आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लडाखच्या गलवान खोऱ्यातील चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकातील चकमकित २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे देशाट चीन विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. अश्यातच चीनवर संपूर्ण बहिष्कार ( china baycott ) ची मागणी जोर धरू लागली आहे.

भारत-चीन यांच्यातील मे पासून सुरु असलेल्या तणावामुळे दोन्ही देशात युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.

भारतीय बाजारपेठेत चीनचा मोठा कब्जा आहे. भारतात अनेक चीनी वस्तूची आयात मोठ्या प्रमाणात होते.

मोबाईल असो, या इलेक्ट्रिक, कुठल्याही क्षेत्रात चीननी आपले पाय भारतीय बाजारपेठेत चांगलेच रवलेले आहेत. देशातील नागरिकांनी यापुढे कुठलेही चीनी प्रोडक्ट, समान खरेदी करणार नाही असा एकसूरच उमटवला आहे.
अश्यातच आता भारतीय गुप्त यंत्रणेने काही चिनी APPSच्या वापर आपल्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याच निदर्शनास आणून दिल आहे.

त्यांच्या मते या APPSच्या माध्यमातून चीन आपल्या प्रायवसी लिक करू शकतो. गुप्त यंत्रणेने या APPS वरती भारतात कायमची बंदी आणण्याचं सांगण्यात आल आहे. तसेच नागरिकांनीही त्यांच्या मोबाईल मधुन हे APPS लवकरात लवकर काढून टाकण्याचं आव्हान केले आहे.

 china baycott
baycott china -yuvakatta

पाहूया कोणते आहेत ते चीनी APPS.. 

गुप्त यंत्रणेच्या माहितीनुसार 360 Security, APUS ब्राउज़र, Baidu मैप, Baidu Translate, BeautyPlus, Bigo Live, CacheClear DU ऐप्स studio, Clash of Kings, Clean Master – Cheetah, ClubFactory, CM ब्राउज़र, DU Battery Saver, DU Browser, DU Cleaner, DU Privacy, DU recorder, ES File Explorer, हेलो, Kwai, LIKE, Mail Master, Mi Community, Mi स्टोर, Mi Video call-Xiaomi, NewsDog, Parallel Space, परफेक्ट Corp, फोटो Wonder, QQ International, QQ Launcher, QQ Mail, QQ Music, QQ NewsFeed, QQ Player, QQ Security Centre, ROMWE, सेल्फीCity, SHAREit, SHEIN, TikTok, UC Browser, UC News, Vault-Hide, वीगो Video, Virus Cleaner (Hi Security लैब), VivaVideo- QU Video Inc, WeChat, Weibo, WeSync, Wonder कैमरा, Xenderआणि YouCam Makeup. हे चीन चे मोबाईल अप्लिकेशन आहेत, जे भारतीय नागरिकांसाठी येणाऱ्या काळात धोकादायक ठरू शकतात.

चीनी

गुप्त यंत्रणेने संशय व्यक्त करून ही APPS ण वापरण्याचा सल्ला दिला आहे.तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही प्रकारची रिस्क घेणे तुम्हाला महाग पडू शकते.  यातील लगभग सर्वच अनुप्रयोग (apps) तुमचा डेटा सुरक्षेची ग्वाही देत नाहीयेत. या उलट चीन -भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या अप्स मधून तुमच्या डेटा, पर्सनल माहिती लीकेज होण्याची भीती गुप्त यंत्रणेने व्यक्त केली आहे.

चीनी APPS सोबतच यंत्रणेने व्हिडिओ कोन्फेरंस APP “झूम” बद्दल सुद्धा संशय व्यक्त केला आहे . त्यांच्या मते या सर्वांचा डेटा भारताबाहेर सेव केला जात आहे. जे भारतातील नागरिकांसाठी  सुरक्षित नाहीयेत.

यापैकी कोणतेही APPS जर तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर वेळीच सावध व्हा.. आणि तुमच्या पर्सनल माहितीची योग्य ती काळजी घ्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here