आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतात कोरोन व्हायरस चा मोठ्या प्रमाणात  प्रसार होत आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी तुम्ही निरोगी व तंदुरुस्त राहणे जरुरी आहे. व्हायरस पासून वाचण्यासाठी आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवणे व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे झाले आहे.

 

आज या लेखात आम्ही तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टीची माहिती देणार आहोत ज्यांच्या  नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल. कोरोना व्हायरस महामारीतून वाचण्यासाठी आपल्या आजूबाजूला साफसफाईसोबतच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच लोक
योगा आणि आयुर्वेदिक काढा पिण्यास जास्त प्रमाणत सुरवात करत आहेत.

new google

 

रोगप्रतिकारक शक्ती

 

 

 

काढा पिणे आणि योग करणे याशिवाय अनेक अश्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी आहेत. ज्यांच्या नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल.

१. ग्रीन टी :

ग्रीन टी हि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मोठ्या प्रमाणत मदत करते. पारंपारिक चहा पेक्षा ग्रीन टी पिण्याचा मुख्य फायदा हा आहे कि,ग्रीन टीच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो. तसच ह्र्दय आणि मानसिक स्वास्थ्य मध्ये सुधार आण्यास सुद्धा ग्रीन टी मदत करते.

 

एका अभ्यासानुसार ग्रीन टी वजन कमी करणे, यकृत रोग, मधुमेह, यांसारख्यारोगांवर व इतर समस्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम देते. परंतु एका दिवसात याचे १ किंवा  २ कपच पिणे जरुरी आहे. ग्रीन टीचे  अति सेवन तुमची भूक कमी करू शकते. ग्रीन टी चे रोज एक एक कप सेवन केल्यामुळे तुमचे केश गळणे थांबण्यास मदत होते.

 

२. कच्चा लसून :

रोगप्रतिकारक शक्ती
SOURCE- ISTOCKPHOTO

जर तुम्ही हाडाच्या दुखण्याने परेशान असाल तर तुम्हाला तुमच्या जेवणात लसुनचा वापर करणे गरजेचे आहे. कच्चा लसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतो. लसुनमध्ये मोठ्या प्रमाणात एलीसिन , जिंक, सल्फर, सेनेलीयम,आणि विटामिन ए,विटामिन ई असते. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे.

 

३. विटामिन सी:

मोठ्या प्रमाणत पसरणाऱ्या रोगांपासून सुरक्षित राहण्यास्ठी विटामिन सी सगळ्यात चांगला उपाय मानला जातो. विटामिन सी लिंबू आणि आवळ्यात मोठ्या प्रमाणत असते, जे रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय संत्रा, मोसंबी ,हिरवी कोथिंबीर, पालक यात सुद्धा विटामिन सी मोठ्या प्रमाणत असते. त्यामळे कोरोना संक्रमनापासून वाचण्यासाठी या पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश वाढवा.

 

४. अंजीर:

अंजीर पोट्याशियम आणि एंटी-ऑक्सीडेंट तत्वाने भरपूर असतो. हा शरीराच्या पीएच च्या स्तराला सुद्धा नियंत्रित करण्यास मदत करतो. अंजीरातील फायबर रक्तातील शुगर नियंत्रित करण्यास मदत करतात.

 

५. मशरूम:

रोगप्रतिकारक शक्ती

 

मशरूमचा वापर बऱ्याच  ठिकाणी केला जातो. मशरूम चा वापर फक्त रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाही तर पांढऱ्या रक्तपेशांचे कार्य वाढवून शरीरातील प्रतिकारक प्रकियेला चालना देण्यास होतो. मशरूमचा महत्वाचा वापर कर्करोगापासून वाचण्यासाठी सुद्धा होतो.

६. गांजर:

गांजराचा वापर शरीरात रक्त वाढवण्यासोबतच शरीरातील किटानुंशी लढण्यास सुद्धा होतो. गांजरात विटामिन ई , कैरोटिनाइड आणि एंटी ऑक्सीडेंट चा मोठ्या प्रमाणत साठा असतो. गांजराच्या नियमित सेवनाने कैंसर होण्याचा धोका कमी होतो. मोतीबिंदू अथवा इतर डोळ्याच्या आज्रांपासून वाचण्यासाठी नियमित जेवणात गाजर खाल्ले पाहिजेत.

 

७. टमाटर:

टमाटर लगभग सर्वांच्याच जेवणात मोठ्या प्रमाणत असते .टमाटर एलडीएल (बैड कोलेस्ट्रॉल) ची शरीरातील मात्रा कमी करण्यास मदत करते. यात लाईकोपेन असतो, जे शरीरातील रेडीकल्सला न्यूट्रलाइज करतो ज्यामुळे फ्री रेडीकल्स आपल्या शरीराला नुकसान पोहचवू शकत नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

अधिक वाचा:  किचनमधील  हे मसाले आहेत आरोग्यास लाभदायी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here