आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

“इंडियाज ड्रोन सायन्टिस्ट” म्हणून ओळखला जाणारा एन.एम. प्रताप.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर एका भारतीय शास्तज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोसोबत एक लेखही आहे ज्यामध्ये या शास्तज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी.आर.डी.वो.मध्ये स्वतः नियुक्त केल्याचा उल्लेख केला आहे. या बातमीमध्ये कितपत सत्यता आहे हे जाणून घेवूया या लेखामधून….

१) प्रताप एन.एम यांची ओळख 

 

 ड्रोन सायन्टिस्ट
ड्रोन सायन्टिस्ट

आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी कुठलाही पळवाट नाही, परंतु काही गोष्टींच ध्यान ठेवलं तर आपण आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकतो. काही लोकांना सफल होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तर काही लोक एकदम कमी वयातच सफल होऊन दुसर्यांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण बनतात.

अशाच काही मोजक्या लोकांमध्ये कर्नाटक राज्यातील मांड्या येथील ड्रोन सायन्टिस्ट  प्रताप एन.एम हे पण सामील आहेत. अतिशय विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या लोकांची भारतात काही कमतरता नाहीये. अशाच बुद्धिमान लोकांमध्ये प्रताप यांचे पण नाव सामील झाले आहे.

  डिसेम्बर २०१७ मध्ये जपानमध्ये झलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक प्रदर्शनात मोठा विजय मिळवल्यानंतर एन.एम.प्रताप याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. त्यानंतर एन.एम.प्रताप याने आपत्तीग्रस्त भागात लोकांना मदत पोहचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून अगदी कमी लागतीचे ड्रोन बनवले होते. प्रताप आता गावाचा तो मुलगा राहिला नव्हता ज्याने कित्तेक रात्री बसस्थानकावर झोपून काढल्या,आपल्या प्रकल्पांसाठी एकवेळचे जेवण पण सोडले होते.

आज तो “इंडियाज ड्रोन सायन्टिस्ट” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

आतापर्यंत त्याने सुमारे 600 ड्रोन बनविली आहेत जी अनेक हेतूंसाठी वापरली गेली आहेत. त्यानंतर प्रतापला अधिक प्रशंसा, मान्यता, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधील आमंत्रणे आणि फायद्याच्या रोजगार संध्या पण आल्या.

 

त्याला फ्रान्सच्या एका कंपनीने फार मोठी ऑफर दिली होती ती पण प्रतापने नाकारली. प्रतापला त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या कुटुंबासह नातेवाईकांविरूद्ध सुद्धा जावे लागले. अशा होतकरू, मेहनती, प्रतापाची प्रेरणादायक कथा.

२) ड्रोनचे आकर्षण

प्रतापचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आपल्या वडिलांना शेतीकामात मदत करण्यासाठी अगदी लहानपणीच प्रतापनेही शेतात काम करण्यास सुरुवात केली. परंतु उंच अवकाशात अतिशय निर्बंधपाने उडणाऱ्या गरुडाकडे पाहून प्रतापला काम करण्यास आणखीच स्पुरण मिळत असे. असेच दिवस जात असताना एकेदिवशी प्रतापाने टीव्हीवर प्रथमच ड्रोन बघितला आणी येथूनच त्याचे जीवन बदलले.

“त्या ड्रोनने मला गरुडांची आठवण करुन दिली. मला स्वतःसाठी एक बनवायचे होते. तेव्हा मी दहावीत होतो आणि मला स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा प्रवेश नव्हता. म्हणून, माझ्या पालकांच्या माहितीशिवाय, मी सफाई कामगार म्हणून सायबर कॅफेमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि त्या बदल्यात मालक मला सुमारे 45 मिनिटे इंटरनेट ब्राउझ करण्यास परवानगी देई “

  असे एका मुलाखतीदरम्यान प्रतापने सांगळे होते. ड्रोन बनवण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टींचा शोध त्याने लावला परंतु त्यासाठी लागणारे विविध भाग गोळा करणे हे पण त्याच्यासमोर मोठे आव्हान होते. वायर, मोटार, मदरबोर्ड, यांसारखे पार्ट खरेदीसाठी त्यच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून त्याने इलेक्ट्रॉनिक दुकानांत जाऊन बिनकामाचा कचरा पार्ट जमा करण्यास सुरुवात केली.

जेव्हा त्याने ड्रोन बनवण्याचे कौशल्य आत्मसात करून सर्व साहित्य गोळा केले त्यवेळी प्रतापने महाविद्यालयातून बी.एससी करण्यासाठी म्हैसुरला जे.एस.एस. कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स येथे दाखला घेतला होता. म्हैसूरला जाताना त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ ८००० रु दिले होते. ते त्यांनी कॉलेजची फीस भरण्यासाठी खर्च केले. त्यांनी काही दिवस दुसऱ्या मुलांना शिकवणी सुद्धा दिली जेणेकरून त्यांना पैस्यांचा थोडा हातभार लागेल.

३) आर्थिक तंगीतही स्वतःला सावरले 

  एकदा तर घरभाडे देण्यासाठी असमर्थ असल्याने त्यांना त्यांची खोली सोडून बसस्थानकावर सुद्धा झोपावे लागले. एवढे होऊन सुद्धा त्यांनी आपल्या स्वप्नांसोबत तडजोड केली नाही. प्रतापने त्यांचे पहिले ड्रोन वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बनवले होते. परंतु ते ड्रोन उत्कृष्ट रित्या उडण्यासाठी त्यांना ५० हून अधिक चाचण्या घेऊन बदल करावे लागले त्यानंतर त्यांचे ड्रोन जमिनीपासून १००० मीटर उंच सफलरित्या उडाले.

