आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका सरोज खान यांच आज ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांना नुकतेच 20 जून रोजी श्वास घेण्यास अवघड जात असल्यामुळे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेथेच आय. सी. यु. मध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

सरोज खान यांच्या निधनानंतर कोरिओग्राफर रेमो डिसूजा ने आपल दुःख व्यक्त केले. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सरोज खान यांच्यासोबतच्या काही फोटो शेअर करत लिहले की मी खुशनशीब आहे की मला तुमच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळाली. मला एवढ सगळं शिकवण्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. तुमची आठवण आम्हाला नेहमी इथे राहील.

सरोज खान
सरोज खान – युवाकट्टा

“सरोज खान यांनी डान्स करणे एवढ सहज केल होते, की कोणीही नवखा कलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहज उत्कृष्ट डान्स करेल.”

अभिनेत्री मनीषा कोइराला ने श्रद्धांजली देत त्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. लहानपणापासून मला क्लासिक डान्सची ट्रेनिंग दिली होती.परंतु सरोज खान यांनी मला बॉलीवूड मध्ये डान्स शिकवला त्यांच्या जाण्याने बॉलीवूड मध्ये कधीच न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.

तर अभिनेत्री तापसी पन्नूने सुद्धा सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कमीतकमी मला तुमच्या कंपनीत डान्स करण्याचा चान्स मिळाला. तुमच्या सोबतच्या त्याच आठवणी आता आमच्या सोबत राहतील.

बॉलीवूडचे दिग्ग्ज अभिनेते “अनुपम” खेर यांनी सुद्धा ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. ते म्हणाले, डान्सची मल्लिका सरोज खान,अलविदा! तुम्ही फक्त कलाकारांनाच नाही तरी संपूर्ण भारताला शिकवले की “डान्स शरीराने नाही, तर हृद्यांपासून केला जातो.” तुमच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. मी स्वतः तुम्हाला आणि तुमच्या ओरडण्याला मिस करत आहे.

सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्या सह बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना डान्स शिकवला होता.

आतापर्यंत लगभग त्यांनी 2000 पेक्षा जास्त गाण्यांना कोरिओग्राफ केले होते.

सरोज खान यांनी एक दो तीन, धकधक करणे लगा, हमको आजकल है इंतजार या प्रसिद्ध गाण्याला कोरिओग्राफी केली होती.

सरोज खान यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारात त्यांचे पती बी. सोहनलाल , मुलगा हमीद खान
आणि मुली हिना खान आणि सुकना खान आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here