आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

150 लोकांचा जीव घेणारी ही महिला ड्रग्सच्या धंद्यातील “लेडी माफिया” म्हणून नावाजली होती.


जगभरात अनेक ड्रग माफिया होऊन गेले. काही काहीनी तर आपल्या ड्रग्स व्यवसाच्या जोरावर स्वतःच असं एक साम्राज्य निर्माण केल्याचं पहायला मिळालं आहे. परंतु आज आपण ज्या महिला ड्रग्स माफिया बद्दल बोलणार आहोत तिची कहाणी काहीसी वेगळी मात्र तेवढीच खतरनाक आहे. ड्रग्स च्या धंद्यात बळजबरीने उतरलेली ही महिला काही दिवसातच ड्रग्सच्या धंद्यातील माफिया बनली होती.

या महिलेच नाव आहे ला चायना..

ड्रग्स माफिया
ड्रग्स माफिया

ही महिला मैक्सिको मध्ये सर्वात अगोदर संगठीत अपराधात सामील झाली होती. तिथून शेजारील देश अमेरिका मध्ये ते हिरोईन आणि ईतर ड्रग्सचा साठा पुरवत असत. ड्रग्सच्या धंद्यात जरी पुरुष माफिया जास्त पहायला मिळाले असले तरीसुद्धा ला चायना एक अशी डीलर बनली जिने स्वतःच्या हिमतीवर ड्रग्स आणि नाशिली पदार्थांच्या  धंद्यात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यामुळे ती ड्रग्स धंद्यात “लेडी माफिया” म्हणून ओळखल्या जाउ लागली.

अल्पावधीतच तिने आपल्या गँगमध्ये 300 पेक्षाही जास्त पुरुषांना सामील करून घेतले.आणि या सर्वांना सोबत घेऊन तिने ड्रग्सच्या दुनियेत आपली ओळख मोठी केली.

ड्रग्स

ला चायनाचे खरे संपूर्ण नाव “मेलिसा मार्गारिटा कालडेरोन ओजेडा” होते,परंतु ड्रग्सच्या जगात  खतरनाक डीलर बनल्यानंतर तिची ओळख “ला चायना” या नावाने होऊ लागली. पोलिसांच्या मते या महिलेने 150 पेक्षाही जास्त लोकांचा खून केला आहे.

आपलं ड्रग्सचे साम्राज्य वाढवतं या महिलेने लगभग 10 वर्ष पोलिसांना नाकीनऊ आणले. ला चायनाच्या बॉयफ्रेंडचे नांव मेलिसा मार्गारिटा कालडेरोन ओजेडा होते. परंतु ला चायनाचा बॉयफ्रेंड बनल्या नंतर त्याची ओळख बदलली.

एक वेळेस पोलिसांनी जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडला पकडले, तेव्हा त्याने पोलिसांसोबत डील  केली कि ते त्याला कमी सजा मिळवून देतील आणि त्याबदल्यात तो ला चायनाला पकडवून देईल. बॉयफ्रेंडच्या याच धोक्यामुळे ला चायना 2015 मध्ये लॉस काबोस एयरपोर्ट  वरून पकडल्या गेली होती.

ड्रग्स माफिया
ड्रग्स माफिया

ला चायनाने कित्येक भ्रष्ट पोलिसांना खरेदी केल होत. ती त्याना मोठी रक्कम देऊन नेहमी सुरक्षित राहत असे. त्यामुळेच तीला पकडणे पोलिसांना अवघड जात असे.

परंतु तिच्या बॉयफ्रेंडनी दिलेल्या माहितीनुसार तीला पकडण्यात पोलिसांना यश आले. महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या ड्रग्स साम्राज्याच्या राणीला पकडण्यासाठी पोलिसांना एकही गोळी चालवावी लागली नाही.

असं म्हटलं जात कि तेथील झालेल्या मोठ्या लगभग 180 हिंसक घटनांमध्ये ला चायनाचा हात होता. त्यातील 9 घटनांमध्ये ती स्वतःच्या हाताने लोकांना मारताना दिसली होती, तर बाकी अन्य घटनांत तिने आपल्या गुंडाच्या मदतीने हत्या केल्या होत्या..

ड्रग्स

2005 साली सर्वप्रथम तिने या ड्रग्सच्या दुनियेत पाय ठेवला होता. सुरवातीला ती त्या वेळेसचा ड्रग्स माफिया “डोमासो कार्टेल”  साठी काम करत असे. हळूहळू तिने आपल्या हिमतीच्या जोरावर या ड्रग्स दुनियेत पाय रोवायला सुरवात केली आणि अल्पावधीतच ड्रग्समाफिया आणि ईतर काळ्या धंद्यात ती फेमस झाली. नंतर तिने तिचे एवढं वेगळे साम्राज्य निर्माण केले.

तिने city of La Paz, capital of Baja California Sur, and Cabo San Lucas यासारख्या महत्वाच्या जागेवर संपूर्ण पणे आपलं वर्चस्व स्थापण केले. जवळ जवळ 8 वर्ष तिने या जागेवर राज्य केले आणि आपला ड्रग्स माफिया चा कारभार केला. यादरम्यान तिचा लोकांची हत्या करण्याचा आकडा वाढतच गेला.

तिचे सर्व साथीदार तिच्याबद्दल अतिशय इमानदार होते. ते म्हणजे ती त्यांना देत असलेल्या ड्रग्स आणि पैस्यामुळे..
आपल्या 300 हुन अधिक साठीदारांना ती लागेल तसे ड्रग्स आणि पैसा वेळेवर पुरवत असे, त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही तीला धोका देऊन जाऊ शकले नाही.

आपल्या बॉयफ्रेंडनी दिलेल्या धोक्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागली. नाहीतर सलग 10 वर्ष ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जात असे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = मुलांना शाळेत जाता याव  म्हणून या गावकऱ्यांनी नदीवर  लाकडी पूल बांधलाय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here