महाविद्यालयातील प्रध्यापाकांच्या मार्गदर्शनाने प्रतापाने भारतातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, शेवटी यामुळेच त्यांची जपान प्रदर्शनात जाण्यासाठी निवड झाली. जेएसएस महाविद्यालयाच्या एचओडी आणि सहाय्यक प्राध्यापक नव्यश्री बी ह्या प्रताप बद्दल म्हणतात,

  “विद्यार्थी म्हणून, प्रताप हुशार आणि लक्ष देणारा होता. तो नेहमी आपला मोकळा वेळ संशोधन कार्यात घालवायचा आणि त्याचा शिक्षक म्हणून मी त्यांला मार्गदर्शन केले. तो सूचना आणि सुधारणांसाठी नेहमीच खुला असेल. नवीन गोष्टी शिकण्याच्या आवेशाने त्याला अशा उच्चांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.  शेवटी त्याला जेंव्हा जपानला जाण्याची संधी मिळाली तेंव्हा आणखी एक समस्या उभी राहिली, ती म्हणजे भाड्याचे पैसे कोण देणार.

याच ठिकाणी प्रतापच्या आईने तिकिट खरेदी करण्यासाठी तिचे दागिने विक्री करण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच त्याच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन तिकिटांसाठी पैसे दिले. यामुळेच प्रतापचा प्रोजेक्ट टोकियो येथील आंतरराष्ट्रीय रोबोट प्रदर्शनात प्रदर्शित होऊ शकला. त्याच्या हितचिंतकांच्या आशीर्वादाने आणि समर्थनामुळेच त्याला हा मुक्काम पार पडता आला.

४) जपानने संपूर्ण जीवनच बदलून टाकले

३०० किलो वजनाची दोन ड्रोन्स व दोन जोडी कपड्यांसह, प्रथप डिसेंबर २०१ ७ मध्ये टोकियो प्रताप आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. २ ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक प्रदर्शनात हजेरी लावणे हे त्याचे एकमेव लक्ष्य होते.प्रथमच भारताबाहेर आल्यामुळे तो थोडा भेदरलेला होता. तसेच त्याने जाऊन विमानतळावरील कर्मचाऱ्यास विचारले , मला रोबोट स्पर्धेत जायचे आहे परंतु माझ्या जवळ पैसे कमी आहेत त्यमुळे मला स्वस्त मार्ग सांगा. त्या कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला.

परंतु समान जास्त असल्यामुळे प्रतापला त्या ट्रेनने ४ फेर्या माराव्या लागल्या. प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहचल्यावर त्याने बघितले कि, १२० देशातील विद्यार्थी येथे भाग गेण्यासाठी आले होते. याशिवाय त्यांची इंग्लिश पण स्पष्ट होती आणि प्रतापची इंग्लिश अगदी तोडकी मोडकी होती. परंतु यामुळे त्याने आपला आत्मविश्वास न गमावता पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कचर्यापासून बनवलेले ड्रोन प्रस्तुत केले. केवळ २० संघांची निवड झाली होती आणि त्यामध्ये प्रतापला गोल्ड मेडल भेटले होते.

  एकवेळेस त्याची थट्टा उडवणारे मित्र, नातेवाईक आता त्याचा सन्मान करू लागले होते. जेंव्हा त्य सर्वांनी विरोध केला तेंव्हा प्रतापने ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेबांचा फोटो पोकेट मध्ये ठेवला त्यामुळे त्याला कधीही नैरास्य आले नाही. त्यांचा पुढील आंतरराष्ट्रीय पुरस्कार जर्मनीतील हॅनोव्हर येथे आयोजित अल्बर्ट आइन्स्टाईन इनोव्हेशन गोल्ड मेडल आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्सपो 2018 मध्ये होता. त्यांनी इंटर्नशिपसाठी दोन वर्षांच्या कालावधीत ८७ देशांना भेटी दिल्या आहेत आणि संवेदनशील परिस्थितीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर व्याख्याने दिली आहेत.

ड्रोन सायन्टिस्ट
ड्रोन सायन्टिस्ट

 ५) ध्यास देशसेवेचा 

गेल्या वर्षी दक्षिण कर्नाटकात आलेल्या भीषण पुरामध्ये अडकलेल्या अनेक लोकांना प्रतापच्या ड्रोनने मदत केली.त्यांच्या ड्रोनने अतिशय दुर्गम भागात जाऊन तिथली परीस्तिथी दाखवून पोलीस आणि बचाव दलास खूप मदत केली. त्याने अनेक तज्ञाला भेटून संपूर्ण जगाचा  प्रवास केला असला तरी त्याचे स्वप्न हे देशसेवेचेच आहे.

आतापर्यंत मिळालेल्या सर्व बक्षिसांची रक्कम प्रतापाने बंगळूरू येथे एरोस्पेस लॅब विकाशित करण्यासाठी खर्च केली आहे. याच ठिकाणी सध्या प्रताप ड्रोन वर नव नवीन संशोधन करत आहेत. प्रताप यांना जेंव्हा सोशल मिडीयावरील त्या व्हायरल संदेशाबद्दल विचारले तेंव्हा त्यांनी तो संदेश अर्धसत्य असल्याचे सांगितले. त्यातील विदेशी कंपणीची जॉब ऑफर नाकारली हे सत्य आहे परंतु पंतप्रधान मोडी यांनी डी.आर.डी.वो. मध्ये नियुक्ती केल्याची खबर हि चुकीची अफवा आहे असे सांगितले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

अधिक वाचा:  शेती करून लाखो कमवनारा तरुण शेतकरी…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here