आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

उज्जैन भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

 

या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!

 

महाकाल मंदिराचे अनके पौराणिक ग्रंथामध्ये सुंदर असे वर्णन केले आहे जाणून घेऊया काय आहे मंदिराचा इतिहास..

 

मध्यप्रदेशच्या उज्जैन  शहरांमध्ये असलेले महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवशंकरांच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
येथे महादेवाच्या दर्शनासाठी पूर्ण वर्षभर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कार्तिक पोर्णिमा , वैशाख पोर्णिमा तर इथे विशेष यात्रा भरली जाते.

 

भगवान शंकरांच्या या ज्योतिर्लिंगाचा साज भस्म आणि भांग नी केला जातो. येथील भस्मआरती विशेष असी प्रसिद्ध आहे.
या ज्योतिर्लिंगास महाकाल यामुळे म्हटले जाते कि, प्राचीन काळात याच जागून संपूर्ण विश्वाचा वेळ निर्धारित केला जात असे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव “महाकालेश्वर” ठेवले गेले.

 

असी झाली होती भगवान महाकालची स्थापना:

 

उज्जैन
उज्जैन

 

पौराणिक ग्रंथाच्या अनुसार अवंतिका म्हणजे उज्जैन भगवान महादेवाना खूप प्रिय होते. एका वेळी उज्जैन नगरीत एक ब्राम्हण राहत असे. ज्याचे ४ पुत्र होते.  दुषण नावाचा राक्षस त्यावेळी उज्जैन नगरीत आतंक माजवत होता. तो रक्षक नगरीतील सर्व लोकांना त्रास देत असे.

 

तेव्हा त्या राक्षसाच्या त्रासापासून लोकाना वाचवन्यासाठी त्या ब्राम्हणाने महादेवाची आराधणा केली. महादेव त्याच्या तपस्येवर खुश होऊन तिथे महाकालच्या रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी त्या राक्षसाचा विनास केला. नंतर उज्जैनच्या  लोकांनी महादेवाना तेथेच राहण्याची प्रार्थना केली. भक्तांच्या प्रार्थनेला मान देऊन भगवान महादेव तेथेच ज्योतिर्लिगच्या रुपात स्थापित झाले.

 

महाकाल मंदिराच्या आसपास फिरण्याची ठिकाणे:

 

महाकाल मंदिराच्या जवळच हरीसिध्द मंदिर आहे जे देवी सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. जवळच प्रसिद्ध कालभैरव मंदिर सुद्धा आहे. जेथे शंकरांच्या मूर्तीला प्रसाद रूपाने मदिरा दाखवली जाते. उज्जैन  शहराच्या मध्यवर्ती भागात गोपाल मंदिर आहे जे कृष्णाचे दर्शनीय मंदिर आहे. येथील मंगलनाथ मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. मंगल संबंधी दोष दूर करण्यासठी हे देशातील एकमात्र मंदिर आहे.

 

महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.

 

येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे  फक्त नागपंचमीस उघडले जातात.

 

महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे.

 

याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते. महाकालेश्वर लिंगास सजवले जाते. नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते.

 

येथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते. या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. येथे महाकाल रुपी भगवान शंकरांची पूजा केली जाते.

 

उज्जैन
उज्जैन

 

महाकाल चे दर्शन केल्यानंतर जुने  महाकाल चे दर्शन करणे सुद्धा जरुरी मानले जाते.

 

सध्या जे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ते ३ खंडामध्ये विभागले आहे. खालच्या खंडात महाकालेश्वर ,मधल्या खंडात ओंकारेश्वर आणिवरच्या खंडात नागचंद्रेश्वर मंदिर आहे. नागचंद्रेश्वर शिवलिंगाचे दर्शन वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी मिळते.

उज्जैन चा एकच राजा मानला जातो तो म्हणजे महाकाल. अस म्हटले जाते कि विक्रमादित्य च्या काळानंतर येथे कोणताही राजा रात्री थांबू शकला नाहीये. ज्याने सुद्धा असे साहस केले ,तो कुठल्याना कुठल्या संकटात सापडतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here