आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

शेती करून  कोणीतरी लाखो रुपये कमावतोय  यावर सरासरी लवकर कोनी विश्वास ठेवणार नाही परंतु हे सत्य आहे.

आपल्याकडे अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांनी अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांना प्राथमिकता दिली. आणि त्यामध्ये एवढं प्रचंड कर्तृत्व करून दाखवलं ज्यामुळे आज जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे‌. होय आज या लेखांमधून आपण अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…..

शेती

कर्नाटक मधील बेलगाम जिल्ह्यातील एक सुशिक्षित तरुण आज शेती करत आहे.

नुसता शेती करत नाही तर या शेतीच्या माध्यमातून या तरुणाने आज करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केलेलं आहे.

परंतु या तरुणाची स्वप्न वेगळी होती, नाइलाजाने या तरुणाला शेतीकडे वळावे लागलं आणि आज शेतीतदेखील या तरुणाने प्रचंड कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. आपण सतीश शीडागाऊंडर यांच्याबद्दल माहिती घेत आहोत.

new google

ग्रामीण भागात जन्माला आलेल्या सतीश यांनी अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना देखील आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यांनी डबल ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं होतं आणि त्यांना शिक्षक होण्याची इच्छा होती.

शेती
शेती

शिक्षक होण्याची संधी देखील त्यांच्याकडे चालून आली परंतु त्यांच्याकडे शिक्षक होण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु तेवढे पैसे देण्याची परिस्थिती नसल्यामुळे नाईलाजाने सतीश यांना शेतीकडे वळावे लागले.

सतीश आपल्या शेतामध्ये कारल्याचे पीक घेतात. शेती करण्याची आधुनिक पद्धत सतीश त्यांनी शिकलेली आहे, त्यामुळे मात्र दीड एकर शेतात देखील सतीश दरवर्षी जवळपास 50 टन कारल्याचे उत्पादन घेतात‌. या उत्पादनाच्या मदतीने ते दरवर्षी जवळपास सोळा लाख रुपयांची कमाई करतात.

2008 मध्ये जेव्हा त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेव्हा शिक्षक पदासाठी त्यांच्याकडे 16 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती, परंतु मात्र सोळा हजाराच्या नोकरीसाठी सोळा लाख रुपये मी देणार नाही असे म्हणत सतीश यांनी लाच द्यायला नकार दिला.

हलाखीच्या परिस्थितीत देखील त्यांचे वडील सतीश यांना लाच देण्यासाठी सोळा लाखाची मदत करायला तयार होते परंतु वडिलांच्या मेहनतीची कमाई अशाप्रकारे खर्च करणे त्यांना पटत नव्हते त्यामुळे त्यांनी आपली पारंपारिक शेती सांभाळायला प्राधान्य दिलं.

 शेती

शेती करायच्या सुरुवातीला सतीश यांनी चांगल्या पद्धतीने रिसर्च पूर्ण केला होता आणि त्यांना जाणवल बाजारामध्ये कारल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यांनी आधुनिक पद्धतीने आपल्या छोट्या शेतामध्ये कारल्याची शेती करायला सुरुवात केली.

इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सतीश यांना देखील प्रचंड संघर्ष करावा लागला. परंतु आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे सतीश यांनी मोठ्या प्रमाणावर ती पाण्याची बचत केली.योग्य कीटकनाशकांच्या मदतीने त्यांनी त्यांच्या शेतातील उत्पादनांची सुरक्षा केली. सतीश यांनी घेतलेल्या काळजीमुळे ते एका वर्षी जवळपास 50 टन कारल्याचे उत्पादन घेतात.

सतीश नेहमीच म्हणत असतात की, ” बरं झालं मी त्यादिवशी लाच द्यायला नकार दिला, नाही तर मी महिन्याला फक्त सोळा हजार रुपये कमावून खुश झालो असतो. आणि एवढी प्रचंड प्रमाणात कमाई करू शकलो नसतो.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा= भारतातून  नष्ट झालेली शहर..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here