आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
किचनमधील हे “मसाले” आहेत सर्दी- खोकल्यावरील रामबाण उपाय…!
प्रत्येक घरातल्या किचनमध्ये मसाला हा असतोच. ज्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणात करत असतो.परंतु तुम्हाला हे माहिती आहे कि, हेच मसाले तुमच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. साधारण डोकेदुखी असो वा कंबरदुखी तुम्हाला यातून सुटकेचा श्वास मिळवण्यास हे मसाले नक्की मदत करतील .
ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे कि, पेनकिलर,व अन्य गोळ्यांच्या अति वापरामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. चला मग आज तुम्हाला काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतील. आणि तुम्हाला पेनकिलर सारख्या गोळ्यांच्या सेवनापासून वाचवतील.
पूर्वकाळापासून छोट्या-मोठ्या आजारावर घरगुती पद्धतीने इलाज केला जात असे. आयुर्वेदात लहान मोठ्या बिमारीवर उपाय म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा वापर केला जायचा. आयुर्वेदात सर्व प्रकारच्या बिमारीवर महत्वाचा उपाय म्हणून अनेक जडीबुटी,वनस्पती निवडल्या जायच्या आणि त्या तेवढ्याच गुणकारी सुद्धा असायच्या.
परंतु सध्याची पिढी ही विज्ञानवादी असल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी सारख्या छोट्या आजारांवर काढा,औषधी वनस्पती उपाय पेक्षा गोळ्या, पेनकिलरला महत्व देतात.
या आजारांवर तुमच्या किचनमधील काही गोष्टी अतिशय गुणकारी काम करतात. ज्यांच्या सेवनाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
१) काळी मिर्च:

काळी मिर्च हा मसाला सर्दी खोकला व गळ्यातील खरखर वर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.एक चमचा काळी मिर्च आणि दीड चमचा नैसर्गिक गुळ यांचा बारीक पावडर करून त्याच्या एकत्र मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्या जेव्हा पण तुम्हाला सर्दी अथवा खोकल्याचा त्रास सुरु होईल तेव्हा ह्या गोळ्या खा. तुम्हाला लगेच आराम मिळेल.
२) अद्रक (आले)
आपल्या सर्वाना आल्याचा चहा नक्क्कीच आवडत असेल. जेव्हा पण आपल्याला अशक्तपणा अथवा थकवा आल्यासारखे वाटते तेव्हा आपण आल्याचा चहा नक्की घेतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का या सोबतच अद्रक ही सर्दीवर सुद्धा अत्यंत प्रभावीपणे औषध म्हणून काम करते. जे
व्हा सर्दीमुळे तुम्हाला श्वास घ्यायला अवघड जाते . अश्या वेळी अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून २०० मिली पाण्यात टाका.अर्धा चमचा हळद आणि थोडी दालचिनी पावडर त्यात टाकून ५ मिनिट गरम करा . त्यांतर ते सर्व मिश्रण गाळून घ्या, आणि त्यात १ चमचा मध मिसळा व हे मिश्रण श्वास घ्यायला त्रास होत असल्यास प्या. तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसेल.
3) हळद:

हळद हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हळदीचा उपयोग शरीरावरील जखमेवर आणि शरीरातील आजारांवर सुद्धा होतो. शरीरावर जखम झाल्यास हळदीचा लेप लावल्य जातो. तसच सर्दीझाल्यावर गरम दुधात एक चमचा हळद घालून प्यायला दिल्यास लगेच आराम मिळतो. गळा खराब झाल्यानंतर सुद्धा हळद लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यं सर्वांनाच उपयोगी पडते.
4) जायफळ:

आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो.
सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं.
जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.