आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

खरचं अश्वत्थामा 5000 वर्षापासून जिवंत आहे का?


श्रावणामध्ये देवाधी देव महादेव शंकराच्या पूजेचे अनन्य साधारण महत्व आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंग या महिन्यात भक्त जणांनी अक्षराशः गजबजून जातात. या महिन्यात दर सोमवारी शंभू महादेवास बेलपत्र अर्पण केल्यास विशेष कृपाशीर्वाद मिळतात असा समज आहे.

या १२ ज्योतिर्लिंगाप्रमाणेच आपल्या देशात अनेक चमत्कारिक आणी अलौकिक मंदिर आहेत. यामध्ये एक मंदिर असेही आहे ज्याचा थेट संबंध महाभारताशी आहे. हे मंदिर म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील असिरगडावरील असिरेश्वर (गुप्तेश्वर) महादेव मंदिर.

 

महाभारत

 

या मंदिरात अनेक अवशेष मिळाले आहेत ज्यांचा संबंध महाभारताशी आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट म्हणजे, येथे गेले ५००० वर्षापासून दररोज न चुकता महाभारतातील एक महान योद्धा द्रोणाचार्य यांचा पुत्र ‘अश्वत्थामा ‘ हा पूजा करण्यासाठी आणी आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो.

 

आजच्या विज्ञानाच्या युगात काही जनांना हि गोष्ट हास्यास्पद वाटत असेल परंतु येथे गेल्यावरच आपल्याला हि गोष्ट कळते कि, विज्ञानाच्या पलीकडेही काही गोष्ठी आहेत. चला तर जाणून घेऊया अस्वस्थामा आणी गुप्तेश्वर महादेव यांच्याबद्दल या श्रावण विशेष लेखामधून ……..!

असीरगड (बुऱ्हानपूर )

 

असिरगड हे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एक गाव आहे. असीरगडचा ऐतिहासिक किल्ला खूप प्रसिद्ध आहे. असिरगड किल्ला बुरहानपूरच्या उत्तरेस सुमारे २० किलोमीटर , सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे. आजही हा किल्ला आपल्या गौरवमय भूतकाळाचा गौरव मोकळेपणाने गात आहे.

महाभारत काळात भ्रन्तपूर म्हणून प्रसिध्द असलेली नगरी आज बुऱ्हानपूर म्हणून ओळखल्या जाते. रामायण आणी महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला येथे मिळाले आहेत. याच किल्ल्यामध्ये आहे असिरेश्वर महादेव मंदिर. असेही म्हटले जाते कि, येथे दररोज द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा ब्रह्म मुहूर्तात पूजा पाठ करण्यास येतो असा सर्वांचा समज आहे.

अश्वस्थामा आणी त्यांना मिळालेला श्राप 

महाभारतामध्ये अनेक शूर-वीर योद्धा होते त्यामध्ये अश्वत्थामा  हे पण होते. द्रोणाचार्य यांचे पुत्र असल्यामुळे सर्व युध्द कलेत ते निपुण होते. त्याचबरोबर ते महादेवाचे भक्त होते. महाभारताचे अंतिम युद्ध सुरु झाले तेंव्हा द्रोणाचार्य आणि  अश्वत्थामा  हे दोघेही कौरवांच्या बाजूने झाले. एकट्या अश्वत्थामा  यांनी संपूर्ण पांडव सेनेला सळो कि पळो करून ठेवले होते. तेंव्हा पांडवांना या परिस्थिती मधून बाहेर काढण्यास श्रीकृष्ण पुढे सरसावले.

पांडवांचे मनोबल एकट्या अश्वत्थामाने  खच्ची केले तेंव्हा कृष्णांनी धर्मराज युधिष्ठीर यास कुटनीती करण्यास सांगितले. या योजनेने कृष्णांनी रणांगणात अश्वत्थामा  मारल्या गेल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्यांनी जेंव्हा युधिष्ठीराला हि गोष्ट विचारली तेंव्हा युधिष्ठीर म्हणाला होय अश्वत्थामा मारल्या गेला परंतु तो मानव होता कि हत्ती (महाभारतात अश्वत्थामा नावाचा एक हत्ती पण होता) हे मला माहित नाही.

हे एकताच द्रोणाचार्यांना धक्काच बसला, पुत्रवियोगाने भावूक झालेल्या द्रोणाचार्यांना काय करावे हेच सुचत नव्हते. याचाच फायदा घेत पांचाल पुत्र धृष्टद्युम्न याने आचार्य द्रोण यांचा वध केला. आपल्या पित्याच्या वधाची वार्ता कानी पडताच अश्वत्थामा अतिशय विचलित झाला. आपल्या पित्याचा सूड घेण्यासाठी त्याने सर्व पांडव पुत्राचा वध करण्यास सुरुवात केली. हेच नाही तर अश्वत्थामाने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी, अभिमन्यू याची पत्नी उत्तराच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले.

कृष्णांनी या अस्त्रापासून उत्तरा आणी तिच्या गर्भातील मुलास वाचवले. अश्वस्थामाला त्यांनी जीव न घेता जखमी करून सोडले, त्याच सोबत त्याला अनेक युगे भटकत राहण्याचा श्राप दिला.

 

आजपर्यंत जिवंत आहे अश्वत्थामा?

महाभारत
महाभारत

आजपण असीरगड येथील मंदिरामध्ये सकाळीच पूजा केली जाते. परंतु कोणालाही पूजा कोनी केली हे दिसत नाही. येथील स्थानिक लोकांच्या मते, श्री कृष्णांनी दिलेल्या श्रापामुळे अश्वत्थामा आजपण येथे भटकत असतात. तेच रोज सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजे जंगली फुल वाहतात आणी निघून जातात.

काही लोक सांगतात त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून अनेक कथा एकल्या आहेत त्यामध्ये, अश्वत्थामा गंभीर जखमी अवस्थेत लोकांना हळद आणी तेल मागत. काही जन जेंव्हा जवळील नदीत मासे पकडत असतांना त्यांना कोणीतरी मागून धक्का दिला आणी मागे वळून बघितल्यास कोणीच नव्हते. त्यांच्या मते जो कोणी अश्वत्थामाला बघतो त्याचे मानसिक संतुलन बिघडून जाते. त्यामुळे कोणीही सूर्यास्तानंतर आणी सूर्योदयापूर्वी त्या किल्यावर जात नाही.

काही दिवसांपूर्वी या किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्या वतीने खोदकाम करण्यात आले. येथे एक पुरातन जेल आणी एक प्रशस्थ राणी महाल पण होता असे समजले आहे. यामुळेच हा किल्ला जास्त चर्चेत आला आहे. पुरातत्व विभागाच्या मते या जेलमध्ये १८५७ ला ३ भारतीय क्रांतीकारकांना फाशी पण देण्यात आली होती. याविषयीचे सर्व कागदपत्रे पुरातत्व विभागास भोपाल येथील राष्ट्रीय अभिलेखागार येथे मिळाले आहेत. या किल्ल्याचे स्वतःचे नैसर्गिक, सामाजिक, पौराणिक, आणी पर्यटन क्षेत्रात महत्व आहे.

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here