आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

२०२० हे वर्ष आपणास सदैव वाईट आठवणींसाठी यादगार राहणार आहे. याच वर्षी कोरोना या विषाणूमुळे जगभरात धुमाकूळ घातला आहे.  एकीकडे जग आणि आपला देश यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे २०२० या वर्षात अनेक दिग्गज कलाकार आपणास सोडून गेले आहेत. यातील काही जनाच्या निधनाची बातमी ऐकताच जनु धक्काच बसला.

आजही त्या कालाकराचे चेहरे डोळ्यासमोर तरंगताना दिसतात. २०२० हे विशेषतः बॉलीवूड साठी काळे वर्षच म्हणावे लागेल. याच वर्षी शुशांत सारख्या अभिनेत्याने आत्महत्या केली. चला तर जाणून घेऊया २०२० या वर्षी आजपर्यंत आपणास अश्रूयुक्त नयन करून निघून गेलेल्या कलाकारांबद्दल ….

इरफान खान (1967 – 2020) 

2020
irfan khan- बॉलीवूड

बॉलीवूडचा अतिशय प्रखर सितारा म्हणून ओळखला जाणारा इरफान खान हा अशा अभिनेत्यांमध्ये सामील होता. ज्यांना तुम्ही एकदा जर पहिले तर संपूर्ण जीवनभर आठवण राहील. राजस्थानच्या जयपूर येथे जन्मलेल्या इरफानने अभिनयाची सुरवात चंद्रकांता या मालिकेने केली. १९९४ च्या काळात तो घराघरात याच मालिकेमुळे ओळखीचा होता.

आणि सतेज नाटकापासून सुरवात करून जागतिक स्तर होण्याचा प्रवास पार पाडणारा किंबहुना तो शेवटचाच व्यक्ती असेल. इरफान खान यांनी आन,हाशील , या चित्रपटात खलनायक म्हणून काम केले होते. त्याच बरोबर त्यांनी न्यूयॉर्क ,नेमषेक,हिंदी मिडीयम ,करीब करीब सिंगल, मदारी ,पिकू यांसारखे अनेक चित्रपट आपणस दिले आहेत.

ते एक चरित्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या जीवनामध्ये अनेक आव्हांनाना तोंड देत आलेल्या   इरफानने गेली काही वर्ष कर्करोगाविरुध्द पण चिकाटीने लढा दिला. यामुळेच त्यांना त्यांचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मेडियम याचे प्रमोशन सुद्धा करता आले नाही. शेवटी वयाच्या ५३व्या वर्षी इरफान खान यांनी २९ एप्रिल २०२० रोजी शेवटचा श्वास घेतला.२०२० या वर्षात आणखी एक सितारा काळाच्या पडद्या आड झाला.

ऋषी कपूर (1952 -2020)

2020
rushi kappor -बॉलीवूड

एव्हरग्रीन अभिनेता आणि ओरीजनल चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषी कपूरने आपले गेली अनेक दशके मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले.

महान दिग्दर्शक व चित्रपट निर्माते , अभिनेते राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर ने वयाच्या तिसर्या वर्षीच बाल अभिनेता म्हणून काम केले. त्यांनी मेरा नाम जोकर चित्रपटात त्यांचे वडील राज कपूर यांचा बालपणीचा किर्धार साकारला होता. ऋषी कपूर यांना खरे खुरे स्टारडम देणारा चित्रपट म्हणजे “बॉबी” या चित्रपटामुळे त्यांनी स्वतःची अलग ओळख निर्माण केली.

ऋषी कपूर यांनी १९७० ते १९८० या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले. यामध्ये कभी कभी ,अमर अकबर अन्थनी, कर्ज, यांसारखे चित्रपट होते. २००८ मध्ये त्यांना फ्लीमफ्लेअर ,लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड दिला गेला. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी ही रील लाइफ आणि रिअल लाइफ दोन्हीमध्ये हिट होती.

जीवनामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या या अभिनेत्याचा ३० एप्रिल २०२० रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांचा चुलबुला अंदाज आणि नटखट ट्वीट हे सर्वांना आठवत राहतील.

वाजीद खान (1981-2020)

2020
wajid khan -बॉलीवूड

साजीद वाजीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडीतील संगीत दिग्दर्शक ,गायक वाजीद खान यांचे ३१ मे रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले. संगीतकार वाजीद खान हे हृद्य व मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांना काही दिवसापूर्वीच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण पण झाले होते. मागील काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटर वर होते. त्यांच्या भावाने साजिद ने एका वृत्त वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी घेतली असल्याची सांगितल होते. साजिद-वाजीद या जोडीने सर्वप्रथम सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या? या चित्रपटास संगीत दिले होते.

