आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्र पोलीस दलाची शान आहेत हे दबंग पोलीस अधिकारी.!


१ ) दया नायक ( १९९५ बॅच )

 

पोलीस

 

जेव्हा पण एनकाउंटर या नावाचा उल्लेख होतो त्यावेळी दया नायक यांचे नाव हमखास घेतले जाते. दया नायक हे मुंबई पोलीस दलातील सर्वात प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशालीस्ट आहेत. याचा अनुमान आपण याच गोशीवरून लावू शकता कि; अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला अब तक छप्पन (aab tak chappan) हा हिंदी चित्रपट दया नायक यांच्याच जीवनावर आधारित आहे.

 

त्याच बरोबर तेलुगु, तमिळ, अशा अनेक भाषांमध्ये त्यांच्यावर आधारित चित्रपट काढल्या गेले आहेत. १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झालेल्या दया नायक यांनी अवघ्या तीन चार वर्षातच एनकाउंटर स्पेशालीस्ट हे नाव मिळवले.आजपर्यंत त्यांनी ८० पेक्षा अधिक गुन्हेगारांचे एनकाउंटर केले आहेत. नायक यांना २०१५ मध्ये बराच काळ आजारी रजेवर राहून गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी नायक नागपूर विभागात कार्यरत होते.

 

या पहिले पण नायक यांना २००६ मध्ये निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (एमसीओसीए) कोर्टाने भ्रष्टाचार निरोधक ब्युरोला (एसीबी) त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी २००२ मध्ये यांच्यावर कर्नाटकातील येन्नोहोले गावात राधाबाई नायक या शाळेच्या उद्घाटनाच्या वेळी बेकायदेशीर मालमत्ते विरोधात आरोप करण्यात आले होते. विभागीय चौकशीत मात्र नायक यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

 

पोलीस

 

तसेच जानेवारी २००३ मध्ये नायक यांच्याविरोधात अनावश्यक मालमत्तेचा खटला दाखल करण्यात आला. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याबद्दल त्यांची चौकशी (एमसीओसीए) न्यायालयाने केली होती पण २००४ मध्ये अनेक चौकशीनंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. २००६ मध्ये, सत्र न्यायालयानं त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा असंख्य संपत्ती जमवल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट काढल्यानंतर नायक यांना भ्रष्टाचारविरोधी दलाने अटक केली होती.

 

 

अटक आणि चौकशीनंतर नायक यांच्याकडे असलेल्या मालमत्तांची यादी उघडकीस आली. यात मुंबईच्या मालाडमधील युग धर्म अपार्टमेंटमधील पेंटहाऊसचा समावेश होता. यावेळी पण त्यांना निलंबित करण्यात आले होते. २००६ मध्ये एसीबीच्या चौकशीमुळे कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नायक यांना अटक करण्यात आली. परंतु, ऑक्टोबर २००९ मध्ये तत्कालीन डीजीपी एसएस विर्क यांनी अपुर्‍या कारणास्तव नायक यांच्यावर खटला चालविण्यास नकार दिला.

 

२०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि २०१२ मध्ये नायक यांना अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात पुन्हा नियुक्त केले गेले. जवळपास साडेतीन वर्षे पोलीस दलातून बाहेर राहील्यानंतर नायक यांना पुन्हा कामावर घेतले आणि पोलिस विभागात ‘हाय प्रोफाइल’झोन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई शहराच्या पश्चिम भागात (वांद्रे ते अंधेरी) येथे त्यांची बदली केली. तेव्हापासून नायक यांनी कोणतेही वादग्रस्त कार्य केले नाही.

 

२ ) प्रदीप शर्मा ( १९८३ बॅच )

 

पोलीस

 

प्रदीप शर्मा हे यांनी आजपर्यंत ११३ एनकाउंटर केले आहेत. एनकाउंटरसह प्रदीप शर्मा यांचे नाव अन्यकाही बेकायदेशीर प्रकरणामध्ये आले आहे. २००३ मध्ये बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनुस याच्या कस्टडीयल मृत्यूचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच प्रदीप शर्मा यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या सगळीकडे चर्चा होत्या.

 

शर्मा यांच्यावर मालाडमधील जमीन हडपण्यासोबतच नोव्हेंबर २००६ मध्येअपराधी राम नारायण गुप्ता उर्फ ​​लखन भैय्या या छोटा राजनच्या संशयित साथीदाराला बनावट चकमकीत (fake encounter) ठार मारण्याचा पण आरोप होता. जानेवारी २०१० मध्ये, लखन भैय्या यांच्या चकमकीत भाग घेतल्याबद्दल शर्माला २१ जणांसह अटक करण्यात आली.

 

जुलै २०१३ मध्ये मुंबईच्या कोर्टाने शर्माला या प्रकरणातील सर्व आरोपातून निर्दोष सोडले. राम गोपाल वर्मा यांनी बनवलेल्या (dipartment) या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने प्रदीप शर्माची भूमिका साकारली आहे.

