आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतातील सर्वात जास्त “वादग्रस्त” ठरलेले एनकाउंटर..


 

१ ) हैद्राबाद सामुहिक बलात्कारप्रकरणातील आरोपी. २०१९ 

new google
एनकाउंटर
एनकाउंटर

डिसेंबर २०१९ मध्ये तेलंगाना पोलिसांनी हैद्राबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार आणि जाळून मारल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींना एनकाउंटरमध्ये गोळ्या घालून ठार केले. एनकाउंटरबद्दल पोलिसांनी दिलेल्या
माहिती नुसार त्या आरोपींना बलात्काराच्या दिवशीचा घटनाक्रम परत समजण्यासाठी घटना स्थळावर चतानपल्ली गावाजवळ हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावरील अंडरपासवर घेऊन गेले होते.

परंतु या चार आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. याचे प्रतीउत्तर  म्हणून पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर गोळ्या झडल्या आणि त्यामध्येच त्यांचा खात्मा झाला.

डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणी हत्तेमुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांनी “त्वरित न्याय” मिळवून दिल्याबद्दल “एनकाउंटर” ची प्रशंसा केली. पण या घटनेने आयपीएस अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. एकीकडे बरेच अधिकारी असे म्हणत आहेत की तेलंगणा पोलिसांनी जे केले ते एक अतिशय वाईट उदाहरण आहे, परंतु दुसरीकडे असे बरेच अधिकारी आहेत ज्यांना हे कृत्य योग्य वाटत आहे.असे एका महिला अधिकाऱ्याने सांगितले होते.

काही पोलीस अधिकार्याच्या मते जनता आणि सोशल मिडीयावर त्वरीत न्याय करण्यासाठी बनवण्यात येणारा दबाव हा पोलिसांच्या या कृत्यास तेवढाच जिम्मेदार आहे.

२ ) भोपाळ जेल एनकाउंटर , २०१६

एनकाउंटर
एनकाउंटर

ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (SIMI)शी संबंधित आठ जण भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून फरार झाले आणि त्यानंतर त्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एनकाउंटरमध्ये गोळ्या घालून ठार केले.
पोलिसांच्या चौकशी अहवानुसार मृतांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्याऐवजी त्यांनी पोलिस व स्थानिक लोकांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि त्यानंतरही त्यांनी आत्मसमर्पण
करण्याचा कोणताही हेतू दर्शविला नाही, त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

काही स्थानिक लोकांनी त्यांच्या फोनमध्ये या एनकाउंटर चे व्हिडीओ बनवले होते. बर्‍याच व्हिडिओंमध्ये असे दिसून आले की हा एनकाउंटर पूर्वनियोजित होता. तसेच याबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरीच राहिले आहेत जशे कि; जेलमधून पळून
गेलेल्यांना शस्त्रे आणि बंदुक कसे मिळाले, ते तुरूंगातून कसे बाहेर पडले आणि ते सुटल्यावर त्यांना कपडे आणि अन्न कोणी दिले. जून २०१८ मध्ये, मध्य प्रदेश हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एस.के. पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एका न्यायिक समितीने पोलिसांना क्लीन चीट दिली

३ ) बाटला हाउस , २००८

एनकाउंटर
एनकाउंटर

२००८ मध्ये दिल्लीत बाटला हाऊस एनकाउंटर झाला. या एनकाउंटर मुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. बॉलिवूडने त्यावर बाटला हाउस नावाचा चित्रपटही बनविला आहे ज्यामध्ये जॉन इब्राहीम याची प्रमुख भूमिका आहे.

१९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्ली पोलिसांच्या एका विशेष तुकडीने जामिया नगरमधील बाटला हाउसमध्ये एनकाउंटर केला. त्याठिकाणी इंस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांच्यासह दोन संशयित इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी ठार झाले. दबंग एनकाउंटर स्पेशलीस्ट शर्मा यांच्या नेतृत्वात त्यांची टीम हि केवळ, सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जामिया नगर च्या रहिवाश्यांकडे चौकशी करण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी गेली होती. परंतु तिथे गेल्यानंतर २० मिनिटे अंधाधुंद गोळीबार झाला आणि बाटला हाउस हा एनकाउंटर घडून आला.

अनेकांनी या एनकाउंटरच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि दावा केला की हा एनकाउंटर करण्याचे पूर्वनियोजन झाले होते.पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एनकाउंटरची चौकशीही केली आणि अखेर दिल्ली पोलिसांना क्लीन चिट दिली. गोळीबारात बळी पडलेल्यांचा शवविच्छेदन अहवालाने अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांचा एनएचआरसी अहवालात समाविष्ट झाला नव्हता.

