आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारत-आणि चीन मध्ये सुरु असलेल्या सीमावादामुळे दोन्ही देशात तणावपूर्वक वातावरण आहे. थोड्याच दिवसाखाली गलवान घाटीतील चीन आणि भारतीय सैन्यातील झालेल्या चकमकीत भारताचे 20 बहादूर जवान शहीद झाले होते. त्यांनतर संपूर्ण देशात चीन विरुद्ध तीव्र संताप पहायला मिळाला.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरतं आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधान यांनी भारतात चीनचे लोकप्रिय अँप टिकटॉक सह अन्य 58 अँप्सवर बंदी आणली.

चिनी सैनिकांसोबत भिडलेल्या 20 बहादूर जवानांच्या शौर्य आणि बहादूरीची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळणार आहे.

स्टार अभिनेता अजय देवगण गलवान घाटीतील जवानांच्या घटनेवर एक चित्रपट बनवणार आहे. अशी घोषणा त्यांच्या टीम कडून करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेलं नाहीये. अजय देवगण या चित्रपटात स्वतः ऍक्टिंग करणार आहेत का नाही याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी असणार आहेत.

जवान
जवान- युवाकट्टा

पूर्व लडाख याठिकाणी असणाऱ्या गलवान खोऱ्यामध्ये 15 जून रोजी चिनी सैन्याविरुद्ध भारतीय सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. यामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाली. 1975 नंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराला झालेली ही पहिली दुर्घटना होती, जेव्हा अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने हल्ला केला होता. ज्यामुळे चीनविरोधात देशभर तीव्र निदर्शन करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान घाटितील जवानाना भेट दिली आहे. तिथे त्यानी भारतीय जवानांचा हौसला आणखी बुलंद केला. भारतीय जवानांवर चित्रपट बनवण्याची घोषणा केल्यांनतर प्रेक्षकांमध्ये सुद्धा या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

अजय देवगण लवकरच “भुज : द प्राईड ऑफ इंडिया ” ha चित्रपट घेऊन येत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. अजय देवगन आताच तान्हाजी : द अनसंग वॉरिअर मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून 250 कोटींचा व्यावसाय केला होता.

गलवान घाटीतील जवानांच्या शौर्यावर आधारीत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेसुद्धा वाचा…  चीनी वस्तू स्वस्त काअसतात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here