आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

धीरुभाई अंबानीच्या स्वप्नामुळे देशाला नवी ओळख मिळाली होती…!

 

धीरुबाई अंबानी यांचा जन्म  २८ डिसेम्बर १९३२ ला गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील छोटस गाव चोरवडा मध्ये झाला होता.

 

धीरुभाई यांच्या यशाची कहाणी अत्यंत प्रेरनादाई आहे. लहानपणी त्यांनी सामोसे सुद्धा विकले होते. त्यांनी यमनमध्ये ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर काम केले होते. असे म्हटले जाते कि जेव्हा त्यांचे मित्र आणि भाऊ अभ्यास करत असत, तेव्हा धीरुभाई अंबानी पैसे कमावण्याचे मार्ग शोधत असत.

धीरूभाई अंबानी
धीरूभाई अंबानी

यमनमधून भारतात आल्यानंतर ते खिश्यात फक्त ५०० रु. घेऊन मुंबई ला आले होते. १९६६ मध्ये त्यांनी रिलायन्स टेक्स्टाइल ची स्थापना केली. फक्त १५ हजार रुपयापासून रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशन सुरु करणारे धीरुभाई अंबानीयांच ६ जुलै २००२ साली हृदयाचा झटका येऊन निधन झाले होते, जेव्हा ते वारले त्यावेळी त्यांची एकूण संपती ७५ हजार करोड पेक्षाही जास्त होती.

 

त्यांचे व्यावसाईक साम्राज्य वाढवले ते म्हणजे त्यांचे दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी.

धीरुभाई यांना लहानपणापासून अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि छोटे मोटे काम सुरु केले. सुरवातीला त्यांनी गावातच फळे आणि नाष्टा विकण्यास सुरवात केली. परंतु फायदा होत नसल्यामुळे ते बंद करून सामोसे विकण्यास सुरवात केली. परंतु जेव्हा हे काम सुद्धा चालले नाही तेव्हा ते भावाकडे यमनला गेले.

धीरूभाई अंबानी

धीरुभाई अंबानी यांचे भाऊ यमन मध्ये नोकरीला होते. तेथे त्यांच्या ओळखीने धीरुभाई यांना एका पेट्रोल पंपावर काम मिळवून दिले. त्यावेळेस त्याचा महिन्याचा पगार फक्त ३०० रुपये होता. परंतु अंबानी यांच्या मेहनत आणि योग्यतेच्या
बळावर ते समोर चालत गेले. धीरूभाई अंबानी नेहमीच आपल्या व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असत.

धीरूभाई अंबानी यमन मध्ये ज्या कंपनीत कामाला होते तिथे कॅन्टीनमध्ये २५ पैस्याला चहा होता परंतु, ते दुसऱ्या महागड्या हॉटेलमध्ये चहा पिण्यास जातअसत, जिथे त्यांना चहासाठी एक रुपया द्यावा लागत असे. जेव्हा धीरूभाई यांना विचारल गेल कि असे का करता, त्रेव्हा त्यांनी उत्तर दिले कि , त्या हॉटेल मध्ये मोठे व्यापारी चहा पिण्यासाठी येतात आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतात ज्यामुळे मला त्यांच्या व्यवसायाच्या बर्याच गोष्टी ज्ञात होतात.

नंतर जेव्हा धीरूभाई अंबानी बर्मा शैल कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर बनून भारतात वापस आले तेव्हा त्यांचा पगार ११०० रुपये महिना होता. एका इंटरव्ह्यूव मध्ये त्यांनी सांगितल कि, जेव्हा ते यमनमध्ये होते तेव्हा ते १० रुपये खर्च करण्याअगोदर १० वेळा विचार करत असत. परंतु शैल कंपनीत कधी -कधी एक टेलिग्राम पाठवण्यासाठी ५ हजार रुपये पण खर्च करत असत. त्यांना या गोष्टीची संपूर्ण माहिती होती कि, कुठे पैसे खर्च केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल.

धीरूभाई अंबानीने शैलकंपनी सोडल्यानंतर १५ हजार रुपयामध्ये रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशनची स्थापना केली. तेव्हा कंपनी मसाले आणि कॉटन यार्न चा व्यवसाय करत असे. त्यादरम्यान धीरुभाई यांनी मातीसुद्धा विकली होती.

 

धीरूभाई अंबानी
धीरूभाई अंबानी

धीरूभाई अंबानी स्वतःला शून्य लेवलचा व्यावसाईक समजत असत. त्याचा अर्थ असा होता कि त्यांच्याकडे कुठलीही व्यावसाईक विरासत नव्हती. तरीदेखील त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी जेपण कार्य केले ते स्वतःच्या हिमतीवर केले. धीरूभाई यांची सर्वांत मोठी खासियत हि होती कि ते आपले ध्येय नेहमी मोठे ठेवत असत.

