आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मे पासून भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढव चालला आहे. दोन्ही देशाचे दूत आपल्या परीने चालू असलेला हा वाद मिटवण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चिनी आणि भारतीय सैन्यांमध्ये चकमक झाली. यात भारताचे तीन जवान शहीद झालेत. त्यात तेलंगणाच्या कर्नल संतोष बाबू यांच्यासह अन्य19 जवानांचा समावेश आहे.
16व्या बिहार रेजिमेंटचे कर्नल असलेले संतोष बाबू हे गेल्या दीड वर्षांपासून भारत चीन सीमारेषेवर तैनात होते. कर्नल संतोष बाबू हे हैद्राबादच्या सैनिक शाळेमध्ये एन डी ए चे विद्यार्थी सुद्धा राहिले होते. शाहिद संतोष बाबू हे तेलंगणा मधील सूर्यापेट येथील होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी आलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चीनच्या सैन्याने एका मोठ्या षडयंत्रांतर्गत भारताच्या सैनिकांवर फसव्या पद्धतीने हल्ला केला.
नियंत्रण रेषेवरील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, की 15 जून रोजी सीमा भागात सुरु असलेली चीनी सैन्याची जमवाजमव कमी होईल. चीनी सैन्य गलवान प्रदेशातील आपल्या हद्दीत परत जाईल. 16 जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी चीनी सैन्य माघार घेईल, यावर दोन्ही बाजूंनी आधीच सहमती दर्शवण्यात आली होती
भारत चीनमधील हा सीमेवरचा वाद आहे. भारत ब्रिटीश काळातील मॅकमोहन लाईनला सीमा रेखा मानतो. पण चीन हे मान्य करत नाही. हेच कारण आहे की दोन देशांमधील सीमा रेषा अनेक ठिकाणी ओढली गेली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवरील जमीन ताब्यात घेतली आणि दावा केला. तथापि, हा वाद कायमचा नाही.
त्याचप्रमाणे पूर्व लडाख प्रदेशात चिनी सैन्य पुढे आले आणि त्यांनी छावणी लावून बसले.
.
१९७५ नंतर भारत आणि चीनमधील सर्वात रक्तरंजित संघर्ष १५ –१६ जूनच्या रात्री गॅलन व्हॅलीमध्ये झाला. या घटनेने दोन्ही देशांमधील सीमेवर तणाव वाढला आहे. या घटनेत भारताचे 20 सैनिक ठार झाले, जे गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी संख्या आहे. तसाच चीनचे सुद्धा बरेच सैनिक मारले गेल्याच बोलल जात आहे ,अस असल तरी चीनकडून मात्र अद्याप अश्या कुठल्याही गोष्टीची पृष्ठी देण्यात आली नाहीये.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.