आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मेजर शैतान सिंह: १२० साथीदारांसह १८०० चीनी सैनिकावर भारी पडले होते..!


भारतीय सैन्यामधील अनेक वीर जवान आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा ण करता तत्पर असतात. देशावरील अफाट प्रेम व देशभक्ती यामुळेच कित्येक सैनिकांनी आपल्या पराक्रमामुळे देशाच्या इतिहासात अजरामर होण्याचा मान मिळवला आहे. असेच एक वीर सैनिक मेजर शैतान सिंह ज्यांना त्यांच्या पराक्रमासाठी देशाचा सर्वांत मोठा वीरता पुरस्कार “परमवीर चक्र” प्रदान करण्यात आला होता.  जाणून घेऊया मेजर शैतान सिंह यांच्याबद्दल…

मेजर शैतान सिंह

 

नोव्हेंबर १९६२ भारत चीन युद्ध सुरु होते. तेव्हा मेजर शैतान सिंह 13 कुमायूं बटालियन च्या ‘सी’ कम्पनी चुशूल सेक्टर मध्ये कार्यरत होते. लद्दाख मध्ये बर्फ आणि थंडीच्या वातावरणात हे सर्व सैनिक चीनशी युद्ध करत होते. मेजर शैतान सिंह यांच्या तुकडीमध्ये १२० जवान होते. याच्या अगोदर यांना एवढ्या थंडीच्या वातावरणात कधीही पोस्टिंग झालेली नव्हती. नाही यांच्याकडे थंडीपासून वाचण्यासाठी कुठल्याही प्रकारची सेवा उपलब्ध होती. अश्या परिस्थितीत हे सर्व जवान आपल कार्य तत्परतेने पूर्ण करत होते.

१८ नोव्हेंबर १९६२ सकाळी 3 च्या सुमारास मेजर शैतान सिंह यांना चीनच्या सिमारेषेपलीकडे काही हालचाली दिसल्या. त्यांच्या लक्षात आले कि चीनी सैन्य त्यांच्यावरती चालून येत आहे. सर्व सैनिकांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांना समजले कि ही चीनी सैनिकांची एक चाल होती. तिथे कुठल्याही प्रकारचे सैन्य नसून त्यांनी “याक” प्राण्यांच्या गळ्यात कंदील बांधून त्या कळपाला भारतीय सीमारेषेकडे पाठवले होते. भारतीय सैन्यांच्या गोळ्या, बारूद कमी व्हावा यासाठी चीनी सैनिकांनी बनवलेला प्लान होता.

चीनी सैन्यांना बर्फाळ प्रदेशमध्ये युद्धाची सवय होती मात्र या उलट मेजर यांच्या तुकडीला तसा कुठलाही अनुभव नव्हता.

त्यांतर मात्र चीनी सैनिकांनी करण्यास सुरवात केली. भारतीय सैनिकाकडे जास्त गोळ्या, हत्यारे उपलब्ध नव्हते. आणि लगेच मदत मिळणे सुद्धा शक्य नवते हे मेजर शैतान सिंह यांच्या लक्षात आले. सिनिअर ऑफिसरनि सर्वाना चौकी सोडून मागे हटण्यास कळवले. परंतु मेजर मागे हटण्यास तैयार नव्हते. त्यांनी आपल्या सर्व साथीदारांसह लढण्याचा निर्णय घेतला. बटालियनने संपूर्ण ताकतीने चीनी सैनिकांचा समना केला चीनी सैन्यांनी तोफा आणि मशीन गण नि हल्ला चढवला. १२० सैनिक संपूर्ण चीन सैन्याशी युद्ध करत होते.

मेजर शैतान सिंह

चीनी सैन्याच्या आक्रमणामुळे मेजर यांचे बरेच साथीदार शहीद झाले तर काही घायाळ होऊन पडले होते. स्वतः मेजर शैतान सिंह घायाळ पडले होते. त्यांच्या काही साथीदारांनी त्यांना उचलून बर्फाच्या पाठीमागे नेले. जिथे त्यांना मेडिकल सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हती. त्यांच्या साथीदारांनी त्यांना तेथेच थांबण्यास सांगितले परंतु मेजर खाली उतरून परत लढण्यास आले. आता मेजर सर्वांच्या समोर जाऊन थांबले त्यांच्या हाताला जखम झाल्यामुळे त्यांना बंदूक चालवन शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्या दोन साथीदारांना मशीन गण आणण्यास सांगितले.

मेजर यांनी मशीन गण आपल्या पायाला बांधण्यास सांगितली आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मेजर तेथूनच पायाच्या सहायाने मशीन गण चालवत राहिले. त्यानंतर मात्र मेजर शैतान सिंह गायब झाले. तब्बल 3 महिन्यानंतर जेव्हा भारतीय सैनिक इतर सैनिकांचा आणि त्यांचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना एका ढिगाऱ्याखाली कोणीतरी दबलेले दिसले. बर्फामुळे त्याचं संपूर्ण श्गारीर आखडून गेले होते. मशीन गण तशीच त्यांच्या पायाला दोरीच्या सहायाने बांधलेली होती. यावरून ते मेजर शैतान सिंह असल्याचे सैन्यांच्या लक्षात आले.

mejar shaitan singh
major shaitan singh -yuvakatta

चीनी सैनिकांसोबत लढता लढता कधी ते ढिगाऱ्याखाली अडकले हे त्यांना ही कळले नाही. त्यांच्यासोबत त्यांच्या ११४ अन्य साथीदारांचे शव सुद्धा भारतीय सैनिकांनी शोधून काढले. बाकी सैन्यांना चीनी सैनिक बंदी बनवून घेऊन गेले होते. भलेही भारत युद्ध हरला होता परंतु चीनी सैनिकांचं सर्वांत जास्त नुकसान मेजर शैतान सिंह यांच्या चौकीवरच झाल होत. चीनी सैन्याचे लागभाग १८०० सैनिक याठीकानी मारले गेले होते.

त्यांच्या या पराक्रमाबद्दल भारतीय सैन्याकडून त्यांना सर्वोच अश्या ” परमवीर चक्राने ” सन्मानित करण्यात आले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here