धीरूभाई अंबानी देशातील पहिले असे व्यावसाईक आहेत ज्यांनी कोटा परमीत आणि लायसन्स राजमध्ये सुद्धा आपले काम चांगल्या पद्धतीने पार पाडले. जिथे टाटा ,बिर्ला , बजाज सारख्या बड्या औद्योगिक कंपन्या घराण्यातील लायसन्स समोर हर मानत होत्या , तेथे धीरूभाई कश्या न कश्या पद्धतीने आपले काम काढून घेत होते. हिच त्यांच्या यशाची सर्वांत मोठी किल्ली होती.

रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशन च्या माध्यमातून धीरूभाई यांनी पॉलिस्टरचा व्यापार सुरु केला . त्यात त्यांना प्रचंड कॉम्पीटेशन चा सामना करावा लागला. परंतु मुनाफ्याकडे लक्ष न देता त्यांनी आपले लक्ष गुणवत्तेवर दिले. ते जोखीम उचलणारे व्यापारी होते.  हळू-हळू धाग्यांच्या व्यवसायावर त्यांनी आपला जम बसवला. आपल्या अतूट ज्ञानाच्या जोरावर ते मुबई सुत व्यापारी संघटनेचे संचालक झाले.

१९६६ मध्ये त्यांनी अहमदाबादच्या  नरोडा येथे कापड गिरणीची स्थापना केली आणि विमल ब्रांडला देशाचा गाजलेला ब्रांड बनवले. बर्मा शैल कंपनीमध्ये काम करत असतानाच धीरूभाईनी पेट्रोकेमिकल कंपनी सुरु करण्याचे ध्येय बनवले होते.
थोड्याच दिवसांनी त्यांचे हे स्वप्न पण पूर्ण झाले. एकदा पूर आल्याने गुजराथ येथील पाताळगंगा नदीच्या काठावर असलेला त्यांचा पेट्रो केमिकलचा प्रोजेक्ट संपूर्ण उध्वस्त झाला होता.

तेंव्हा मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या दुपोंट कंपनीतील अभियंत्यांना विचारले कि या प्रोजेक्ट चे दोन सयंत्र १४ दिवसात सुरु होऊ शकतात का,तेंव्हा त्या अभियंत्यांनी कमीत कमी १ महिना कालावधी लागेल म्हणून सांगितले.

हि गोष्ट जेंव्हा धीरूभाई यांना माहित झाली त्यांनी लगेचच मुकेश अंबानी यांना फोन करून त्याअभियंत्यांना वापस पाठवण्यास सांगितले. कारण धीरूभाई अंबानी यांचे असे मानणे होते कि, त्या अभियंत्यांचा दुसर्या लोकांवर सुद्धा नकारात्मक परिणाम होईल.त्यानंतर २६ महिने लागणारा तो प्रोजेक्ट केवळ १८ महिन्यांमध्ये तयार झाला याचे पूर्ण श्रेय्य हे धीरूभाई अंबानी यांना जाते.

धीरूभाई अंबानी यांनी किरकोळ गुंतवणुकीने सुरु केलेल्या रिलाइन्स इंडस्ट्रीज मध्ये २०१२ पर्यंत सुमारे ८५००० कर्मचारी काम करत होते. भारत सरकारला मिळणाऱ्या संपूर्ण करामधील ५ टक्के कर हा फक्त रिलाइन्स भरत असे.

२०१२ मध्ये मालमत्तेच्या हिसाबाने सर्वात मोठी आणी श्रीमंत कंपन्यांमध्ये धीरूभाई अंबानी यांची कंपनी पण सामील झाली होती. धीरूभाई यांना संडे टाईम्सने आशियातील टाॅप ५० व्यापाऱ्यांच्या यादीमध्ये सुद्धा सामील केले. एवढेच नाही तर फोर्ब्सच्या यादीमध्ये स्थान मिळवणारी रिलाइन्स हि भारताची पहिली कंपनी होती.

 

धीरूभाई अंबानी
धीरूभाई अंबानी

धीरूभाई अंबानी यांनी अपार मेहनतीने कंपनीला उभे केले, त्यांचे पुत्र मुकेश यांनी त्याच कंपनीला यशाच्या शिखरावर नेवून ठेवले. आज रिलाइन्स हि भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल १५० अरब पर्यंत पोहचले आहे. मुकेश अंबानी हे जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती ६.५ अरब डॉलर (जवळपास ४९०८०० करोड रु) वरून वाढून ६४.५ बिलिअन डॉलर एवढी झाली आहे.

जगातील अनेक मोठ मोठ्या कंपन्यांनी रिलाइन्स च्या जिओ मध्ये गुंतवणूक केली आहे. रिलाइन्स हि पूर्णतः कर्जमुक्त कंपनी आहे. टेलिकम्युनिकेशन च्या सोबतच जियोमार्ट द्वारे किरकोळ व्यापारामध्ये सुद्धा कंपनीने लक्ष्य घातले आहे. ५०० रु पासून ते देशातील सर्वात मोठी कंपनी हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि वाचायला आवडेल – टाटाची स्थापना कशी झाली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here