 

३ ) विजय साळसकर ( १९८३ बॅच )

 

पोलीस

 

२६/११ च्या आतंकवादी हल्यामध्ये शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलाच्या इंस्पेक्टर विजय साळसकर यांना आज त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देश ओळखतो. २००८ मध्ये शहीद झले तेंव्हा साळसकर हे ५० वर्षांचे होते. २००९ मध्ये त्यांना अशोक चक्र देवून सन्मानित केल्या गेले.

 

त्यावेळी साळसकर हर मुंबई पोलीस विभागाच्या खंडणी विरोधी दलाचे (anti-extortion cell) प्रमुख होते. २००४ मध्ये झालेल्या एका एनकाउंटरमध्ये जेव्हा सालासकर यांनी गँगस्टर अरुण गवळीच्या दोन साथीदारांना ठार मारले, तेव्हा हि चकमक खोटी (fake encounter) असल्याचा आरोप समोर आला होता.

 

विजय साळसकर यांचा जन्म मराठा कुळात झाला होता. त्यांचे शिक्षण वाणिज्य ह्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून झाले आहे. सब इन्स्पेक्टर ह्या पदवी खाली ते मुंबई पोलिस मध्ये १९८३ साली रुजू झाले.

 

साळसकर ह्यांनी त्यांचा पहिला एनकाउनटर राजा शहाबुद्दीन याचा रुजू झाल्यावर पहिल्याच वर्षी केला होता. त्यांच्या २४ वर्षांच्या कामगिरीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना शौर्याने पकडले. सालास्कारांच्या गोळ्यांचे शिकार बनलेल्या काहींपैकी अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी,कुंदन सिंघ रावत, झहूर माखंदा यांसारखे गुंड शामिल होते.

 

४ ) सचिन वाजे ( १९९० बॅच )

 

मुंबई पोलीस दलातील क्राइम इंटेलिजेंस यूनिट (सीआईयू) चे पूर्व इंस्पेक्टर प्रदीप शर्मा, रिटायर्ड एसीपी प्रफुल्ल भोसले, पुलिस इंस्पेक्टर दयानंद नायक इत्यादी नावाजलेल्या अधिकाऱ्यांसोबत एनकाउंटर स्क्वॉड मध्ये सचिन वाजे यांनी काम केले आहे.

 

२००२ मध्ये बस बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या ख्वाजा युनूस याला अटक केली. युनूसचा 2003 साली पोलिस कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वाजे यांना अटक केली. अटकेनंतर वाजे यांना निलंबित करण्यात आले. यानंतर,२००८ मध्ये वाजे यांनी पोलिस सेवेतून राजीनामा दिला होता. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सचिन वाजे गुरु मानत. वाजे हे तांत्रिक ज्ञानासाठी देखील ओळखले जातात.

 

डेव्हिड कोलमन हेडलीवर आधारित स्काऊट आणि शीना बोरा खून प्रकरणावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे. अशीही माहिती पुढे येत आहे कि वाजे यांचा राजीनामा १२ वर्षे झाली नामंजूर होता आणि त्यांना आता परत कामावर घेऊन त्यांची नायगाव स्थानिक शस्त्रास्त्र विभागात नेमणूक करण्यात आली आहे.

 

५ ) रवींद्रनाथ आंग्रे (१९८३ बॅच )

 

पोलीस

 

 

२००८ मध्ये ठाणे येथील बिल्डर गणेश वाघ यांनी रवींद्रनाथ यांच्याविरोधात धमकी, खंडणी आणि दरोडा टाकल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर रवींद्रनाथ आंग्रे यांना अटक करून निलंबित करण्यात आले. त्यांनी काही महिने तुरूंगात काढले. मे 2009 मध्ये त्यांची सुटका झाली.

 

२०१० मध्ये वाघचा भाऊ महेश याच्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली आंग्रे यांना पुन्हा अटक करण्यात आली. ४९ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला. २०११ मध्ये सत्र न्यायालयाने योग्य पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे आंग्रे यांची निर्दोष मुक्तता केली. आंग्रे हे १९८३ मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यांच्या बॅचमेटमध्ये विजय साळसकर, प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले आणि विनायक सौदे असे अधिकारी समाविष्ट आहेत.

 

आंग्रे यांनी मुंबईत ३३ कुख्यात गुंड आणि ठाणे जिल्ह्यात २१ कुख्यात गुन्हेगारांना ठार मारले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या नोंदींमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा त्यांनी जप्त केला होता. हा शस्त्र साठा १९९८ मध्ये जप्त केला होता. त्यामध्ये ११ एके ५६ रायफल्स, २०० हून अधिक दारूगोळा आणि जवळपास २०० ग्रेनेडचा समावेश होता.

 

नंतर त्यांना पुन्हा पोलीस दलात घेऊन गडचिरोली येथे बदली करण्यात आली. परंतु आंग्रे यांनी त्यांची बदली स्वीकारण्यास नकार दिला, त्यानंतरच जून २०१४ मध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर रवींद्रनाथ यांनी एका राजनीतिक दलामध्ये प्रवेश घेतला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा-   ३०० चीनी  सैनिकावर भारी पडला होता हा भारतीय सैनिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here