आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

विदेशी समजले जाणारे हे ५ ब्रँड आहेत भारतीय!

 

आपला भारत देश हा समृद्ध वारसा लाभलेला देश आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने विलक्षण प्रगती केली आहे.भारत देश हा जागतिक विश्वगुरु म्हणून उदयास येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक प्रसिध्द विदेशी ब्रँड आहेत. आणि त्यांनी आपल्या बाजार पेठेवर चांगलाच जम धरला आहे.

 

तसे पाहता भारत हा संपूर्ण जगाला कापड,पोलाद,सेंद्रिय रसायने,शेतीमाल, दागिने,रत्ने,तसेच अनेक प्रकारचा कच्चा माल निर्यात करतो.तरी सुद्धा काही लोकांचा असा समज आहे कि विदेशी ब्रँड हे भारतीय ब्रँडच्या तुलनेत पैशांना जास्त मूल्य देतात. आजच्या वेळी अशा लोकांना ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे कि, काही भारतीय ब्रँड हे विदेशी ब्रँडला पण जागतिक बाजारपेठेत बरोबरीची टक्कर देत आहेत किंबहुना त्यांना मागे पण टाकत आहेत.

 

ब्रँड

 

आता गरज आहे टी या स्वदेशी ब्रँडला आपण स्वीकारण्याची.आपल्या ब्रँडला प्रसिध्द करणे तसे पाहता सोपे काम पण नाही. अनेक मोठ मोठे विदेशी ब्रँड हे आपली जाहिरात करता काही प्रसिध्द व्यक्तींना आपल्या ब्रँडचा चेहरा बनवतात. त्यामुळे आपण आता सावध होवून या जाहिरातीला बळी न पडता केवळ स्वदेशी वस्तूच घ्यायला पाहिजे. नुसते “बायकॉट चायना” म्हणून नाही चालणार.

 

आपल्या दैनंदिन जीवनात वापरणारे अनेक ब्रँड आणि त्यांचे उत्पादने फक्त त्यांच्या नावावरच चालतात.

 

परंतु या ब्रँड सोबत काही भारतीय ब्रँड आहेत ज्यांच्या नावामुळे किंबहुना ते आपणास विदेशी वाटतात. परंतु त्यांच्या दर्जेदार संशोधन आणी कडक उत्पादनांमुळे विदेशी ब्रँडला पण टक्कर देत आहेत. चला तर आज जाणून घेवूया अशाच काही अशाच ब्रँडबद्दल जे आहेत तर भारतीय परंतु जागतिक बाजारपेठेत सर्व मोठ्या  ब्रँड पण मागे टाकत आहेत.

१)लुईस फिलीपी ( louis philippe )

 

१९८९ मध्ये स्थापन झालेला लुईस फिलीपी हा ब्रँड पुरुषांसाठी उत्कृष्ट कपडे बनवतो. लुईस फिलीपी या ब्रांड चे नाव ऐकल्यावर एकवेळ कोणालाही वाटेल हा विदेशी ब्रँड आहे,परंतु हा एक भारतीय ब्रँड असून या ब्रँड ची मालकी आदित्य बिर्ला ग्रुपच्या मदुरा फॅशन आणी लाइफस्टाइलची आहे.

 

या ग्रुपमध्ये आज वॅनह्युसन,अलेन सॉली,पीटर इंग्लंड,असे अनेक कपडे आणी जीवनउपयोगी साहित्याचे ब्रँड समाविष्ट आहेत.आदित्य बिर्ला या समूहात आज ७०० पेक्षा जास्त विशेष फ्रान्चायाझी स्टोअर्स आहेत.तसेच या समूहाचे २००० पेक्षा जास्त मल्टी ब्रँडआउटलेट्स आहेत. यातले काही भारतात तर काही भारताच्या बाहेर अनेक देशांत आहेत.

 

२) कॅफे कॉफी डे ( cafe coffee day )

 

भारतातील प्रसिध्द ब्रँडच्या यादीमध्ये कॅफे कॉफी डे चा उल्लेख जरूर करावा लागेल. कॅफे कॉफी डे हा ब्रँड बंगळूर च्या कॉफी डे इंटरप्राईस च्या मालकीची भारतीय कॉफी आउटलेट्स ची साखळी आहे. हा उद्योग समूह कॅफे सोबत आशियातील अरेबिका जातीच्या कॉफी बियांचा सर्वात मोठा उत्पादक आहे.

 

१२००० एकर क्षेत्रामध्ये स्वतः कॉफी लावगड करून दरवर्षी हा समूह अनेक देशांत हे कॉफी निर्यात करतात.कॅफे कॉफी डे चे पहिले स्टोअर हे ११ जुलै १९९६ रोजी बंगळूर येथे स्थापन झाले. आजपर्यंत कॅफे कॉफी डे चे १७०० पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. तसेच आता या समूहाने भारता बाहेरही आपले स्टोअर्स सुरु केले आहेत. त्यामध्ये ऑस्टरिया,मलेशिया,इजिप्त,दुबई,कराची या ठिकाणी हा ब्रँड खूप प्रसिध्द आहे.

