आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

गेल्या काही दिवसात सोशल मिडीयावर एका बसचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   या लेखात जाणून घेऊया कोणती आहे ती बस आणि काय आहेत तिचे वैशीष्ट.

 

७० च्या दशकात कलकत्ता – लंडन हि बस सेवा चालू होती.

 

आज आपणास प्रवास करायचा असेल तर विमानसेवा. रेल्वे, जहाज, बस, कार, टॅक्सी, उबर यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये लांब पल्याच्या प्रवासासाठी विमान सेवा हि अत्यंत महत्वाची आहे. विमान सेवेसोबत प्रवास करण्यासाठी बसचा वापर हमखास केला जातो. परंतु बसचा प्रवास हा अत्यंत कंटाळवाणा असतो त्यामुळे आपण बसमध्ये जास्त वेळ प्रवास नाही करू शकत.

 

new google

एक वेळ अशी पण होती जेंव्हा आपल्या भारत देशातून लंडनला जाण्यासाठी चक्क बससेवा चालू होती. आपल्याला कदाचित यावर विश्वास बसणार नाही कि, एवढ्या लांब पल्ल्याची बस यात्रा पण होऊ शकते, परंतु हि एकदम खरी गोष्ट आहे.

 

बस
बस

सिडनीच्या एका टूर आणी  ट्राव्हल्स  कंपनीद्वारे हि बस सेवा संचालित केली जायची. हि बस सेवा त्याकाळची सर्वात लांब पल्ल्याची बस यात्रा म्हणून प्रसिध्द होती. प्रवास खूप लांबचा असल्यामुळे या बसला आपल्या ठराविक ठिकाणी पोहचण्यासाठी जवळपास ४५ दिवसांचा कालावधी लागत असे.

हि बस सेवा सर्वप्रथम १९५० मध्ये सुरु करण्यात आली. यामध्ये सिडनी स्थित अल्बर्ट टूर्स अंड ट्रावेल्स या कंपनीचा सिंहाचा वाटा होता. हि बस सेवा १९५० पासून १९७३ पर्यत चालू होती. या बस प्रमाणेच हा प्रवास करण्यासाठी वापरण्यात येणारा मार्ग पण उल्लेखनीय होता.

 

बस
बस

 

गेल्या काही दिवसापासून या बसचे जुने फोटो आणी तिकीट सोशल मिडीयावर सगळीकडे पसरत आहे. या बसचा निघण्याचा आणी गंतव्य ठिकाणावर पोहचण्याचा दिवस पहिलाच ठरवला जायचा. प्रवास दरम्यान काही विशेष पर्यटन ठिकाणी हि बस थांबत असे, येथे राहण्याचा आणी बाकी आर्व खर्च ती ट्रावेल्स कंपनीच करत असे.

 

त्याकाळी कलकत्ता हे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण होते त्यामुळे येथून लंडन येथे बरेच प्रवासी प्रवास करत. कलकत्ता येथून सुटल्यावर हि बस नवी दिल्ली , काबुल , तेहरान , इस्तांबुल , यामार्गाने होऊन लंडन येथे पोहचत असे. आणी याच मार्गाने परत पण येत असे.

 

या प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या सोई सुविधांचे खास ध्यान ठेवल्या जायचे. एवढ्या आरामदायक सुविधा असल्यामुळे त्यावेळी कलकत्ता ते लंडन या प्रवाशाचा किराया १४५ पौंड एवढा होता. यामध्ये बसचा किराया ,खान पान , प्रवासादरम्यान हॉटेल मध्ये राहण्याचे भाडे या सर्व सुविधांचा समावेश होता.

 

हि एक डबल डेकर बस होती. बसमध्ये प्रवाश्यांना स्लीपिंग बर्थ ची आरामदायक सुविधा मिळत असे. हि बस नव्हे तर चालता फिरता राजमहालच भासत असे. अशा प्रकारे सर्वांसाठी कलकत्ता ते लंडन हा एक अविस्मर्नीय प्रवास असे.

 

आजपर्यंत जास्त लोकांना या बस बद्दल जास्त काही माहित नव्हते, परंतु गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे या बसची फोटो आणी तिकिट्स चे फोटो खूप व्हायरल होत आहेत त्यामुळे या बसची सर्वत्र चर्चा चालू आहे. त्याकाळी भारत ते लंडन हि लांबपल्ल्याची एकटीच यात्रा नव्हती, यासोबत लंडन ते ऑस्ट्रेलिया हि बस सेवा पण उपलब्ध होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर येतोय चित्रपट. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here