगाच्या बिया ह्या जगभरात कंठ आभूषण बनवण्यासाठी वापरल्या जातात. जेवढ्या सुंदर या बिया दिसतात तेवढ्या त्या धोकादायक पण आहेत. या बियांमध्ये (अब्रीन) नावाचे  विष असते या बियांचे कवच फोडून जर खाल्ल्या गेल्यास abrin नावाचे हे विष शरीरामध्ये अनेक बदल घडून आणते ते पेशींना त्यांचे प्रथिने तयार करण्यास प्रतिबंधित करते त्यामुळे पेशी मरतात. श्वास घेण्यास आडचन होते, उलट्या होतात, अतिसार, निर्जलीकरण, आणि डोळ्यांना वेदना होतात. जास्त प्रमाणात विषबाधा झाल्यास व योग्य उपचार ण मिळाल्यास मृत्यू पण होऊ  शकतो.

Atropa Belladonna (गिरबुती )

Atropa belladonna

 बेलाडोना हे युरोप,नॉर्थ आफ्रिका,आणि वेस्ट आशिया मध्ये आढळणारी अतिशय विषारी वनस्पती आहे या वनस्पतीचा प्रत्येक भाग विषारी आहे विशेषतः मुळे ही सर्वाधिक विषारी असतात. या वनस्पतीमध्ये (Tropane Alkaloid ) नावाचे विष आढळते. याची थोडीशी मात्रापण कोणत्याही जनावरास किंवा मानवास घातक होऊ शकते. याचे फळ हे अतिशय सुंदर असल्यामुळे लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करते त्यामुळे लहान मुलांना याचा जरा जास्तच धोका असतो. या वनस्पतीचे पाने किंवा २ पेक्षा अधिक फळे ( जी ब्लू बेर्री सारखी) दिसतात खाल्यास एका वयस्क माणसाचा पण मृतू होऊ शकतो. याची विषबाधेची लक्षणे डोळ्यापुढे अंधकार, तोल जाने, डोके जड पडणे,हे आहेत.

 

Olender  ( कन्हेरी )

allamanda แปลว่าอะไร? - ฝึกสะกดคำจากสีตัวอักษร ภาพประกอบสวยๆ คำ ...

 

 आपल्या सर्वांच्या परिचयाचे कन्हरीचे झुडूपही अतिशय विषारी असते हे जवळपास सर्व उद्यान,बागेमध्ये हमखास आढळते.या झुडपाची कांडी कोणत्याही ओल्या जागी टाकल्यावर तिथेच वाढू लागते,यामुळेच भारतामध्ये ही वनस्पती भरपूर प्रमाणात आढळते. या फुलांचा उपयोग लग्न,समारंभामध्ये सजावटीसाठी केला जातो. भारतात रोडच्या दुभाजाकांवारही ह्या झुदुपांना बघितले जाऊ शकते. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असतो जो मानवास नुकसानदायक ठरू शकतो,यामध्ये  प्रामुख्याने digitoxigenin,neriin,olendrin.olendroside, हे विषारी घटक असतात. विषबाधा झाल्यास त्याचा परिणाम मानवाच्या हृदय आणि मध्यवर्ती मज्जा संस्तेवर होतो ज्यामुळे अत्याधिक हृद्य गती, उलटी, लाळ,अतिसार, ही लक्षणे आढळतात. या वनस्पतीचे फुले अगदी गोड सुगंध देतात व त्यांचा रंग लाल,पिवळा,गुलाबी,पांढरा असतो परंतु दुर्दैवाने यामध्ये विषारी घटक असतात.

Custor bean plant  (एरंडी )

 

Castor-oil Plant with Bolls Stock Footage Video (100% Royalty-free ...

 आपल्या सर्वांना एरंडेल तेलाविषयी तर माहीतच असेल,ते वेगवेगळ्या त्वचा रोगांवर उपचारासाठी ,वेदना शामक म्हणून वापरले जाते. हे तेल ज्या वनस्पती मधून निघते टी खूपच विषारी असते,एरंडीच्या बियांमध्ये रायसीन (ricin)नावाचे विषारी द्रव्य असते रायसीन हे सायानाइडच्या ६००० पट जास्त विषारी आहे. हे आतापर्यंतचे माहित असलेले सर्वात विषारी घटक आहे.परंतु एरांद्या पासून विषबाधा ही त्या व्यक्तीने घेतलेल्या बियांवर अवलंबून असते. प्राण्यामध्ये पण याचा परिणाम प्रजाती नुसार बदलून दिसू शकतो. या विषाची लक्षणे तोंडात वेदना,रक्तदाब कमी,अतिसार,ही आहेत.योग्य उपचार ण केल्यास २४ तासांच्या आत मृतू  पण होऊ शकतो. जेवढे विषारी हे ricin आहे तेवढेच एरंडेल तेलाचे फायदे पण आहेत. या तेलापासून साबण,मेणबत्ती,कृतीम रबर,ह्या वस्तू बनवल्या जातात.

White snakeroot  ( श्वेत शंकुकर्ण )

 

White Snakeroot - Ten Random Facts

एकाद्या गोस्तीमध्ये सनके एवढा शब्द जरी आला तर आपणास भीती वाटते.असेच काही snakeroot या वनस्पती बद्दल आहे.ही वनस्पती नॉर्थ आणि सेन्ट्रल अमेरिका मध्ये जास्त प्रमाणात आढळते.या वनस्पती मध्ये  tremetone नावाचे खतरनाक रसायन असते .जर एकाद्या गायीने किंवा म्हशीने या वनस्पतीस खाल्ले तर त्यांचे मांस व दुध सुधा विषारी बनते.हे दुध पिल्याने किंवा मांस खाल्याने उलटी,कमजोरी,एवढेच नाही नंतर कोमा मधेही जाऊ शकते .सन १८१८ मध्ये अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांची माता नेन्सी हन्कस लिंकन ह्या पण अशाच गायीचे दुध पिल्यामुळे मरण पावल्या होत्या.ह्या होत्या जगातील सर्वात विषारी ५ वनस्पती आपणास ही माहिती जरूर आवडली असेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here