आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

अनाथांची सेवा करण्यासाठी यांनी चक्क आजीवन निसंतान राहण्याची प्रतिज्ञा घेतलीय..!

 

डॉ. ब्रिज मोहन भारद्वाज हे एक भारतीय समाजसुधारक आहेत  त्यांनी त्यांच्या पत्नी डॉ. माधुरी भारद्वाज यांच्यासोबत मां माधुरी ब्रिज वारीस सेवा सदन ( अपना घर ) हि गोरगरीबांसाठी संस्था स्थापन केली आहे. आज त्यांच्या अपना घर या आश्रमाच्या सानिध्यात भारतातील २१ शहरांमध्ये ४००० पेक्षा जास्त अनाथ लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील शिरोही या गावात झाला.

 

new google

 

आपल्या शालेय जीवनात त्यांच्या मनात नेहमी गरिबी , परेशानी , दुखः ,राहण्या साठी घर नसलेल्या लोकांचा विचार येत असे. पुढे चालून त्यांनी बी.ई.एम.एस. ची पदवी मिळवली. डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज हे लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाचे प्रबळ भक्त आहेत.

 

 माधुरी भारद्वाज

 

भारद्वाज
भारद्वाज

 

महाविद्यालयीन जीवनात डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज यांची भेट माधुरी भारद्वाज यांच्यासोबत झाली. त्यावेळी त्या अलीगड येथील एका शाळेत नववीच्या वर्गात होत्या. दोघेही शाळेत जाण्यासाठी बसचा वापर करत. बसमध्ये प्रवास करताना दोघेही
त्यांच्या वयात सामान्य असणाऱ्या विषयावर चर्चा करत.

 

 

आपल्या जीवनाचे ध्येय, समाज सेवा , गरीब आणि मजबूर लोकांना मदत करणे याविषयी बोलत असताना, माधुरी यांना कळून चुकले कि त्यांचे आणि ब्रिज मोहन यांचे विचार मिळते जुळते आहेत.

 

 

त्यांनी एकाच विचार सारणीच्या डॉ.भारद्वाज सोबत लग्न करण्याचा विचार केला. आठ वर्षांपर्यंत असेच घटत मित्र राहिल्यानंतर त्यांनी ८ डिसेंबर १९९३ ला विवाह केला. त्यांची महानता यातूनच दिसून तेते कि, त्यांनी गरीब व निराधार लोकांची निस्वार्थ सेवा करण्यासाठी आजीवन निसंतान राहण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. डॉक्टर बनल्या नंतर त्यांनी बिमार, निसाहाय लोकांना आपल्या घरी आणून त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.

 

डॉ भारद्वाज यांना एका साधूने प्रेरित होते.

 

हि गोष्ट डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज यांच्या बालपणीची आहे ज्यावेळी त्यांचे वय केवळ ५ वर्ष होते. त्यांच्या गावात एक चिरंजीवी बाबा नावाचा एक वृध्द साधू राहत होता. दुर्दैवाने एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला , याचा डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज यांच्या बालमनावर खोल परिणाम झाला,त्यांना खूप दुखः झाले कारण;

 

 

चिरंजीवी बाबा हे ८५ वर्षांचे निराश्रित गरीब होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन गावातल्या लोकांचे जनावरे सांभाळण्यात घालवले. त्यांचे स्वताचे कोणीही नातेवाईक नव्हते शिवाय त्यांनी लग्नही केले नव्हते. त्यामुळे ते बाबा गावात इकटेच राहत. ज्यावेळी चिरंजीवी बाबाचे आरोग्य बिघडून ते आजारी पडले तेंव्हा त्यांची मदत करण्यास कोणीही समोर आले नाही शेवटी त्यांची मृत्यू झाली. हि घटना घटना आठवून डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज म्हणतात.

 

 

“असे नव्हते कि त्या साधूची कोणीही मदत करू इच्छित नव्हते,परंतु त्यांची जिम्मेदारी घेण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते.परंतु ते प्रकरण आपल्या गळ्याशी येऊ नये म्हणून सर्वजन भीत होते. जेंव्हा कोणी स्वतः पुढे सरसावून मदत करून दाखवेल तेंव्हाच लोकं दुसर्यांना मदत करतील”

 

भारद्वाज

 

त्यावेळी डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज हे त्या बाबांना मदत करण्यात असमर्थ होते कारण ते एक लहान बालक होते. परंतु या घटनेने त्यांच्या मनावर मनावर एक छाप सोडली. यामुळेच ते आजारी लोकांना मदत करण्यास व त्यांचे जीवन वाचवण्यासाठी प्रेरित झाले.