तसेच त्यांनी सोनू निगमच्या दिवाना या अल्बम मध्ये संगीत दिले होते. त्यांनी सारे गमपा सिंगिंग सुपरस्टार , बिग बॉस यांसारख्या रियालीटी शो मध्ये पण काम केले होते. त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटास संगीत दिले. आयपीएलच्या ४ थ्या चरणाची थीम सॉंग धूमधडाका हे पण बनवले होते. गेल्या अनेक वर्षापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी २०२० या वर्षी तुटली.

सुशांत सिंह राजपूत (1986-2020)

2020
सुशांत सिंघ राजपूत – बॉलीवूड

२०२० या अपाधापिच्या काळात सर्वात मोठा धक्का बसला तो अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अत्महत्तेने जीवनाची सुरुवात अतिशय खडतर मार्गाने करून सुद्धा त्याने टीव्ही पासून बॉलीवूड पर्यंतचा सफल प्रवास पार पडला होता.चेहऱ्यावर कधीही दुखः न दाखवता तो सदैव हसमुख राहत असे.

छीचोरे चित्रपटामधून आत्महत्या ण करण्याचा सल्ला देणारा सुशांत जीवनाच्या अडचणीचा सामना करताना तो कधी कमजोर पडला त्यालाही कळले नाही.आणी त्याने १४ जून २०२० या दिवशी वयाच्या ३४ व्या वर्षी आपल्या बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिवसेंदिवस त्याच्या आत्महत्ते बद्दल नवे नवे खुलासे होताच आहेत.

बिहार सारख्या राज्यातून येऊन टीव्ही सीरिअल मिळवणे ही पण खूप मोठी गोष्ट आहे सुशांतने तर एवढ्यावरच न थांबता बॉलीवूड मध्ये आपली एक अलग ओळख निर्माण केली होती.त्याचा एम एस धोनी या चित्रपटातील अभिनय आपण कधीच विसरू शकत नाही.अशा वेळी त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र व्यक्त होत आहे. शेवटी २०२० या अभिशाप ठरलेल्या वर्षी आपण आणखी एक चमकता सितारा गमावला.

सरोज खान (1948 – 2020)

2020
सरोज खान -बॉलीवूड

नॅशनल अवार्ड प्राप्त झालेली नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे 3 जुलै २०२० रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.सरोज खान ह्या हिंदी चित्रपट जगात प्रख्यात आणि अग्रगण्य भारतीय नृत्य दिग्दर्शिका होत्या.आपल्या करिअरच्या ४० वर्षाच्या कालावधीत त्यांनी २००० पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले.

भारतातील “मदर ऑफ कोरियोग्राफी म्हणून”त्यांना ओळखले जायचे.त्यांनी सुरुवातीला अनेक वर्षे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम केले त्यांना प्रथम संधी मिळाली ती गीता मेरा नाम(१९७४) या चित्रपटामधून. त्यांना खरी ओळख आणि प्रसंशा मिळाली ति श्रीदेवी सोबत केलेल्या मी.इंडिया या मधील हवा हवाई या,नगीना,चांदणी,या चित्रपटानंमुळेतसेच माधुरी दीक्षित सोबत धक धक करणे लगा ,(बेटा) यानंतर सरोज जी बॉलीवूड च्या सर्वात यशस्वी दिग्दर्शिका बनल्या.

२०१४ मध्ये पुन्हा माधुरी सोबत गुलाब गँग या चित्रपटात काम केले. त्यांच्या सदाबहार गाण्यांमध्ये एक दो तीन,हम को आजकल है इंतजार,धक धक करणे लगा,चोली के पीछे है क्या,तम्मा तम्मा,हे सामील आहेत. तसेच बाजिगर, मोहरा, डर, डी डी एल जे, ताल, वीर जाराह ,परदेश, सोल्जर,चालबाज हे चित्रपट पण सामील आहेत. त्यांच्या गेल्याने निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही.

२०-२० हे वर्ष अजून अर्धेच संपले आहे तर यात ऋषी कपूर,इरफान खान ,वाजीद खान,सुशांत सिंघ राजपूत,सरोज खान, निम्मी,बसू चटर्जी ,शफिक अन्सारी,प्रेक्षा मेहता,योगेश गौर,साई गुंडेवार,यांसारखे अनेक सिने कलाकार हे काळाच्या पडद्या आड गेले आहेत. एवढे तर नक्की आहे कि २० -२० हे वर्ष आपणास सदैव स्मरणात राहील . शेवटी “20 वे वरीस धोक्याचे” असेच दिसत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here