आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
या गोलंदाजाने ४ बॉलमध्ये लगातार सचिन, द्रविड, राठोड आणि मांजरेकरच्या विकेट घेतल्या होत्या..!
एका गोलंदाजाने भारतीय टिमच्या चार प्रमुख खेळाडूंना एका पाठोपाठ बाद केले होते. आज जाणून घेऊया कोण आहे तो गोलंदाज…
5 मे १९९६ ला मोहम्मद अज़हरुद्दीन कॅप्टन असलेली टिम इंडिया ६५ दिवसाच्या इंग्लड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टेस्ट सामने आणि १२ इतर सराव सामने खेळायचे होते. ६ जून ला सुरु झालेल्या टेस्ट सिरीजचे पहिले २ सामने २४ जून पर्यंत संपले होते त्यात भारतीय टिम पहिला सामना हरून १-० ने पिछाडीवर होती.
कॅप्टन मोहम्मद अज़हरुद्दीन आणि सिनिअर खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील झालेल्या वादामुळे सिद्धू दौरा अर्धवट सोडून माघारी परतले होते. त्यांच्याजागी दोन युवा खेळाडू डेब्यू करण्यात आले ते म्हणजे राहुल द्रविड आणि सौरव गांगुली.
सिरीजचा तिसरा सामना ४ ते ९ जुलै दरम्यान खेळला जाणार होता . त्या अगोदर एक सराव सामना खेळणार होते. भारताचा हा सामना हैम्पशर संघाविरुद्ध होता. हैम्पशर टीमकडे पाहून असे वाटत होते कि भारतीय टिम हा सामना सहज जिंकेल.
कॅप्टन अजहर या सामन्यात खेळत नव्हते तर संघाची धुरा सचिन तेंडूलकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संघाकडून अजय जडेजा, विक्रम राठौड, सौरव गांगुली , संजय मांजरेकर ,अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद, यांसारखे दिग्गज खेळाडू मैदानात होते.
हैम्पशर टिम ने टाॅस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सलामी बल्लेबाज अजय जडेजा आणि विक्रम राठौड चुकीचा सिद्ध केला. या जोडीने सुरवातीला आक्रमक अंदाजात धावा काढण्यास सुरवात केली. पहिल्या विकेटसाठी १९२ धावंची मजबूत संख्या उभी केली.
यानंतर मात्र ३५ वर्षाचा केवान जेम्स गेंदबाजी करायला आला. कॅप्टननी जेम्सवर दाखवलेला विश्वास जेम्स ने खरा करून दाखवला. दुसऱ्याच बॉलवर त्याने अजय जडेजाची विकेट घेऊन ही भागीदारी तोडली.
सामन्यात तसे पाहता हैम्पशरच्या गोलंदाजांची अक्षरशा पिटाई होत होती.
परंतु दुसऱ्या बाजूने जेम्स ने त्याच्या दुसर्या ओव्हर मध्ये विक्रम राठोडला सुद्धा पवेलीयनचा मार्ग दाखवला.
जेम्स नि २ विकेट घेतल्यानंतर मैदानावर स्टार खेळाडू सचिन तेंडूलकर आला. सर्व मैदानावर सचिन सचिन असा नारा ऐकू येत होता,आणि जेम्सनी सचिनला पहिल्याच बॉलवर विकेट केले. जेम्स ने फेकलेला चेंडू स्विंग होऊन हलकासा कट लागून शोर्ट लेग फिल्डरच्या हातात गेला. या सर्व घडामोडीवर हैम्पशरच्या खेळाडूंचा विश्वास बसत नव्हता ,ते फक्त मैदानात एकमेकांकडे पाहून हसत होते.

लगातार २ चेंडूवर २ विकेट भारतीय टिम ने गमावल्या होत्या. त्यांतर मैदानात आला तो युवा खेळाडू राहुल द्रविड. आणि समोर होता हॅड्रीक वर असेलला जेम्स. जेम्स चेंडू टाकण्यास धावला आणि चेंडू सरळ टाकण्याच्या प्रयत्नात तो थोडासा स्विंग झाला आणि द्रविडच्या पॅडवर जाऊन लागला ,जोरदार आपली झाली आणि हंपायरने विकेट असल्याचा इशारा दिला. पहिल्यांदाच ३५ वर्ष्याच्या ऑल राउंडरणे हॅड्रीक घेतली होती. हैम्पशरच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
3 चेंडूवर 3 विकेट घेतल्याच्या नंतर भारताकडून मैदानात उतरला तो संजय मांजरेकर. पाहता पाहता २०७/१ विकेट असणारी भारतीय टिम २०७/४ विकेट वर येऊन पोहचली.जेम्स चेंडू टाकन्यासाठी परत धावला आणि या वेळेस चेंडू स्विंग नाही झाला.
तरीसुद्धा चेंडू मांजरेकरच्या बॅटच्या कोपऱ्यावर लागून विकेट किपरच्या हातात गेला. आणि अविश्वसनीय असा पराक्रम जेम्सच्या नावावर झाला. एका षटकात ४ चेंडूमध्ये ४ मोठ्या खेळाडूंची विकेट घेण्यात जेम्स यशस्वी झाला होता.
जेम्सने बोलिंग मध्ये केलेल्या कमालानंतर बल्लेबाजी करण्यात सुद्धा कमतरता दाखवली नाही. दुसऱ्या दिवशीच्या खेळात जेम्स ४ नंबरवरती बल्लेबाजी करण्यास आला. आणि एक सुंदर अशी १०३ रनांची शतकिय खेळी खेळून गेला.
जेम्सने आपल्या कारकिर्दीत २५५ सामन्यात एकूण ८५२६ धावा बनवल्या. आणि ३९५ विकेट आपल्या नावावर केले. परंतु त्या दिवसासारखा चांगला दिवस माझ्यासठी दुसरा कुठलाच नव्हता, अस जेम्सने स्वतः एका मुलाखतीत सांगितल होते.
हे ही वाचा : ६ दिवस कोमात राहिल्यानंतर तो फुटबॉलपटू बोलू लागला फ्रेंच!
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.