इतकेच काय, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यापूर्वी दोन दिवस आधी हा अहवालसदर करण्यात आला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना कोर्टात खटला सुरु करण्यापूर्वी अतिरिक्त पुरावे सदर करण्याची परवानगी दिली.

४ ) इशरत जहां २००४

एनकाउंटर
एनकाउंटर-इशरत जहां

आपल्या सात भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाची इशरत हि मुंबईच्या गुरु नानक खालसा महाविद्यालयात द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी होती. २०१७ मध्ये दहशतवादी डेव्हिड हेडलीने मुंबईच्या कोर्टाला सांगितले की, इशरत जहां हि एलईटीची
(Lashker-e-Taiba) कार्यकर्ता होती. १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी १९ वर्षीय इशरत जहां आणि तिच्या तीन सहकाऱ्यांना अहमदाबादच्या जवळच एका एनकाउंटर मध्ये मारले होते. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , हे चौघेजण लष्कर-ए-तैयबाचे आतंकवादी होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री (सध्याचे पंतप्रधान) नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा त्यांचा बेत होता.

गुजरात उच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष तपास पथकाच्या तपासणीत हा एनकाउंटर पूर्वनियोजित असल्याचे समजले. त्यानंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला, सर्वोच्च न्यायालयाने याचे तपास कम सीबीआयकडे सोपवले. सीबीआयने गुजरात पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध या पूर्वनियोजित आणि बनावट एनकाउंटर मध्ये सामील झाल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले.

आरोपी अधिकाऱ्यांपैकी एकाने अज्ञात कॉंग्रेसच्या नेत्याविरोधात आरोप केले. फेब्रुवारी २०१६ मध्ये या प्रकरणातील आरोपींपैकी एक, इंटेलिजेंस ब्युरोचे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांनी सांगितले की, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी आणी त्यांना प्रकरणात फसवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि “आकर्षणे” ऑफर केली. ते म्हणाले की गुजरातमधील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या नेतृत्वात मोदींच्या विरोधात हा कट रचला जात होता.

५ ) सोहराबुद्दीन शेख २००६

 

 एनकाउंटर
एनकाउंटर- सोहराबुद्दीन शेख

सीबीआयच्या म्हणण्यानुसार शेख हा कुख्यात गुन्हेगार होता, तो गुजरात आणि राजस्थानमधील मार्बल व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत असे. गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो तो लष्कर-ए-तैयबाचा सदस्य होता.
नोव्हेंबर २००६ मध्ये शेख आणि त्यांची पत्नी कौसर हे दोघेजण हैदराबादहून महाराष्ट्रातील सांगलीकडे जात होते. गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अडवले आणि अहमदाबादच्या बाहेरील बाजूस एका फार्महाऊसमध्ये नेले.
तीन दिवसांनंतर तत्कालीन एटीएसचे प्रमुख डी.जी. वंजारा यांनी तो अतिरेकी असल्याचा दावा करून शेखला फार्महाऊसच्या बाहेर नेवून ठार मारले.

या प्रकरणात एकूण ३८ लोक आरोपी होते, त्यापैकी २०१४ मध्येच १६ लोकांना निर्दोष सोडण्यात आले. हे प्रकरण यापूर्वी गुजरातमध्ये चालू होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते मुंबईत वर्ग करण्यात आले. मुंबईतील विशेष सीबीआय
न्यायालयात ज्या २२ जणांविरूद्ध खटला चालला होता त्यांच्यापैकी बहुतेक जन पोलिस कर्मचारी होते. आरोपी हे गुजरात आणि राजस्थानमधील कनिष्ठ स्तराचे पोलिस अधिकारी आहेत.

हराबुद्दीन शेख एनकाउंटर प्रकरणात, मुंबईच्या विशेष न्यायालयाने निकाल देताना भाजप नेते अमित शहा यांच्यासह २२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांशी सहमत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  ते पुरावे सिद्ध करीत नाहीत की सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम यांची हत्या कोणत्याही षडयंत्रांतर्गत करण्यात आली होती. यानंतर भाजपने कॉंग्रेसवर हल्ला केला होता. अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांना जामीन मिळू नये म्हणून कॉंग्रेसद्वारे हा कट रचला गेला होता . त्यांचे षडयंत्र आता खोटे सिद्ध झाले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :   हे आहेत मुंबई पोलीस दलातील अव्वल ५ एनकाउंटर स्पेशलीस्ट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here