आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
देशभरात ५ जुलै २०२० रोजी गुरुपोर्णिमा साजरी केली जाईल. कॉविड १९ मुळे यावर्षी आपण बाहेर मंदिर प्रार्थनास्थळ याठिकाणी गर्दी जमवू नये म्हणून सरकारने मनाई केली आहे. परंतु अपण सर्व जन आपापल्या घराच्या चार भिंतीमध्ये राहून सुद्धा आपल्या गुरु साठी पूजा व प्रार्थना करू शकतो. यामध्येच आपले आणि समाजाचे कल्याण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस हिंदू आषाढ महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या सणाबद्दल अनेक लोकांमध्ये अनेक मान्यता आहेत.चला तर जाणून घेवूया गुरु पोर्णिमेबद्दल
गुरुपोर्णिमा का साजरी करतात ?
गुरु पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. हा सन हिंदू,जैन,आणि बौद्ध धर्मातील एक महत्वाचा सन आहे. हा दिवस अध्यात्मिक,शैक्षणिक आणी सांस्कृतिक गुरूंना समर्पित आहे.त्यांच्या विषयी आदर आणी कृतज्ञता दर्शवण्यासाठी हा सन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
भारता प्रमाणे नेपाळ आणि भूतान येथे पण हा सन साजरा होतो. हिंदू आषाढ महिन्यात(जून-जुलै)पौर्णिमेच्या दिवशी हा सन असतो. विशेषतः गांधीजींनी त्यांचे अध्यात्मिक गुरु राजचंद्र यांच्या स्मरणार्थ या सणाचे पुनर्जीवन केले. गुरु पोर्णिमा खास महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ साजरी करतात.

व्यासांनी ४ वेदांचे संपादन केले,महाभारत,भगवतगीता,ब्रह्मसूत्र,तसेच १८ पुरानही त्यांनी लिहिले. त्याच बरोबर महर्षी व्यास हे दत्तात्रय (दत्त गुरु) यांचे गुरु होते. या दिवशी सर्व शिष्य आपल्या गुरूची उपासना करतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सिद्धांत हजार पतीने जास्त सक्रीय असतो असेही म्हणाले जाते.
या सणाला धार्मिक महत्वा व्यतिरिक्त शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांसाठीही मोठे महत्व आहे. भारतीय शिक्षण शास्त्रात या दिवशी आपल्या शिक्षकांची(गुरु) उपासना करतात.
गुरु हा शब्द संस्कृत मधील “गु”आणि “रु” या दोन शब्दा पासून आला आहे. गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान आणी रु म्हणजे दूर करणे. म्हणजे एक गुरूच आहे जो आपल्या जीवनातील अंधकार दूर करू शकतो. गुरु हा मानवी जीवनातील महत्वाचा आधारस्तंभ आहे.
हिंदू धर्मातील तपस्वीआणि संन्याशी साधू पावसाळ्याच्या चातुर्मास काळात एकांत निवडत असत. आणि त्या ठिकाणी राहून आपल्या गुरूची पूजा करीत. भारतात शास्त्रीय संगीत आणी शास्त्रीय नृत्य यामध्ये गुरु शिष्य परंपरेचे आजही पालन केले जाते आणि तेही लॉक हा सन साजरा करतात.
प्रत्येक समाजाच्या या बद्दल अनेक मान्यता आहेत. त्यामुळे ते सर्व जन आपआपल्या परीने हा सन साजरा करतात.
1) हिंदू धर्मातील गुरुपोर्णिमा चे महत्व:
गुरु पौर्णिमेच्या याच दिवशी महाभारताचे रचेते “कृष्णा द्वैपायन व्यास’ यांचा जन्म परशरा आणि मच्छिमार कन्या सत्यवती यांच्या घरी झाला. म्हणून हिंदू धर्मीय हा सन व्यासपोर्णिमा म्हणूनही साजरा करतात. महर्षी व्यासांनी त्यांच्या काळात अस्तित्वात असलेल्या वैदिक स्तोत्रांना एकत्र करून त्यांच्या वापरा प्रमाणे ४ भाग करून त्यांच्या ४ प्रमुख शिष्यांना ( पैला. वैसंपयान,जैमिनी,सुमन्तु )शिकवले.
