आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गलवान घाटीतील चकमकीमुळे चीन- भारत यांच्यात तणाव वाढला आहे. आपले २० जवान त्या चकमकीत शहीद झाल्यामुळे संपूर्ण देश चीन विरोधात आक्रमक झालेला दिसतोय. सर्वानी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून चीन ला धडा शिकवण्याच ठरवल आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणत खप आहे. भारतीय उत्पादनापेक्षा चीनचा माल बराच स्वस्त असल्यामुळे लोकांचा कल चीनी वस्तूंकडे जास्त होता. परंतु आपण कधी विचार केला कि चीनी माल एवढा स्वस्त का असतो?

चीन सध्या जागतिक लेवलला एक महत्वाचा देश होण्याच्या प्रयत्नात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर देश कोरोनाशी लढत असताना चीन आंतरराष्ट्रीय व्यवहारावर आपल लक्ष केंद्रित करत आहे.चीनच्या एवढ्या मोठ्या निर्णयामागे नक्कीच काहीतरी सपोर्ट असणारच. तर चीनला सर्वांत मोठा सपोर्ट आहे तो म्हणजे “वस्तू बनवणे आणि विकण्याचे चीनी मॉडेल”.

आपण या मॉडेलची गोष्ट यासाठी करतोय कि याच मॉडेलच्या जीवावर चीननी आजपर्यंत बाजारपेठेमध्ये आपले स्थान बनवून ठेवले आहे. याच मॉडेलवर लक्ष देऊन पाहिल्यास आपल्याला कळेल कि, चीनच्या वस्तू एवढ्या स्वस्त कं असतात?

सर्वांत महत्वाच ते म्हणजे चिनच “मास प्रोडक्शन”

मास प्रोडक्शन म्हणजे नवीन प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट बनवत राहणे. चीन नेहमीच आपली उत्पादन क्षमता वाढवत राहतो. कुठल्याही प्रोजेक्ट वर चीन वारंवार काम करून त्यातून उत्पादन क्षमता वाढवतो. असे करण्याचे चीनकडे २ कारण आहेत.

१) इकॉनमी ऑफ स्केल:

“कमी प्रमानात मोठमोठ्या वस्तू बनवण्यापेक्षा, मोठ्या प्रमाणत छोट्या -छोट्या असंख्य वस्तू बनवणे “हे चीनच्या इकॉनमीट महत्वाच आहे. संपूर्ण छोट्या छोट्या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे चिनचे उत्पादन तर वाढते , परंतु खर्च सुद्धा कमी होतो.त्यातूनच त्यांना आपल्या वस्तूंचा भाव कमी ठेवण्याची संधी उपलब्ध होते. चीनची व्यापाराची कला याच इकॉनमी ऑफ स्केल वर चालते.

२) अलिबाबा सारखे निर्माते.

ज्या पद्धतीने अलिबाबा सर्व छोट्या छोट्या वस्तू बनवत असे भलेही तो मार्केटमध्ये स्वतः विकत नसे परंतु निर्मिती करणे हे त्याचे मुख्य ध्येय होते. याच पद्धतीचा वापर करून चीनी नागरिक आज घरोघरी छोट्या छोट्या वस्तूपासून, इलेक्ट्रोनिक साहित्यांपर्यंत निर्मिती करून ते या व्यापारातील ठोक विक्रेते होऊन बसले आहेत. भलेही ते स्वतः ह्या वस्तू विकत नाहीत परंतु e-commers साईटच्या मदतीने ते व्यापाराचे व्यापारी बनले. या साईटवरून अनेक विक्रेते त्यांच्या सामानाची ठोक, किरकोळ खरेदी करतात आणि चीनिओ व्यापाराची एक साखळी तयार करतात.

Household Products Wholesale China Yiwu
चीनी वस्तू- युवाकट्टा

चीनचा माल एवढा स्वस्त का असतो?

चीनी माल स्वस्त असण्यासाठी सुद्धा २ कारणे आहेत.

१) कमी खर्चावर मिळणारे लेबर

चीनमध्ये लेबर कॉस्ट अत्यंत कमी आहे. महत्वाच म्हणजे चीनमधील कुठलाही नागरिक शक्य तोपर्यंत बहरे देशात काम नाही करत. म्हणून त्यांचाच देशात कमी पैस्यावर सुद्धा हे काम करण्यास तयार असतात. त्याचाच फायला प्रोडक्शन कंपनीला होऊन ते वाचलेल्या खर्चामधून वस्तूंची किंमत कमी करतात. ज्याचा फायदा त्याच्या वस्तूंना होऊन त्यांनी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली जाते.

२) जास्तीत जास्त उत्पादन क्षमता:

चीनचा माल स्वस्त असण्यास आजून एक कारण म्हणे त्यांची “इकॉनमी ऑफ स्केल”.
चीन इतर देशातील व्यापार्यांना सुविधा देते कि तुम्ही आमच्या येथील कंपन्यांच्या वस्तू खरेदी करा. त्यात फक्त सुरवातीला काही प्रमाणात पेमेंट करा , आणि वस्तू घेऊन जा. त्या कंपनीचे उरलेले पेमेंट हे चीनी बँक करतात. त्यानंतर जेव्हा कंपनीला त्यांचे पैसे व्यापार्याकडून मिळतात तेव्हा ते पैसे बँकेटत वापस जमा केले जातात. या सर्व प्रोसेस ला चीनी “ओपेक सब्सिडी ” अस म्हणतात.

या कारणामुळे चीनी वस्तू एकदम स्वस्त असतात…!

यामुळेच जगातील बरेच देश, कंपन्या वस्तू खरेदीसाठी चीनकडे पाहतात.

मग प्रश्न असा उपस्थित होतो कि, बाकीचे देश, भारत चीनी मॉडेल का नाही वापरत? चीन प्रमाणेच भारत, रशिया, अमेरिका यांच्या सुद्धा उत्पादन वाढवण्याची क्षमता  खूप जास्त आहे. परंतु एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे “रिसर्च एंड डिवलपमेंट”.

कोणतीही नवीन संकल्पना आनने ,तिला डेव्हलप करणे यासारखे अनेक रिसर्च भारत, अमेरिकेमध्ये होत असतात . परंतु “रिसर्च एंड डिवलपमेंट” याच्या मंजुरी साठी एक मोठा खर्च मागत असते. याउलट चीन मात्र अश्या प्रकरच्या कुठल्याही व्यवस्थेला ण जुमानता आपल्या योजनांवर काम करते. या सर्वांमुळे चीन आपले उत्पादने स्वस्त व जास्त प्रमाणात विकू शकतो.

येणाऱ्या काळात भारताला जर चीन वर भारी पडायचा सेल तर चीनचा भारतातील बाजारपेठेवरचा कब्जा उठवायला लागेल. परंतु अस करण्या अगोदर भारताला त्या वस्तूंच्या बरोबरीत स्वदेशी त्याच किमतीत लोकांना परवडतील असी उत्पादने निर्मित करण्याच आव्हान पेलाव लागेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here