आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
देशात गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या पेट्रोलच्या किमतीमुळे लागभाग सगळेच परेशान झाले आहेत.
पेट्रोलच्या किमती रोज दिवसेंदिवस वाढत जात आहेत. अश्यात सामन्यांसाठी पेट्रोलच्या वाढत्या किमती डोकेदुखी ठरत आहेत.
अश्यातच हेद्राबादमधील एका मेकैनिकल इंजीनियरने जुन्या प्लास्टिक बाटल्यांपासून पेट्रोलची निर्मिती केली आहे. आणि महत्वाच म्हणजे या पेट्रोलची किंमत फक्त ४० रु प्रती लिटर एवढी आहे.

हैद्राबाद येथील इंजिनिअर सतीश कुमार यांची हाइड्रोक्सी प्राइवेट लिमिटेड नावाने एक कंपनी आहे. जी अतिलहान, लहान, मध्यम उद्यम मंत्रालयाकडून रजिस्टर आहे.”प्लास्टिक पायरोलीसिस” प्रकीयेद्वारे प्लास्टिक पासून डीजेल एविएशन ,पेट्रोल बनवल जाऊ शकते. या प्रकीयेची खास गोष्ट हि आहे कि यात पाण्याची अजिबात गरज पडत नाही. आणि कुठलेही अवशेष या प्रकीयेदरम्याण शिल्लक राहत नाहीत.
इंजिनिअर सतीश कुमार यांनी या प्रक्रियेला “प्लास्टिक पायरोलिसिस” अस नाव दिले आहे.
वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे सतीश कुमार यांच्या या पेट्रोल बनवण्याच्या आयडीयाला एक मोठ महत्व प्राप्त झाले आहे.
नेमके कसे तयार होते पेट्रोल?
जुन्या प्लास्टिकवर पुन्हा प्रक्रिया करून डिजल , पेट्रोल बनवल जाते. लगभग ४०० लिटर इंधन निर्मितीसाठी त्यांना ५०० किली प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करावी लागते. महत्वाचे म्हणजे ह्या सर्व प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची प्रदूषण हानी होत नाही. इंजिनिअर सतीश कुमार यांनी तयार केलेल्या सिस्टीममध्ये पॉलीविनाइल आणि पॉलीइथीलीन टेरीफ्थेलैट सोडून बाकी सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जाऊ शकतो.
अस असल तरी अद्याप वाहनांमध्ये या इंधनाचा उपयोग करणे बाकी आहे.
इंजिनिअर सतीश कुमार सांगतात कि, ते सध्या दररोज २०० किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून ते इंधन निर्मिती करतात. आणि ते इंधन स्थानिक व्यापाऱ्यांना ४० ते ५० रु प्रती लिटर
दराने विकतात.
कोण आहेत सतीश कुमार?
४५ वर्षीय सतीश कुमार हे हैद्राबाद येथील असून ते मेकानिकल इंजिनिअर आहेत. इंजिनिअर असल्यामुळे त्यांना विविध विषयात गोडी निर्माण झाली होती. प्लास्टिकचा वाढता साठा पाहता त्यांना प्लास्टिक पासून काहीतरी बनवण्याची इच्छा होती.त्यातच आपल्या कंपनीत केलेल्या रिसर्च आणि मेहनतीवर त्यांनी हा शोध लावला आणि आज ते दिवसाकाठी २०० किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून इंधननिर्मित करत आहेत.
सतीश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल ५० टन प्लास्टिकला पेट्रोल मध्ये बदलले आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
अधिक वाचा: किचनमधील हे मसाले आहेत आरोग्यास लाभदायी