आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हे आहेत आईच्या एका शब्दाखातर २२०० किमी पायी यात्रा करणारे कलयुगातील राम -सीता!


आजवर आपण वडिलांच्या इच्छेसाठी प्रभाऊ श्री राम यांनी 14 वर्ष भोगलेल्या वनवासाच्या, आयबापांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळांची कथा ऐकत आलो आहोत. किंबहूना असे अनेक ज्यांनी आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते केले  परंतु आज आम्ही तुम्हाला एका अश्या जोडप्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी उच्चशिक्षित असताना फक्त आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मोठं कार्य करण्यास सरसावले आहेत.
पाहूया काय आहे प्रकरण..

रोडच्या कडेने गाडीवर आपला संसार घेऊन चालणाऱ्या या जोडप्याला तुमच्यापैकी बहुतांश जणांनी पहिले असेल. यांना पाहून कुणालाही वाटेल की रस्त्याच्या कडेने जाणारे अथवा पोट भरण्यासाठी धडपडत असलेले भिकारी असतील. परंतु सत्य काही वेगळंच आहे.

जेव्हा या जोडप्याशी बातचीत केली तेव्हा समजले की, हे कोणी साधारण भिकारी, अथवा वाटसरू नसून एक उच्चशिक्षित जोडपे आहेत. साहजिकच प्रश्न पडला मग हे असेल का फिरताहेत? कोठून आले असतील? राहतात कुठे?
या सर्व प्रश्नाची उत्तरे जेव्हा त्यांनी द्यायला सुरवात केली, तेव्हा त्याच्या गोष्टी ऐकून मन भावुक होऊन गेले.

new google

1 वर्षापूर्वी त्या जोडप्यातील पुरुषाचे दोन्ही डोळे काही करणाने गेले होते, अनेक डॉक्टर्सनी चेक करून त्यांना ऑपरेशन करून सुद्धा  काही उपयोग नाही असा सल्ला दिला होता. शेवटी त्याच्या आईने डॉक्टर्सला ऑपरेशन करायला भाग पाडले. आणि आपला मुलगा ठीक व्हावा. त्याचे डोळे परत यावे यासाठी या माउलीने कृष्ण मंदिरात जाऊन नवस केला.
” जर माझ्या मुलाचे डोळे परत आले तरी माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला येईल. ”

आई

आपल्या आईचा हा नवस पूर्ण करण्यासाठी हा पुरुष 2200 कि. मी चा प्रवास पायी करत आहे.

या कार्यात त्याची पत्नी सुद्धा “माता सीता” प्रमाणे त्यांच्या सोबत आहे. सुख-दुःखात कधीही एकमेकांना एकटं न सोडण्याच वचन लग्नात यांना दिले होते. तर आता या कार्यात सुद्धा मी त्यांच्या सोबतच आहे. नवस जरी माझ्या पतीला फेडायचा असा तरी त्यांची सेवा, त्यांना रस्त्यात खायला, प्यायला करून देण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत आले आहे असे त्या म्हणतात.

या जोडप्याच्या बोलण्यावरून तरी ते पूर्णतः सुशिक्षित वाटत होते. कारण ते आपल्या बोलण्यात 75% इंग्रजी शब्दांचा उपयोग करत होते.त्यांना जेव्हा त्यांच्या शिक्षणाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांचं बोलणे ऐकून धक्काच बसला.
त्यांनी लंडन येथील ऑकसपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्ष खगोलशाश्त्र यावर पीएचडी केली आहे.

तर त्यांच्या पत्नीने मनोविकार शाश्त्र यावर लंडन येथे पीएचडी केली आहे. एवढे शिकलेल असताना सुद्धा हे जोडपे फक्त आपल्या आइने केलेला नवस फेडण्यासाठी एवढा प्रवास करत आहेत

मुख्य म्हणजे एवढं शिकलेल असताना यांच्या चेहऱ्यावर कुठलाही गर्व नव्हता. त्यांना मिळणाऱ्या पेंशन मधून त्यांनी आजवर अनेक ट्रस्टला मदत केली आहे. या काळात सुद्धा प्रभू श्री रामप्रमाणे हा पुरुष आपल्या आईचा शब्द पूर्ण करण्यासाठी चालत आहे. आणि याला साठी देतेय ती त्याच्या आयुष्यातील जोडीदार..

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

एवढे अचंबित करणारे त्यांचे विचार ऐकल्यानंतर मन सुन्न झालं. त्यांच्या वागण्या, बोलण्यातील सहजपणा पाहून आपण या जगात काहीच नाहीयेत असच वाटते. आईच्या शब्दाखातर 3 महिन्यापासून 2200 किमी अंतर पायी चालत असलेल्या या जोडप्याचं नांव आहे डॉ. देव उपाध्याय व डॉ. सरोज उपाध्याय.

श्रद्धा ‘अंधश्रद्धा बाजूला ठेवून फक्त आईचा शब्द पूर्ण करण्यासाठी एवढं सगळं करणाऱ्या या पुत्रास व त्याच्या जीवनसाथीस मानाचा मुजरा…..

धन्य आहे ती आई जिच्यासाठी हे एवढ सगळं करताहेत…..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here