 

३) झोमॅटो (zomato)

 

झोमॅटो हि भारतीयांनी बनवलेली ऑनलाईन फूड स्टार्ट अप कंपनी आहे. झोमॅटो ची स्थापना २००८ मध्ये झाली. या पहिले याचे नाव फुडी बे होते. झोमॅटोचे मुख्यालय हरियानातील गुरूग्राम येथे आहे. झोमॅटो च्या सहायाने घरी बसल्या आपल्या परिसरातील हॉटेल मधून जेवण मागवू शकतो.

 

झोमॅटो स्थापन झाल्यावर त्याला फूड टेक मध्ये चांगलेच यश मिळाले. आजच्या वेळी त्यांचा युजर बेस दरमहा १९ दसलक्ष भेटी घेणाऱ्या वापरर्कर्त्यांचा आहे. झोमॅटो हि संपूर्ण जगात सर्वात वेगाने वाढणारी भारतीय स्टार्ट अप कंपनी आहे. झोमॅटो आज भारता व्यतिरिक्त २९ देशामध्ये वापरल्या जात आहे. तसे पाहता हि एक भारतीय म्हणून आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे.

 

४)ओल्ड मोन्क (old monk)

 

ओल्ड मोन्क हा गेली अनेक वर्षापासून चालत आलेला भारतीय डार्क रम चा ब्रँड आहे. या ब्रँडसाठी कपिल मोहन यांचे फार मोठे योगदान आहे .या ब्रँडमध्ये अनेक प्रकारची रम आहे जसे कि, ओल्ड मोन्क सुप्रीम रम, ओल्ड मोन्क गोल्ड रिजर्व, ओल्ड मोन्क एक्स.एक्स.एक्स, ओल्ड मोन्क व्हाईट, ओल्ड मोन्क लिजेंड.

 

किमान ८ वर्षे साठवलेली हि रम भारतात बनवून विदेशात निर्यात केली जाते. आपला गडद रंग आणी वनीला ची चव हे या ब्रँडचे वैशिष्ठ. यामुळेच हि रम सर्व बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. ओल्ड मोन्क हा बरयाच वर्षापासून (IMFL)आहे. “इंटरनॅशनल लिस्ट ऑफ टॉप १०० ब्रँड रिटेल व्हॅल्यु” मध्ये हा ब्रँड २४० दसलक्ष डॉलर्सच्या सहाय्याने ५ व्या क्रमांकावर होता. हा ब्रँड भारताबाहेर रशिया,यु.एस.ए,यु के,जपान यांसारख्या अनेक देशांच्या बाजारपेठेत खूप प्रसिध्द आहे.

 

५) लॅक्मे कॉस्मेटिक (lakme cosmetics)

 

लॅक्मे कॉस्मेटिकया ब्रँडची स्थापना १९५२ मध्ये झाली. भारतीय महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवर मौल्यवान परकीय चलन खर्च करू नये म्हणून जे.आर.डी.टाटा यांनी हा सौंदर्य प्रसाधने बनवणारा ब्रँड सुरु केला. त्यांनी संपूर्ण भारतात लॅक्मे ब्युटी सलूनची स्थापना केली. आणी सौंदर्य जगात टाटाचा नवीन व्यवसाय सुरु केला. मुंबईमध्ये होणाऱ्या द्विवार्षिक फॅशन शो लॅक्मे फॅशन विक (LFW)चे आयोजन सुद्धा हीच कंपनी करते. भारतीय असूनही हि कंपनी अनेक दिग्गज कंपन्यांना टक्कर देत आहे.

 

लॅक्मे कॉस्मेटिकची उत्पादने आज सर्वांच्या ओळखीचे आहेत. करीना कपूर आणी अनन्या पांडे सारख्या अभिनेत्र्या या ब्रँड चा चेहरा आहेत. रोज कित्तेक वेळा त्यांची जाहिरात टीव्हीवर दाखवल्या जाते. लॅक्मे हि सुद्धा एक भारतीय कंपनी आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या मालकीची हि कंपनी टाटा ओईल मिल (tomco) ची उपकंपनी आहे.

 

लॅक्मे कॉस्मेटिक हा आज एक ग्लोबल ब्रँड म्हणून जगात प्रसिध्द आहे. हा भारतातील सर्वात जास्त विश्वासू सौंदर्य प्रसाधन ब्रँड आहे. या ब्रँड चे नाव हे फ्रेंच ओपेरा गायक लॅक्मे यांच्या नावावर ठेवले आहे कारण, त्या सौंदर्यासाठी प्रसिध्द होत्या. लॅक्मे कॉस्मेटिक हा ब्रँड आपल्या दर्जेदार उत्पादने आणी कडक संशोधनामुळे जगातील ७० पेक्षा जास्त देशाच्या बाजारपेठेत ३०० पेक्षा जास्त उत्पादने विक्री करतआहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि वाचायला आवडेल – टाटाची स्थापना कशी झाली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here