 

 डॉ भारद्वाज यांचे अपना घर आश्रम म्हणजे  कलयुगातील नंदनवन

 

रस्ते, रेल्वे स्थानक, बसस्थानक, धार्मिक स्थळे, सरकारी दवाखाने याठिकाणी अनेक निसहाय लोक पडून राहतात. ज्यांच्या अंगावर कधी कधी कपडेही नसतात. यांच्याजवळ अशा दुःखाच्या वेळी दुखण्यासाठी औषध, पोतःठी अन्न, शरीरासाठी कपडे तर दूरच राहिले पिण्यासाठी पाणीपण नसते.

 

 

अशा नीसहाय, पिडीत लोकांसाठी डॉ. भारद्वाज यांच्या लग्नाच्या सात वर्षानंतर , माधुरी यांच्या २७ व्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर डॉ.ब्रिज मोहन भारद्वाज यांनी मां माधुरी ब्रिज वारीस सेवा सदन अपना घर ची स्थापना राजस्थानच्या भरतपूर येथे केली. तिथे अशा आश्रयहीन लोकांना “प्रभुजी” म्हणून संबोधले जाते.

 

 

अपना घर हे अनाथ, निसःहाय, आजारी, गरीब भुकेल्यांसाठी एक हक्काचा निवारा बनले. मानवासाठी जरुरी असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही मुलभूत गरजा येथे निस्वार्थ भावाने पुरवल्या जातात. संपूर्ण भारतामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, या ठिकाणी या संस्थेचे २१ आश्रम कार्यरत आहेत. अपना घर सेवा समितीच्या स्वयंसेवकांनी एक अपना घर हेल्पलाइन स्थापित केली आहे. जेणेकरून गरजूंना तत्काळ सेवा भेटू शकेल.

 

 

शहरांमध्ये कुठेही एखादा गरजू व्यक्ती सापडला तर त्यांना तत्काळ अश्रामामध्ये नेण्यासाठी ३० पेक्षा अधिक रुग्णवाहिका दिवस रात्र तत्पर असतात. या आश्रमामध्ये प्रतेकांना राहण्यासाठी अलग अलग विभाग केलेले त्यामध्ये अनेक वयोगटातील महिला आणि पुरुष राहतात. आश्रमात आधुनिक तंत्रज्ञाने भोजन बनवले जाते.

 

दैनंदिन जीवनासाठी आवशक अशा सर्व सुविधा येथेच आहेत. हिंदू, मुस्लीम,सिख,इसाई यांचे प्रार्थनास्थळ सुद्धा या आश्रमाच्या आवारातच आहे. इथे एकचः वेळी आरती,नमाज,गुरबानी, गीरीजाघरातील घंटानाद ऐकावयास येतो.

 

 

येथे जेंव्हा कुणालाही बाहेरून आणले जाते तेंव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीचे केस कापले जातात, नखे साफ केली जातात, स्नान वैगेरे करवून त्यांना आवशक टी आरोग्य सुविधा दिली जाते. आवशकता पडल्यास बाहेरून डॉक्टरांना बोलावले जाते. पूर्णतः बरे झाल्यास जर कोणाची घरी जाण्याची इच्छा असेल तर त्यांना घरी पण सोडले जाते. आणि दुर्दैवाने जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर डॉ भारद्वाज हे त्या व्यक्तीस आपले अपत्य समजून त्यच्या धर्माप्रमाणे अंतिम संस्कार पण करतात.

 

आवश्यक त्या सामानासाठी चक्क देवाला चिठ्ठी लिहिली जाते

 

या आश्रमास सरकार कडून कोणतीही मदत केली जात नाही. तसे तर अधिकांश आश्रम हे सामाजिक मदतीवरचालतात. तसेच अनेक दान वीर या आश्रमास दान करतात काही दिवसांपूर्वी उद्योगपती अजीम प्रेमजी यांनी पण या आश्रमास खूप मोठी सहाय्यता केली होती.

 

 

तसे पहिले तर लोकांकडे काही मागणे हे या आश्रमाचे कामच नाही कारण डॉ भारद्वाज यांचा असा समाज आहे कि गरजेचे आर्व समान हे देव कोणाच्या न कोणाच्या रूपाने येऊन पूर्ण करतो. त्यामुळे ज्या सुविधाची गरज आहे त्यांची यादी करून देवाच्या फोटो पुडे लिहिली जाते आणि टी पूर्ण पण होते. देवाला लिहिलेल्या या चिठी मुळे कोणीही उपाशी पोटी झोपत नाही.

 

 

अनेक सामाजिक मंचावर घेतली दखल

 

या डॉक्टर दाम्पत्याच्या महान कार्याची दाखल सरकारने आणि अनेक लोकांनी घेतली आहे. कित्तेक मिडिया वाल्यांनी यांच्यावर आधारित कार्यक्रम केले आहेत. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात डॉ भारद्वाज आणि त्यांची पत्नी कर्मवीर या विशेष भागात दिसले होते.

 

महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा-  टाटा कंपनीत काम करणारी पहिला महिला इंजिनिअर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here