आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मुलांना शाळेत जाता याव, यासाठी या गावातील लोकांनी चक्क नदीवर लाकडी पूल उभारलाय…!

आपण अनेक अश्या राज्यात फिरायला गेल्यानंतर काही काही ठिकाणी पहिले असेल कि अत्यंत मुलभूत सुविधा सुद्धा काही भागात उपलब्ध नसतात.

भारतात अनेक ठिकाण अशी आहेत ज्या भागातील नागरिकांना कसलीही सुविधा नसताना ते आपले जीवन जगत असतात सुविधा नाहीयेत यामुळे हर न मानता ते लोक  त्यावर उपाय शोधून आपल्या अडचणी दूर करतात.

असच एक गाव अरुनाचल प्रदेश मध्ये आहे. गावात मुलभूत सुविधांचा पहिल्यापासूनच अभाव होता. त्यातच मुलांना शिक्षण घेण्यासाठी गावाच्या लागतच नदी ओलांडावी लागत असे. तरीही हर न मानता या गावकर्यांनी आपल्या मुलांना शाळेत जाता याव यासाठी नदीवर चक्क लाकडापासून व केबल वापरून एक पूल तयार केला आहे.

पूल
पूल

“गशेंग” अरुणाचल प्रदेश मधील हे अत्यंत दुर्मिळ भागातील गाव आहे. गावात कसलीही वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा व अन्य मुलभूत गरजा उपलब्ध नाहीत .या गावापासून मुलांची शाळा व हॉस्पिटल लगभग ६० किमी दूर आहे.

एवढच नाहीतर यांना तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आणि नदी ओलांडण्यासाठी नदीवर पूल सुद्धा उपलब्ध नाही. यामुळे येथील लोकांनी मुलांची शाळेत जाण्यासठी होत असलेली परेशानी पाहून कसलीही सरकारच्या मदतीची वाट न पाहता आपणच नदीवर पूल बनवला आहे.

पूल

हा पूल बनवण्यासाठी त्यांनी मुख्य म्हणजे लाकूड आणि केबल चा उपयोग केला आहे. साहजिकच हा पूल पूर्ण झाला असला तरी यावरून जातेवेळीस जीव मुठीत घेऊनच जाव लागत आहे. लाकूड आणि केबलचा वापर केल्यामुळे याचा वापर तेवढाच धोकादायक आहे, परंतु मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्यांनी मेहनतीने हा पूल बनवला आहे.

पूल

या पुलाचे फोटो सोशल मिडीयावर आल्यानंतर लोक यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. परंतु आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी या गावकऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेणे जरुरी झाल आहे.

या गावातील लोकांनी जरी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हा पूल बांधला असला तरी सुद्धा सरकारने अश्या गावांकडे लक्ष देऊन त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण  केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना अश्या प्रकारे आपला जीव मुठीत धरून जगाव लागणार नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here