या विभाजन आणि संपादनामुळे त्यांना(व्यास) विभाजन करणारा हा सन्मान मिळाला.त्यांनी पवित्र वेदाला ऋग्व,यजुर्व,साम,आणि अथर्व या ४ भागात विभागले.इतिहासात असेही वर्णन आहे कि अनेक अध्यात्मिक गुरु त्याच्या शिष्यांसमवेत झाडाखाली बसून व्यासांनी रचलेल्या ब्राह्मसुत्रांचा अभ्यास करायचे.
2) बौद्ध धर्मातील गुरुपोर्णिमा चे महत्व:

गौतम बुद्ध ज्ञानार्जनानंतर ५ आठवड्यांनी बोधगया येथून सारनाथ येथे वापस गेले. ज्ञान प्राप्ती होण्यापूर्वीच त्यांचे पूर्वीचे साथीदार त्यांना सोडून राशीपटना येथे निघून गेले होते. ज्ञान प्राप्ती झाल्यावर गौतम बुद्धांनी सारनाथ सोडून धर्म शिकवण्या साठी खूप प्रवास केला. ते आता आपल्या जुन्या साथीदारांना शोधू लागले कारण त्यांना आपल्या अध्यात्मिक शक्तीने हे कळले होते कि त्यांचे साथीदार लवकर धर्म समजतील.
सारनाथ जात असताना गौतम बुद्धांना गंगा नदी पार करावी लागली ही गोष्ट जेव्हा राजा बिम्बिसार याला कळली तेव्हा राजाने संन्याशी लोकांसाठी असलेला कर (टोल ) रद्द केला. जेव्हा गौतम बुद्धांना त्यांचे जुने साथीदार भेटले त्यांना बुद्धांनी “धर्मकप्रवर्तन सूत्र” शिकवले. आणि ते सर्वजन शिकून प्रबुध्द झाले अशा प्रकारे आषाढी पौर्णिमेच्या दिवशीच पहिल्या बौध्द भिक्षु संघाची स्थापना झाली.
हा संग लवकरच वाढून ६० सदस्याचा झाला आणी त्यांना गौतम बुद्धांनी एकट्याने प्रवास करून धर्म शिकवण्यासाठी सर्व दिशेने पाठवले. म्हणूनच बौद्ध अनुयायी हा सन मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.
3) जैन धर्मातील गुरुपोर्णिमा चे महत्व:
जैन धर्मामध्ये पण गुरु पौर्णिमेचे खास महत्व आहे,जैन परंपरेनुसार पावसाळ्यातील चातुर्मास सुरु असताना जैनाचे २४ वे तीर्थकार वर्धमान महावीर यांनी कैवल्य गाठल्यानंतर आपला पहिला शिष्य इंद्रभूनी गौतम याच दिवशी बनवला.
नंतर तोच शिष्य गौतम स्वामी किंवा गंधर म्हणून ओळखल्या जाऊ लागला. त्यांनी त्रीनोक गुहा बनवली, म्हणूनच जैन धर्मात हा सन त्रीनोक पोर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यामुळेच जैन धर्मीयांमध्ये सुद्धा या सणाचे अनन्य साधारण महत्व आहे.
गुरु पोर्णिमा हा सन शेतकरी लोकांसाठी एक चांगला दिवस मानल्या जातो.कारण शेतकरी आपल्या शेतात पेरलेल्या धान्याची वाढ होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करतात.
आणि या दिवशीपासून(चातुर्मास) कालावधी सुरु होतो.कोणताही धर्म असो भारतात गुरुचे महत्व खूप जास्त आहे.प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या गुरूच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा असतो. थोडक्यात गुरु पौर्णिमेला आपण भारतीय शिक्षक दिनही म्हणू शकतो….
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल.